आसरे गावात झालेल्या भीषण अपघातात जगन्नाथ सणस यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गणेश घोलप याच्यावर गुन्हा दाखल....

आसरे गावात झालेल्या भीषण अपघातात जगन्नाथ सणस यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गणेश घोलप याच्यावर गुन्हा दाखल....

आसरे गावात झालेल्या भीषण अपघातात जगन्नाथ सणस यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गणेश घोलप याच्यावर गुन्हा दाखल....

 

दौलतराव पिसाळ/वाई प्रतिनिधी 

 

 वाईच्या पश्चिम भागातील वाई ते आसरे जाणाऱ्या रस्त्यावर गणेश घोलप राहणार बावधन तालुका वाई याने भरधाव वेगात आपली बुलेरो गाडी नेऊन जगन्नाथ बापू सणस वय 75 यांना जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी करून न थांबताच पळून गेल्याने त्यांचा उपचारा आधीच मृत्यू झाल्याने आसरे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाले असून पळून गेलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...


                  दि. 7 रोजी च्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जगन्नाथ सणस वय 35 हा एम.आय.डी.सी मधील गरवारी कंपनी मधून घरी आला असता त्याने आपल्या घराचा दरवाजा वाजवला असता पत्नी लवकर दरवाजा उघडत नाही हे पाहून घरात कोणीतरी अनोळखी माणूस आहे. याची चाहूल स्वप्निल ला  लागल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केल्याने अखेर पत्नीने दरवाजा उघडताच गणेश घोलप राहणार बावधन तालुका वाई हा स्वप्निल याच्या ओळखीचा मित्र घरातून बाहेर पडून सैरावैरा पळू लागल्याने स्वप्निल हा चोर चोर म्हणून ओरडत त्याच्या मागे धावत असताना याचा आवाज ऐकून त्याचे वडील जगन्नाथ बापू सणस हेही घराबाहेर पडले व पळत सुटलेला गणेश घोलप त्याला पकडण्यासाठी धावत होते पण अंधाराचा फायदा घेऊन त्याने आपल्या सोबत आणलेली पांढऱ्या रंगाची दूरवर असलेल्या बुलेरो गाडीत जाऊन बसला होता. त्या वेळी जगन्नाथ बापू सणस आणि त्यांचा मुलगा स्वप्निल जगन्नाथ सणस असे दोघेजण आसरे वाई रस्त्यावर असणाऱ्या आपल्या घरासमोर रस्त्याकडेला उभे राहून तु आमच्या घरी एवढ्या रात्रीचा का आला होतास हा जाब विचारण्यासाठी गणेश घोलप याची वाट पहात उभे असताना भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्या गणेश घोलप ने आपली बुलेरो गाडी चालू करून वाई च्या दिशेने भरघाव वेगात जात असताना त्याने या दोघांना रस्त्याकडेला उभे असलेले पाहून त्याने जगन्नाथ बापू सनस वय 75 यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोराची धडक दिल्याने ते जमिनीवर कोसळून त्यांच्या डोक्याला आणि डावा पाय मोडल्याने ते जागीच कोसळले ही धडक एवढी भीषण होती की ते जागीच बेशुद्ध झाले आणि गणेश घोलप हा न थांबताच भरधाव वेगात निघून गेला मुलगा स्वप्नील याने आपल्या इतर चुलत भावाच्या मदतीने चार चाकी वाहनांतून जखमी वडिलांना उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला तरीदेखील त्यांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील उपस्थित डॉक्टरांनी जखमी असलेले जगन्नाथ बापू सणस यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर तेथील उपस्थित पोलिसांनी मयत जगन्नाथ बापू सनस यांचा मृत देह पोलिसांनी ताब्यात घेऊन मृतदेहाचा रीतक्सर पंचनामा करून मृताचे शवविच्छेदन करून अंतिम विधी साठी मुलगा स्वप्नील ह्याच्या ताब्यात दिला. 
        या भीषण झालेल्या अपघातामुळे माझे वडील जगन्नाथ बापू सनस वय 75 यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा गणेश घोलप रा बावधन तालुका वाई याच्या विरुद्ध वाई पोलिस ठाण्यामध्ये स्वप्निल जगन्नाथ सणस वय 35 राहणार आसरे तालुका वाई याने वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीची गंभीर दखल पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घेऊन गणेश घोलप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र तेलतुंबडे हे करीत आहेत..