आसले गावच्या सुपुत्राला लडाख मध्ये वीरमरण

सोमनाथ मांढरे यांना लडाख मध्ये वीर मरण आल्याने आसले गावावर शोककळा पसरली आहे. वाई तालुक्यातील हा दुसरा जवानाला वीरमरण आले आहे

आसले गावच्या सुपुत्राला लडाख मध्ये वीरमरण

आसले गावच्या सुपुत्राला लडाख मध्ये वीरमरण

 

वाई प्रतिनिधी / दौलतराव पिसाळ 

सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र असून ते लडाख येथे देश सेवा अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले आहे. याची माहिती वाई तालुक्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांना समजताच त्यांनी आसले तालुका वाई येथील वीर मरण आलेले सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती कळवली ही दुःखद माहिती वाई तालुक्यातील गावागावात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक तरुणांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोमनाथ मांढरे तरुण असल्याने वाई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे संपूर्ण वाई तालुका शोक सागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रियंका मांढरे आणि आठ वर्षाचा यश नावाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची आराध्या ही मुलगी असून असा परिवार आहे. त्यांना एक छोटा भाऊ राहूल मांढरे व त्याची पत्नी असे एकत्र कुटुंबात आहेत. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचा पार्थिव उद्या त्यांच्या आसले या मूळ गावी अंत्यविधी साठी आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर आसले तालुका वाई येथील स्मशानभूमीत शासकीय इथमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती वाईचे तहसीलदार रंजीत भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली....