वाईत पुन्हा गॅगवार भडकले  तरुणावर तलवारींचे सपासप वार 

दोघांनी वार केल्याने खळबळ

वाईत पुन्हा गॅगवार भडकले  तरुणावर तलवारींचे सपासप वार 

वाईत पुन्हा गॅगवार भडकले  तरुणावर तलवारींचे सपासप वार 

दोघांनी वार केल्याने खळबळ


वाई  / दौलतराव पिसाळ 

वाईच्या एमआयडीसी मधील चांदणी चौका लगत रविवार पेठ येथील रहिवासी असलेला अक्षय निकम या तरुणा वर जुन्या भांडणातील राग मनात  धरुन त्याचा बदला घेण्यासाठी आणी त्याला कायमचे संपविण्या साठी अज्ञात तरुणांनी त्याच्या वर धारदार शस्त्राने दि, १५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केल्याने वाई शहरासह तालुक्यातील गावांन मध्ये खळबळ उडाली आहे त्या मुळे नामांकित वाई शहरात  पुन्हा टोळी युध्द सुरू होते कि काय अशी भीती वाईकर नागरिकांन सह तरुण वर्गाला  वाटत आहे .

सविस्तर वृत्त असे कि गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात वाई शहरात टोळीचा वर्चस्व वादातून संचार बंदीच्या काळात तडीपार असताना देखील बंटी जाधवने वाई पोलिसांना गुंगारा देऊन संध्याकाळच्या सुमारास वाई शहरात बेकायदेशीर प्रवेश करुन रविवार पेठेत आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राहत्या  घरा समोर गोळीबार  केला होता त्या वेळी या झालेल्या गोळीबाराच्या घटने मुळे संपूर्ण वाई शहरासह तालुक्यातील जनता भयभीत झाली 
होती पोलिसांनी त्या वेळी एसपी यांच्या मार्गदर्शनाखाली बंटी जाधव सोडुन दोन्ही गटातील आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांना गजाआड केले होते हे गॅगवार पुन्हा डोके वर काढू नये याची खबरदारी घेत  वाई पोलिसांनी दोन्ही टोळीच्या वटसप ग्रुप वर असणार्या सर्व रती महारथी सदस्यांना बोलावून तंबी देण्याचे काम केले होते या ऊपायामुळे दोन्ही ही टोळीवर पोलिसांनी वचक निर्माण करण्यास यश प्राप्त केले होते त्या मुळे वाई शहरात शांतता  निर्माण झाली होती.

असे असताना देखील तडीपार गुंड बंटी जाधवच्या भुईंज मधील टोळीने अचानक पणे डोके वर काढून तेथील च एका हॉटेल व्यवसायीकाचे अपहरण करुन त्याचा खुण करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत देखील कुख्यात गुंड बंटी जाधव याने सहकार्यानच्या मदतीने जाळुन टाकल्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात आढळून येते भुईंज पोलिसांनी यातील सर्व आरोपींना  एलसीबीच्या सहकार्याने गजाआड करण्यास यश मिळविले होते दोन्ही प्रतिस्पर्धी टोळ्यानवर वेळेत कारवाई केल्याचा आनंद पोलिस खात्यांना झाला अन आता वाई शहरात पुन्हा टोळी युध्द भडकणारच नाही असा आत्म विश्वास पोलिसांनी मनाशी बाळगला होता पण दुदैवाने दि, १५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाईच्या एमआयडीसीच्या चांदणी चौकात पुन्हा बंटी जाधवच्या प्रतिस्पर्धी टोळीतील अक्षय निकम राहणार पेटकर कॉलनी रविवार पेठ वाई याच्या वर अज्ञातांनी  धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले आहे.

त्याला स्थानिकांनी रुग्ण वाहिकेतुन ऊपचारा साठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिसांना लागताच ते घटना स्थळावर दाखल झाले त्या वेळी पोलिसांना फक्त रक्ताचा पडलेला सडा पाहवयास मिळाला पुढे  फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी वाईच्या डिवाय एसपी पोलिस निरीक्षक ऊप निरीक्षक पोलिस कर्मचारी यांच्या ताफ्याने बोपर्डी गावासह वाई  तालुक्यात अनेक ठिकाणी छापे टाकले पण आरोपी हे मिळुन न आल्याने ते रिकाम्या हाताने परतले पण सध्या तरी आरोपींनी पोलिसांना तपासाचे आवाहन ऊभे केले आहे पण सतत होणार्या या टोळी युध्दा मुळे वाई शहरा सह तालुक्यातील नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सुसंस्कृत वाई शहरात अशा घडणार्या वारंवार  अमानुष घटनांन  मुळे वाई शहर दिवसे दिवस गुन्हेगारांचे केंद्र बनत चालल्याने पुर्वीची पेंशनन  धारकांची असलेली  नामांकीत वाई आज तरी अट्टल गुंड आणी गुन्हेगारांच्या विळख्यात अडकलेली दिसत आहे याचा मनस्ताप वाईकर नागरिकांना होताना दिसत आहे