वारणा नदीचे रौद्ररूप, अनेक पूल पाण्याखाली

वारणा नदीचे रौद्ररूप, अनेक पूल पाण्याखाली

वारणा नदीचे रौद्ररूप, अनेक पुल पाण्याखाली

कराड/प्रतिनिधी :
                        शिराळा तालुक्यातील वारणा नदी काठच्या नऊ गावांत पुराच्या पाण्याने शिरकाव केला असून 60 कुटुंबे व 100 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार गणेश शिंदे यांनी दिली. शिराळा येथे 430 मि.मी.पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. 
                       चांदोली परिसरात 24 तासांत 430 मी.मी.पाऊस झाल्याने वारणा धरणाची पाणी पातळीत झपट्याने वाढ होत आहे. मंगळवारी 38220 क्युसेक्स पाणी चांदोली धरणातुन सोडण्यात आले आहे. यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली असुन सोनवडे, आरळा, काळुद्रे, चरण, मोहरे, खुजगाव, कोकरुड, पुनवत, सांगाव, मांगले, देववाडी, बिळाशी या गावांत पुराचे पाणी शिरले आहे. वारणा काठच्या पुरात अडकलेल्या गावातील 60 कुटुंबातील 268 लोक 100 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
                      गट विकास आधिकारी डाॅ. बागल यांनी कोकरूड, काळुंद्रे, सागाव परिसराची पाहणी केली. पाणी शिरलेल्या गावातील लोकांची साहित्य बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू होती. धरणात 27.07 टिएमसी म्हणजे 98.37 टक्के साठा झाला आहे. शेडगेवाडी-चांदोली व कोकरुड-मलकापुर हे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामुळे कोकण, रत्नागीरी तसेच कोल्हापुर या प्रमुख शहराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
                     शिराळा पश्चिम भागातील वारणा नदीला महापूर आला असुन 1980 च्या महापुरानंतर पहिल्यांदा शेडगेवाडी-चांदोली व कोकरुड-मलकापुर हे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असुन वारणा काठचे जन जिवन विस्कळीत झाले आहे. या भागातील वाढत्या पुराच्या पाण्यामुळे भितीचे वातावरण झाले आहे. कृष्णा वारणेला आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले असुन, शिराळा तालुक्यातील पणु'ब्रे येथील 33/11 केवी वीजपुरवठा उपकेद्रात महापुराचे पाणी शिरले आहे. या उपकेद्रांतुन विज पुरवठा करण्यात येत असल्या 
मणदुर, आरळा, धनगरवाडा, मराठवाडी, चरण, गुढे पाजगणी, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी, खुजगांव व परीसरातील वाडी वस्त्यांंचा असा 39 गांवांचा विजपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अंदाजे 20 हजार वीजग्राहकांना याचा फटका बसला आहे. 
                      मणदुर आरळा व बिळाशी मांगरुळ पर्यत वारणा नदीच्या पुराचे पाणी शिवारात पसरले आहे. नदी काठच्या शेतकर्‍याच्या वस्त्या  पाण्याखाली गेल्या असुन जनावरांची छपरे, वस्ती व राहती घरे पाण्यात आहेत. काळुद्रे येथील उबाळे वस्ती, मोहरे येथोल सटाले वस्ती, कोकरूड येथील घोडे वस्ती, बिळाशी येथील रोकडे, भोसले डोल (वस्ती) दोन दिवसांपासुन पाण्याखाली आहेत. नदीकाठचा अर्धा ते एक किलो मिटरचा शेतीचा शिवार पाण्याखाली गेल्याने भात व ऊस पिकांचा शिवार पुर्ण पाण्याखाली बुडाला आहे.
                 आरळा-शित्तुर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, व बिळाशी- भेडसगांव हे सर्वच पुल पाण्याखाली आहेत. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भगाचा शाहूवाडी ताल्युक्याशी असलेला संपर्क पूर्ण पणे तुटला आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असुन शाळेत जाणार्‍या वदवाखान्यात जाणार्‍या रुग्णांना जाणवत आहे. गेल्या दहा वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाली नव्हती.
                शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागाची अवस्था फार वाईट असुन शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाशी लागुन असल्याने संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात सोंडोली, खेडे, शिराळे वारुन, शित्तुर, विरळे, जांबुर, मालगांव, कांडवण या गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
                     शेडगेवाडी हा रत्नागीरी व कोकणात जाणारा मुख्य मार्ग असुन आज पर्यत या मार्गावर मेणी ओढ्यावरील पुलावर कधी सुद्धा पुराचे पाणी आले नव्हते मात्र या वर्षी मात्र, मेणी पुलावरुन पाणी वाहु लागले असुन महत्वाचा असा मूख्य मार्ग वाहतुकी साठी बंद झाला आहे. बाजुला लागुन असलेल्या गणपती राईस मिल व इतर दुकानात पाणी शिरले असुन मोठे नूकसान झाले आहे. 
                      तसेच शेडगेवाडी बाजार पेठेसाठी विज वितरण करणारा एक ट्रान्सफार्म सुद्धा पाण्याखाली बुडला असुन विज पुरवठा बंद केला आहे. मेणी पुलावर पहील्यादाच पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पुलाचे पाण्याखाली जाण्यामुळे चांदोली, कराड, रत्नागिरी, कोल्हापुर ,शिराळा या ठिकाणी जाण्याचा मार्ग पुर्ण पणे बंद आहे. तसेच शेडगेवाडी, खिरवडे, खुजगांव, नाठवडे येथील शेतकर्‍यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाणी पुरवठा करणार्‍या स्किम पुराच्या पाण्या खाली आहेत. परीसरातील खुजगांव, खिरवडे, शेडगेवाडी, नाठवडे या गांवातील लोकांना पुलावर आलेल्या पाण्याची माहीती मिळताच लोकांनी  पहाण्यासाठी मोठी गर्दी  केली होती. 
                  कोकरूड पुलाला पाणी तटल्यामुळ महापुराच्या पाण्यानं कोकरूड-मलकापूर मुख्य रस्त्यालाच आल नदीचं स्वरूप, पोलीस प्रशासनान रस्ता  केला  वाहतुकीसाठी बंद, चोख बंदोबस्त महापुराच्या पाण्याची फुग कोकरूड गावाच्या हद्दीत काही घरात शिरलं पूराच पाणी .

शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात अनेक वाड्या वस्त्या गावे वारणा नदीच्या पुराणे बाधीत झाली आहेत. मनदुर, आरळा, सोनवडे, मोहरे, नाठवडे, करुंगली, खुजगांव, शेडगेवाडी, चिंचोली या ठिकाणी यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष युवा नेते सत्यजित नाईक (आण्णा) यांनी त्या ठिकाणी जाऊन पररिस्थितीची पाहणी केली. तेथील नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. तसेच स्थानिक शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपत्ती व्यवस्थापन करण्या संदर्भात योग्य त्या सूचना केल्या. नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.यावेळी माजी उपसभापती एन. डी. लोहार, दिलीप सूर्यवंशी, वसंत पाटील, डॉ. ऋषी चौगुले, पोलीस पाटील नीलम सूर्यवंशी, डॉ. जे. एस. पाटील, प्रकाश भुसारी, विश्वनाथ देशपांडे, तलाठी दस्तगीर मुलाणी यांचेसह पश्चिम भागातील या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कणेगाव व भरतवाडी ता. वाळवा येथील वारणा नदीची पूर पाहाणी करताना आमदार शिवाजीराव नाईक साहेब सोबत महेश पाटील, प्रदीप कदम,अरविंद पाटील, संतोष पाटील स्थानिक ग्रामस्थ.
                   मा.सत्यजित भाऊ आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आसताना देखिल आपल्या मतदार संघातील लोकांची गैरसोय लक्ष्यात घेऊन त्यांच्या प्रयंत पोहचून त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन तेथील प्रस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम भाऊंनी पार पाडले दिवसभरात मांगले , देववाडी , ऐतवडे खुदॆ ता.वाळवा येथे तर पूरस्थिती निर्माण झाल्याने 75 हून अधिक कुटुंबाचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा व हाॅल मध्ये करण्यात आले आहे.तसेच जनावरांना देखील स्थलांतरित करण्यात आले आहे.मा.सत्यजित देशमुख भाऊ यांनी परिस्थिती ची माहिती घेत दक्षता घेण्याचे आदेश दिले. 
                      वारणा नदीस आलेल्या महापुरामुळे शिराळा विधानसभा क्षेत्रातील नदी काठावरील जन जीवन विस्कळीत झाले आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज सकाळी चरण, पणुब्रे तर्फ वारुण, काळुंद्रे, आरळा (ता. शिराळा) परिसराची पाहणी केली. 2005-6 साली असाच वारणेला महापूर आला होता, तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या नदीकाठी जनावरांच्या वस्त्या आहेत, त्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी. पाण्याच्या ठिकाणी जाऊन मोबाईलवर फोटोग्राफी शक्यतो टाळावी. पडलेले विजेचे खांब, तारा जवळ जाणे टाळावे. माहिती नसलेल्या ठिकाणी पाण्यात जाऊ नये, जिविताचा धोका होईल अशा गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 
                     या वेळी तालुक्याचे माजी सभापती हणमंतराव पाटील, विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे संचालक शिवाजी व संभाजी पाटील, काळुंद्रे गावचे सरपंच विजय पाटील, सुधीर पाटील, रामचंद्र देसाई, एल. आर., आकाराम, महादेव, नामदेव पाटील, डॉ. जमादार (चरण प्राथमिक आरोग्य केंद्र) आदी उपस्थित होते.