वाईत भाजपला धक्का,राष्ट्रवादीच्या गोटात जल्लाेष ;-नगराध्यपदी अनिल सावंत

लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर भारतीय जनता पक्षातून निवडूण आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे.

वाईत भाजपला धक्का,राष्ट्रवादीच्या गोटात जल्लाेष ;-नगराध्यपदी अनिल सावंत

वाईत भाजपला धक्का नगराध्यपदी अनिल सावंत - राष्ट्रवादीच्या गोटात जल्लाेष 


वाई, दि. ५ :

वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादीपुरस्कृत तिर्थक्षेत्र  विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष असलेले अनिल सावंत य‍ांनी स्विकारले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अातिषबाजी करित आनंदोस्तव साजरा केला.
 

लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर भारतीय जनता पक्षातून निवडूण आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्रधिकरणाच्या सदस्य होण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा पदभार नियमानुसार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्विकारला. मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी यांनी त्यांना नगराध्यक्षपदाचा पदभार सुपूर्त केला.


     य‍‍ावेळी नगराध्यक्ष सावंत म्हणाले, आमदार मकरंद पाटिल य‍ांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या काळात नगराध्यक्ष काय काम करू शकतो हे निश्चीत समजेल असे काम करु. प्रलंबीत विकासकामे व वाईच्या विकासासाठि सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मिळालेल्या संधीला योग्य न्याय देन्याचा कसोशीने प्रयत्न करु, असे ते म्हणाले.


   नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्याने सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लाषाचे वातावरण पसरले आहे. यावेळी आघाडिचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक प्रदिप चोरगे, चरण गाकवाड, भारत खामकर, किशोर बागुल, राजेश गुरव, संग्राम पवार, दिपक अोसवाल, अँड. श्रीकांत चव्हाण, कांताराम जाधव, सौ. सिमा नायकवडी, सौ. शितल शिंदे, सौ. स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, सौ. आरती कांबळे, मनिष भंडारे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे, विकास जाधव आदींसह अनेकजण उपस्थित होते. त्यांचे र‍ाष्ट्रवादिच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुछ, शाल श्रिफळ देवुन तसेच दुरध्वनीवरून अभिनंदन केले.