जिल्ह्याचे जेष्ठ नेते सुरेश वीर यांचे निधन

जिल्ह्याचे जेष्ठ नेते सुरेश वीर यांचे निधन

वाई / दौलतराव पिसाळ 

जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.अध्यक्ष,किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांची आज दि.१७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.  

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात  मोठा वाटा होता.अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता (कवठे ता.वाई) येथील वैकुंठ स्मशानभूमीत होईल.