वर्षा सहलीला जाताना...

दरवर्षी पाऊस सुरु झाला की तरुण मुले सहलींचे आयोजन करतात. वर्षा सहल म्हणजे तरुणांच्या दृष्टीने पर्वणीच पावसात भिजत वर्षा सहलीचा आनंद घेणे छानच. तरुणांनी वर्षा सहलीवर जाताना दक्षता बाळगणेही तितकेच महत्वाचे आहे.

वर्षा सहलीला जाताना...


दरवर्षी पाऊस सुरु झाला की तरुण मुले सहलींचे आयोजन करतात. वर्षा सहल म्हणजे तरुणांच्या दृष्टीने पर्वणीच पावसात भिजत वर्षा सहलीचा आनंद घेणे छानच. तरुणांनी वर्षा सहलीवर जाताना दक्षता बाळगणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण वर्षा सहलीच्या आनंदात भान न राहिल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. विशेषतः नदी, समुद्र, तलाव, डोंगरमाथे, धबधबे, धरणे, जंगल अशा ठिकाणी सहलीस गेल्यास सावधानता बाळगायला हवी.  या ठिकाणी सहलीस गेल्यास तेथील स्थानिक नागरिक प्रशासन व पोलिसांकडून पर्यटकांना वेळोवेळी धोक्याचा इशारा दिला जातो. खबरदारीचा फलक लावला जातो. पण उत्साहाच्या भरात अनेकवेळा या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषतः सेल्फी काढण्यासाठी नको ते धाडस केले जाते. यातूनच मग दुर्घटना घडतात. समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळा तसेच वाऱ्याचा व पावसाचा जोर पाहून समुद्रात उतरायला हवे. समुद्रात पोहताना लाईफ जॅकेट घालायला हवे. तसेच स्थानिक नागरीक व लाईफ गार्डने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करायला हवे. धबधबे पाहण्यासाठी गेल्यावर देखील काळजी घ्यायला हवी. अति उत्साह टाळायला हवा. सर्वात महत्वाचे म्हणजे वर्षा सहलीला गेल्यावर मद्यपान टाळायला हवे. 
                                                                             -श्याम बसप्पा ठाणेदार 
                                                                                दौंड जि. पुणे                                                                                         9922546295