व्यक्तिगत स्वार्थामुळे सहकार चळवळ उध्वस्त - प्रा. देशपांडे

व्यक्तिगत स्वार्थामुळे सहकार चळवळ उध्वस्त - प्रा. देशपांडे

कराड/प्रतिनिधी : 

                         सामान्य मनुष्य नेहमी बचत करतो. 2009 साली जागतिक मंदीच्या काळात देशाचा बचत दर 24 टक्क्यावर असल्याने देश तरला होता. मुळात सहकाराचा मध्यबिंदू बचत आहे. मात्र, आपल्याकडे सहकाराचे कुरण झाले आहे. भागधारक मतदार बनल्याने समाजकरणाला नीट वळण लागले नाही. त्यामुळे सहकार हा राजकारणाचा अड्डा बनला असून व्यक्तिगत स्वार्थामुळेच सहकार चळवळ उध्वस्त झाली असल्याचे प्रखर मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख व पुणे येथील शैक्षणिक विकास केंद्राचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. 

                        येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षारंभानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात बुधवारी 25 रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर, संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, कार्यकारी संचालक अनंत जोशी, सीए शिरीष गोडबोले, डॉ. प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे, जगदीश सुभेदार आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.