वाईच्या कडेगाव यात्रेत गाड्याचे दगडी चाक छाती वरुन गेल्याने सागर मुरुमकर जागीच ठार   

वाईच्या कडेगाव यात्रेत गाड्याचे दगडी चाक छाती वरुन गेल्याने सागर मुरुमकर जागीच ठार   

वाईच्या कडेगाव यात्रेत गाड्याचे दगडी चाक छाती वरुन गेल्याने सागर मुरुमकर जागीच ठार   


वाई / दौलतराव पिसाळ  


कडेगाव ता.वाई येथील ग्राम दैवत असलेल्या जानाईदेवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी निघणाऱ्या झेंडा बैल गाड्याचे चाक  सागर माधवराव मुरुमकर या तरुणाच्या छातीवरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने यात्रेवर शोककळा पसरली आहे .सागरच्या घरात आणी गावातील घराघरात यात्रे निमित्त आनंदाचे वातावरण असतानाच सागरच्या दुःखद निधनाची बातमी गावाच्या घरा घरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वार्यासारखी पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे .
वाई तालुक्यातील कडेगाव या गावाचे ग्रामदैवत असलेल्या जानुबाई देवीची वार्षिक यात्रा एप्रिल महिन्यातील दि.२३ आणी २४ रोजी भरविण्याचे   नियोजन ग्रामस्थांनी केले होते त्याचा पारंपारिक पध्दतीने यात्रेचा    मुख्य दिवस शनिवार दि. २३ हा आला होता या दिवशी रुढी परंपरे नुसार देवीच्या मंदिरा पासून तयार केलेला दगडी चाकांनवर सुसर सारख्या आकाराचे लाकूड असते त्या वर ऊंच असा खांब बसवलेला असतो त्याच्या ऊंचीवर मोठा  झेंडा लावलेला असतो अशा पध्दतीने तयार केलेल्या या  गाड्यावर अंदाजे २५ ते ३० भाविक ग्रामस्थ बसलेले असतात हा बलाढ्य गाडा    बैलांच्या साह्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघुन तो गावाच्या शिवेपर्यत नेहण्यात आला अशी येथील परंपरा आहे शिवे पासुन पुन्हा गावा कडे हा गाडा परतत असताना तो रस्ता सोडून शेतात घालण्यात आला त्या वेळी हा गाडा थोरवे यांच्या शेतात अडकल्याने तो बाहेर काढन्या साठी बैलांनी हिसका दिल्याने गाड्याने झोला खाल्याने गाड्याच्या ऊंचीवर बसलेले सागर माधवराव मुरुमकर हे खाली कोसळले  गाड्या भोवती नागरिकांची गर्दी खुपच असल्याने काही समजण्या आधीच त्यांच्या छाती वरुन दगडी चाक गेल्याने सागर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला .त्याच्या पश्चात पत्नी आणी एक ८ 
वर्षाचा मुलगा आहे .   

या भिषण दुर्घटनेची  माहिती कडेगावचे  पोलिस पाटील अक्षय टिके यांनी तातडीने  वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मोबाईल वरुन कळविली .भरणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ हवलदार शिवाजी वायदंडे 
रामदास पवार एच.एस.शिंदे आणी गहीत यांना तातडीने घटना स्थळावर जाण्याचे आदेश दिले . तो पर्यंत मयत सागर माधवराव मुरुमकर वय ३८ यास गावकर्यांनी वाईच्या खाजगी रुग्णालयात आणले असता तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले .पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून 
तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवुन शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह अंतविधीसाठी  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .या दुर्घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असुन त्याचा अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत .