वाईचे माजी डी.वाय.एस.पी दिपक हुंमरे यांच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होणार......?

वाईचे माजी डी.वाय.एस.पी दिपक हुंमरे यांच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होणार......?

वाई. दौलतराव पिसाळ दि.27

वाईचे माजी डी.वाय.एस.पी आणि सध्याचे पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त असणारे दिपक हुमरे यांच्यावर 40 हजार रुपयांची वाईच्या गोळीबार प्रकरणात न अडकवण्यासाठी ही खंडणी भुईंज येथील दोन तरुणांकडून जोशिविहिर येथील उड्डाण पुलाखाली घेतल्याने सातारा आणि पुणे जिल्ह्यातील पोलीस दलाला डाळींबा फासला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे...
          या घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख यांना समजताच एडिशनल एस.पी धीरज पाटील यांना अधिक चौकशीसाठी भुईंज पोलीस ठाण्यात पाठवले होते. त्यांनी शनिवारी तब्बल चार तास भुईंज पोलीस स्टेशन मध्ये बसून चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला आहे 40 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल दिपक हुमरे यांच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि शाम बुवा यांनी दिली. हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे