धोम डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील  खानापुर जवळ भगदाड

धोम डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील  खानापुर गावा जवळ अकार्यक्षम बेजबाबदार  ऊप अभियंत्याच्या गलथान कारभारा मुळे  भगदाड .लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान .शेतकर्यान मध्ये संतापाची लाट ..

 वाई / दौलतराव पिसाळ दि ३० 


धोम धरण व्यवस्था पणाच्या गलथान कारभारा 
मुळे आणी अकार्यक्षम उप अभियंत्याच्या बेजबाबदार कारभारा मुळे वाई तालुक्यातील खानापुर गावातून १९७६ पासून जाणार्या धोम धरणाच्या डाव्या कालव्याला तब्बल  १० फुट  
 रुंद आणी २०फुट लांबीचे दि.३० च्या पहाटे ३ 
वाजण्याच्या सुमारास भले मोठे भगदाड पडल्याने जायगुडे वाडीच्या पुलाला महापुरा सारखी परस्थिती निर्माण झाल्याने पुलावरील 
वाहतुकीस धोका दायक बनल्याने वाहन चालकांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने 
खानापुर ग्रामस्थांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .ज्या ठिकाणी आज कालव्याला भगदाड पडले आहे त्याच ठिकाणी 
गेल्या पाच महिन्यात तिन वेळा कालव्याच्या मध्यभागी भले मोठे भगदाड पडले होते त्याही वेळी लाखो लिटर पाणी वाया जाऊन शासनाचे 
लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणी शेतकर्यांच्या जमीनी वाहुन जाण्याचा धोका निर्माण झाला होता त्या वेळी धोम धरणच्या 
ऊप अभियंत्यांनी तात्पुरती सिमेंट लावुन मल्लम पट्टी करुन कालवा घाई घाईने सुरू केल्याने आज त्याचे रुपांतर कालव्याला भगदाड पडण्यात झाले आहे येथील बेजबाबदार असणार्या ऊप अभियंत्यावर गुन्हे दाखल करुन करोडो रुपयांचे वाया गेलेल्या पाण्याचे पंच नामा करुन करोडो रुपयांची वसुली करावी अशी मागणी वाई तालुक्यातील 
जनतेसह खानापुर ग्रामस्थांन मधुन होत आहे 
एखाद्या शेतकर्यांने चोरुन स्वताच्या जमीनीतील 
पिकाला पाणी पाजले आणी याची खबर पाटकर्याला लागताच तो बांधावर पोहचतो आणी पंचनामा करुन चौपट पाणी पट्टीची दंडात्मक कारवाई करुन पैसे वसूल करतो त्या संमधीत शेतकर्यांने हि दंडात्मक रक्कम न भरल्यास ति रक्कम कारखान्याला गळीतास गेलेल्या उसाच्या बिलातुन परस्पर कारखाने कापून घेऊन ती रक्कम धोम धरण व्यवस्था 
पणाच्या ताब्यात देतात मग अकार्यक्षम आणी पंख्याखाली कार्यालयात बसुन शासनाची २४ 
तास गाडी वापरुन मलीदा खानार्या या ऊप अभियंत्या सह त्यांच्या टिमवर जिल्हाधिकारी 
धोम धरण कार्यकारी अभियंता आणी राज्य सरकारचे पाटबंधारे मंत्री काय कारवाई करणार 
असा संतप्त सवाल वाई तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे .या अभियंत्या वर कार्यकारी अभियंत्या वर कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात हायकोर्टात जाऊन 
दाद मागणार असल्याचा इशारा खानापुर ग्रामस्थांन सह वाई तालुक्यातील जनतेने दिला आहे .