केसरी कार्ड धारकांनी नवीन आदेशाचा लाभ घ्यावा ;तहसीलदार रणजित भोसले

केसरी कार्ड धारकांनी नवीन आदेशाचा लाभ घ्यावा ;तहसीलदार रणजित भोसले

केसरी कार्ड धारकांनी नवीन आदेशाचा लाभ घ्यावा 

दौलतराव पिसाळ/वाई 

दि.२ 


वाई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागा मार्फत ज्या  केसरी रंगाच्या  रेशनींग कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातुन धान्य  मिळत 
नव्हते अशा गरजु आणी गरीब कुटुंबातील कार्डं धारकांना माणसी गहू आणी तांदुळ एक एक किलो प्रमाणे  देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना दिले आहेत त्याच्या अमंलबजावणी म्हणून तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना  धान्य वाटण्या साठी धान्य देण्याच्या कारवाईला सुरवात झाली आहे तरी या संधीचा फायदा केसरी कार्ड धारकांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि आज पर्यंत राज्य शासनाच्या आदेशा नुसार ४४ हजार रूपये आतील  वार्षिक उत्पन्न असणार्या   वाई तालुक्यातील २५ हजार ५०२ केसरी रंगाच्या कार्डं धारकांना अन्न सुरक्षा योजने  अंतर्गत   २ रुपये किलो गहू आणी तांदुळ ३ रुपये प्रति किलो दराने दिले जात आहे त्याचा ते लाभ घेत आहेत पण ४४ हजार ते ९९ हजार रुपये इतके उत्पन्न असणार्या शिधा पत्रिका धारकांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ  मिळत नसल्याने आणी वाई शहरा सह तालुक्यातील गावा गावांन मध्ये सध्या कोरोनो या रोगाचा फैलाव गतीमान झाल्याने जिल्हाधिकारी यांनी संचार बंदीसह कडक लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्व ऊद्योग धंदे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने अनेकांची दोन वेळच्या भोजनाची पंचायत झाली आहे 
अशा गोरगरीबांना निदान दोन वेळचे पोटाला अन्न मिळावे ते ऊपासी पोटी झोपु नये याचा विचार करून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी ४४ हजार ते ९९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न गटातील केसरी कार्ड धारकांन मध्ये असणार्या गरीब शिधा पत्रिका धारकांना ८ रुपये प्रति किलो दराने गहू आणी १२ रुपये किलो  प्रमाणे माणसी एक किलो गहू आणी तांदुळ एक किलो अशा प्रमाणे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या मार्गदर्शना खाली वाई तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी जुन महिन्या साठी धान्याचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत याचा फायदा वंचित गोरगरीब शिधा पत्रिका धारकांना नक्कीच हाईल असा विश्वास वाई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून राठोड पुरवठा निरिक्षक बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे