वराडे जवळ एसटीला भीषण अपघात;दोन जण गंभीर

वराडे जवळ एसटीला भीषण अपघात;दोन जण गंभीर

उंब्रज/प्रतिनिधी


पुणे बंगलोर आशियाई महामार्गावर वराडे तालुका कराड गावच्या हद्दीत रस्त्याकडे उभे असणाऱ्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसुन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे.  तसेच एसटीतील अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात एसटी कंडक्टर व एक महिला गंभीर जखमी झाली आहे.


      जखमींना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने वराडे येथील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एसटी बस मध्ये प्रवासी अडकले होते.  त्यांना बाहेर येण्यासाठी मार्ग नव्हता नागरिकांनी जखमी व इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान हा अपघात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर होऊनही पोलीस घटनास्थळी उशीर पर्यंत दाखल झाले नव्हते त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारसाठी कराड येथे हलविण्यात आले आले.  नाशिक ते सांगली असा प्रवास करणारी ही एसटी असून अपघातातील जखमींचा नेमका आकडा समजू शकला नाही.