Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी

विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली.  राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या.  पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. News Item ID: 599-news_story-1569524941Mobile Device Headline: Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली.  राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या.  पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. Vertical Image: English Headline: BJP agrees to hand over deputy chief minister to Shiv SenaAuthor Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्कविधानसभा 2019vidhansabha 2019दिल्लीमहाराष्ट्रmaharashtraमुख्यमंत्रीचंद्रकांत पाटीलchandrakant patilपंकजा मुंडेpankaja mundeगिरीश महाजनSearch Functional Tags: विधानसभा 2019, Vidhansabha 2019, दिल्ली, महाराष्ट्र, Maharashtra, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, पंकजा मुंडे, Pankaja Munde, गिरीश महाजनTwitter Publish: Meta Description: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.Send as Notification: 

Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. 

राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या. 

पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

News Item ID: 
599-news_story-1569524941
Mobile Device Headline: 
Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. 

राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या. 

पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

Vertical Image: 
English Headline: 
BJP agrees to hand over deputy chief minister to Shiv Sena
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
Search Functional Tags: 
विधानसभा 2019, Vidhansabha 2019, दिल्ली, महाराष्ट्र, Maharashtra, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, पंकजा मुंडे, Pankaja Munde, गिरीश महाजन
Twitter Publish: 
Meta Description: 
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.
Send as Notification: