मलकापूरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मलकापूरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कराड/ प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन वित्त आणि नियोजन, वने, मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या    १ जुलै ते ३०सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये होणाऱ्या ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. १जुलै, २०१९ रोजी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर येथे सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अमरदिप वाकडे, विभागीय वनअधिकारी एम. एन. मोहिते, वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. अजित साजणे, मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे,उप नगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी जि.प.सदस्य सौ.विद्याताई थोरवडे यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.