वाई भुईंजसह राज्यातील पोलिस ठाण्यांच्या रडारावरील मोक्यातील आरोपी बंटी जाधव अखेर गजाआड 

पहिली बातमी प्रीतिसंगम मध्येच 

वाई भुईंजसह  राज्यातील पोलिस ठाण्यांच्या रडारावरील  मोक्यातील आरोपी  बंटी जाधव अखेर गजाआड 


वाई भुईंज आणी राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांच्या रडारावर मोक्यातील आरोपी असलेला बंटी जाधव अखेर गजाआड 


पहिली बातमी प्रीतिसंगम मध्येच 

वाई / दौलतराव पिसाळ
  
वाई तालुक्यातील तडीपार आणी मोक्यातील प्रमुख आरोपी असलेला कुख्यात गुंड बंटी जाधवच्या सातारा एलसीबीच्या पथकाने प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पंजाब राज्यात जाऊन अखेर त्याच्या मुसक्या आवळुन गजा आड केल्याची माहिती वाई सह सातारा जिल्ह्यातील नागरिकांन पर्यंत पोहोचल्याने जिल्हा पोलिस प्रमुखांच्या सह एलसीबीचे प्रमुख अधिकारी आणी पोलिस कर्मचारी या सर्वांचे सर्व थरातुन कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि भुईंज ता, वाई येथील रहिवासी असलेला कुख्यात गुंड आणी स्वयम घोषीत भाई बंटी जाधव याने टोळीतील सहकार्याना हातासी धरून  भुईंज येथील आसले पुलावर राहत असणारा चव्हाण याचे अपहरण करून त्याचा खुण करुन मध्य  रात्री दिड वाजण्याच्या सुमारास भुईंज येथीलच स्मशान भूमीत त्याचा मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करुन त्याने पलायन केले होते याचा सुगावा पोलिसांना लागण्या आधीच दै, प्रीतिसंगमनेचव्हाण याचा खुण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करुन खुणाला वाचा फोडली होती त्या वेळी भुईंज गावासह मृत चव्हाण कुटुंबाने आणी वाई तालुक्यातील जनतेने दै, प्रितीसंगमचे आभार मानले होते.

या आधी काही महिन्यांपूर्वी  लॉक डाऊनच्या काळात वाई शहरात जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून  तडीपार असताना देखील 
बंटी जाधव याने पोलिसांना गुंगारा देऊन वाई शहरात चारचाकी वाहनातून आपल्या साथी दारासह प्रवेश करुन रविवार पेठ येथे टोळीच्या वर्चस्व वादातून लाठ्या काठ्या घेऊन दहशत माजवत समोरच्या प्रतिस्पर्धी वर विना परवाना  पिस्टल मधुन गोळ्या झाडून प्रचंड दहशत माजवली होती आणी वाई पोलिसांना काही कळण्या अगोदरच बंटी जाधव याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन करुन वाई पोलिसांन समोर तपासाचे आवाहन ऊभे केले होते याची गंभीर दखल  जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी घेऊन सातारा एलसीबीचे कर्तव्य दक्ष असलेले पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बंटी जाधव हवा आहे असे आदेश दिले होते तेव्हा पासूनच एलसीबीचे सर्व अधिकारी पोलिस कर्मचारी हे राज्यासह पराज्यात बंटी जाधवच्या मागावर होते एलसीबीच्या अधिकार्यांना बंटी हा नेपाळ मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावरुन ते नेपाळकडे रवाना होऊन पोहचले देखील पण बंटीला नेपाळ सिमेवरच  असताना सातारा एलसीबीचे पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच तो नेपाळला न जाता पंजाब राज्यात गेला आणी तेथेच एलसीबीच्या पथकाने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या हा सातारा पोलिसांचा फार मोठा विजय झाल्याने वाई तालुक्या सह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सातारा पोलिस दलाचे कौतुक केले आहे