वाठार येथे कासेगाव व्यापारी असोसिएशनचे अन्नदान

वाठार येथे कासेगाव व्यापारी असोसिएशनचे अन्नदान

कराड/प्रतिनिधी : 
                        पुणे -बेंगलोर महामार्गावर वाठार ता. कराड येथे कराडहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पुन्हा पाणी आल्याने महामार्गाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या खोळंबून पडलेल्या वाहनातील प्रवासी, वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी कासेगाव ता. वाळवा येथील व्यापारी असोसिएशन यांच्याकडून वाठार येथे येऊन अन्नदान करण्यात आले.  
                     कासेगाव  व्यापारी असोसिएशनकडून
सुमारे दोनशे लोकांना हे अन्नदान व त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.                                              
                 त्याचबरोबर वाठार ग्रामस्थांकडून येथील दानशूर बंडा भोपाळ महाविद्यालयाच्या ठिकाणी वाहनधारकांना मोफत राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रवासी, वाहनधारकांकडून कासेगाव व वाठार ग्रामस्थांच्या सामाजिक बांधिलकीबाबत आभार व्यक्त करण्यात येत आहेत.