व्हिजन 2025 साठी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 आयडियल

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये कराड नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 3 चा आयडियल शाळा म्हणून उल्लेख करण्यात आला असून या शाळेप्रमाणे राज्यातील अन्य शाळा 2025 पर्यत आयडियल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिजन 2025 साठी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 आयडियल
कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3
व्हिजन 2025 साठी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 आयडियल 

शाळेच्या कामगिरीचे शासना कडून कौतुक : वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचाही उल्लेख

कराड/प्रतिनिधी :

          शालेय शिक्षण विभागाने 2025 पर्यत राज्यातील सर्वच शाळा आयडियल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्येवाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शाळा व राज्यात  सर्वात जास्त पट संख्या असलेली कराड नगरपरिषदेची शाळा क्रमांक 3 या शाळांचा उल्लेख करून या धर्तीवर शाळा आयडियल बनविण्याचा निर्धार केला आहे. 

         राज्यातील सर्वच शाळा आयडियल करण्यासाठीची व्हिजन 2025 नावाची पुस्तीका शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड यांचे हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये 2025 मध्ये शालेय शिक्षण कसे असेल? याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये 1 लाख 10 हजार 229 शाळांमधून वाबळेवाडी सारखी आंतरराष्ट्रीय शाळा, तर राज्यात  सर्वात जास्त पट संख्या असलेली कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 या दोन शाळांचा उल्लेख करून या धर्तीवर राज्यातील अन्य शाळाआयडियल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

       त्यासाठी वाबळेवाडी व कराड नगरपरिषदेची शाळा क्रमांक 3 या दोन शाळांमध्ये ज्याप्रमाणे प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या विद्यार्थी, पालकांच्या रांगा, स्कूल बस सुविधा, डिजिटल क्लासरूम आदींची दखल घेऊन राज्यातील 1 लाख 10 हजार 229 शाळांमधून आदर्श शाळांमध्ये केवळ या दोन शाळांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

 कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 ची शालेय शिक्षण विभागाच्या 2025 साठीच्या आयडियल शाळांसाठी आदर्श शाळा म्हणून दखल घेण्यात आली आहे. शिक्षकांनी केलेल्या अपार कष्टामुळे हे शक्य झाले आहे. 

– अर्जुन कोळी (मुख्याध्यापक, कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3)