वारकर्‍यांच्या सुरक्षितेसाठी पोलीस बनले ऑन ड्युटी वारकरी

पंढरपूरला श्री विठ्ठल-रखमाई च्या दर्शनासाठी आळंदी येथून पायी चालत निघालेल्या  वारकर्‍यांच्या सुरक्षितेसाठी सातारा पोलीस चक्क ऑन ड्युटी वारकरी बनणार आहेत.

वारकर्‍यांच्या सुरक्षितेसाठी पोलीस बनले ऑन ड्युटी वारकरी
वारकरी पोलीस


सातारा/प्रतिनिधीः-
पंढरपूरला श्री विठ्ठल-रखमाई च्या दर्शनासाठी आळंदी येथून पायी चालत निघालेल्या  वारकर्‍यांच्या सुरक्षितेसाठी सातारा पोलीस चक्क ऑन ड्युटी वारकरी बनणार आहेत. त्यामुळे चोरीच्या उद्धेशाने वारीत सामील झालेल्या चोरट्यांची वारी जेलमध्ये नक्कीच पोहचणार असे चित्र दिसत आहे.
आळंदी येथून संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी  दि. 2 जुलै रोजी दुपारी एक वाजता सातारा जिल्ह्यात नीरा नदीच्या काठावर शिरवळ येथे दाखल होत आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत सातारा पोलिस दलातील अधिकारी, पोलीस कर्मचारी संरक्षण करण्यासाठी  लक्ष ठेवून आहेत. शिरवळ, लोणंद, फलटण, तरडगाव, आसू,बरड नंतर ही पालखी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जाईपर्यंत सातारा पोलीस दलातील अधिकारी व पोलिस तैनात राहणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. वारी मार्गावर ठिकठिकाणी मदत केंद्र द्हशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.
पालखी सोहळ्यातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर’,वाकी टॉकी यंत्रणा, वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.पालखीत शेकडो दिंड्या सामील होतात.हजारो वारकरी आणि स्थानिक भाविक तसेच शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची ही गर्दी होते.आपल्या मर्जीतील काही लोकप्रतिनिधी यांची पालखीचे दर्शन घेतानाची छबी व चित्रीकरण करण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत असतात. त्यांना यंदाच्या वर्षी रोखण्याचे काम सातारा पोलिसांनी करावे अशी अपेक्षा वयोवृद्ध वारकरी ह. भ. प. श्यामराव पवार-महिगावकर व अंध वारकरी ह. भ. प. विजय महाराज-पवारवाडीकर यांनी नम्रपणे केले आहे.
या पालखी सोहळ्यावर तसेच परिसरात सी.सी.टी.व्ही.ची नजर राहणार आहे.आपल्या घरातील नातेवाईक, मित्रपरिवार यांना सडून अनेक वारकरी संप्रदायाचे भाविक पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतात. त्यांची सेवाभावी संस्था चांगलीच काळजी घेत आहेत. राज्य सरकारने पाच लाख रेनकोट वाटप करून खर्‍या अर्थाने वारकर्‍यांचे पावसापासून संरक्षण केले आहे.याची नोंद भाविकांनी घेतली आहे असे भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर,भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर ,शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले आहे.
पालखी वारी मार्गावर सोन्या-चांदीचे दागिने, पैसे, मोबाईल, पाकिट, आणि मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी सातारा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस तसेच महिला पोलीस वारकर्‍यांच्या वेशात वारीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर होमगार्ड यांचाही समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे. त्यामुळे सातारा पोलिसांच्या हाती पालखीतील चोर निश्चितच सापडणार आहेत.