वारणा कोरोना सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरेल - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. कराडमध्येही रुग्णांची संख्या मोठी असल्याने याठिकाणी रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने सुरू केलेले कोरोना सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. 

मुस्लिम समाजाने उभारलेल्या वारणा कोरोना सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड/प्रतिनिधी : 
           जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. कराडमध्येही रुग्णांची संख्या मोठी असल्याने याठिकाणी रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने सुरू केलेले कोरोना सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. 
           येथील वारणा हॉटेलमध्ये कराड शहर मुस्लिम संघाच्या वतीने कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. शनिवारी 12 रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक फारुखभाई पटवेकर, अल्ताफभाई शिकलगार उपस्थित होते.