मृताच्या अंत्यविधी साठी लावलेला जुजबी कर घेऊ नका.. !

वाई नगर परिषदेने कोरोनो मुळे मृत्यू झाल्यास त्यावर मोफत अंत्यसंस्कार करावेत 7 हजार 200 रुपये असा कर आकारू नये अन्यथा शिवसेना आंदोलन करणार : अनिल शेंडे...

मृताच्या अंत्यविधी साठी लावलेला जुजबी  कर घेऊ नका.. !

दौलतराव पिसाळ / वाई 

गेल्या मार्च महिन्या पासून वाई शहरासह तालुक्यातील गावा गावां मधील कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण झाल्याने त्यातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या अंत्यविधी साठी वाई नगरपरिषदे कडून 7 हजार 200 रु... वसूल केले जातात. मगच मृतांना अग्नी दिला जातो. अशी प्रथा गेली वर्षभर सुरू असल्याच्या तक्रारी वाई तालुका शिवसेना कार्यालयात प्राप्त झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले. व त्यांनी स्मशान भूमीत जाऊन कोरोनो रुग्णांवर अंत्यविधी साठी किती पैसे घेतले जातात याची खात्री झाल्यावर आज वाई शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष:अनिल शेंडे, तालुका उपाध्यक्ष:विवेक भोसले, शहराध्यक्ष:गणेश जाधव, किरण खामकर, योगेश चंद्रस, नितीन पानसे, संतोष पोपळे, सुरेश चव्‍हाण, अभिषेक पानसे, संदीप साळुंखे, पंकज शिंदे या कार्यकर्त्यांनी वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांना लेखी निवेदन देऊन कोरोनो पॉझिटिव मृत रुग्णांच्या अंत्यविधी साठी 7 हजार 200 रुपये एवढी मोठी रक्कम घेण्याचे तात्काळ बंद करावे शासनाने कोविड साठी दिलेल्या लाखो रुपयांच्या निधीतून हा खर्च करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदना द्वारे आज करण्यात आली आहे. पैसे घेण्याचे बंद न केल्यास शिवसेना शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 


                आज संपूर्ण जग एका विचित्र अवस्थेतून जात आहे. गेल्या वर्षभरा पासून जगाला कोविड संकटाने विळखा टाकला आहे. त्यात वाई तालुक्यातील शेकडो लोकांचे मृत्यू झाल्याने अनेक प्रपंच उघड्यावर आले आहेत. अशी महाभयंकर संकटे वाई तालुक्यावर आल्याने तालुक्यातील जनता या संकटाचा सामना करत हतबल होऊन प्रसंगी उपाशी राहून कुटुंबातील माणसं जपण्याचा व जगविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या मार्च महिन्या पासून कोरोनो रोगाने वाई तालुक्या थैमान घातले आहे. हे थैमान थोपवण्या साठी महसूल, वाई पंचायत समिती, आरोग्य विभाग, पोलीस, असे सर्व प्रशासन एकत्र येऊन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत महाराष्ट्रातील बहुतेक सर्व  नगरपालिका नगरपरिषद या कोविड मुळे मृत झालेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करत आहेत. मात्र हे अंत्यसंस्कार सर्वत्र मोफत केले जात आहेत. यासाठी कोरोनो मृत रुग्णाच्या नातेवाईकांच्या कडून कसलाही खर्च वसूल केला जात नाही. किंवा जबरदस्तीने सुद्धा घेतला जात नाही. हा खर्च पूर्णपणे नगरपालिका किंवा नगर परिषद करीत असताना वाई शहरात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. वाई नगर परिषद कोरनो मृत रुग्णांच्या नातेवाइकांकडून अंत्यविधी करण्यासाठी तब्बल 7 हजार 200 रुपय... खर्च घेत आहे. हा खर्च दे नाही तोपर्यंत मृतांवर अंत्यसंस्कार केले जात नाही. असा फंडा वाई नगरपरिषदेने गेले वर्षभर सुरू केला आहे मुळात कोणत्याही अंत्यविधीला एवढे पैसे लागत नाही आणि इतर गावात देखील विविध संस्था आणि संघटना हे काम मोफत करत असताना वाई नगरपरिषद याचे शुल्क का घेत आहेत असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. गेले दोन वर्ष कोविड काळापासून सातारा जिल्हाधिकारी यांनी कोरोनो रोग थोपवण्या साठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढून कधी लॉक डाऊन कधी संचारबंदी सर्व उद्योगधंदे आणि दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून नागरिकांना घरातच बसण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नागरिकांना जगणे मुश्कील झाले. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने पैसा जवळ आला नाही. अशा वेळी देखील कोणत्याही करामध्ये कोणतीही सवलत वाई नगर परिषद देत नसताना परत हा मृताच्या अंत्यविधी साठी लावलेला जुजबी हा कर आणि भुर्दंड लोकांच्या माथी का मारला जात आहे. असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे वाई नगर परिषदेने कोरनो मृतांच्या नातेवाइकां कडून अंत्यविधी साठी 7 हजार 200 रुपये घेत असल्याची ही लूट थांबवून अंत्यसंस्कार मोफत करण्यात यावे नाहीतर वाई शहर आणि तालुका शिवसेना तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात तालुका अध्यक्ष-अनिल शेंडे, उपाध्यक्ष:विवेक भोसले, शहराध्यक्ष:गणेश जाधव, किरण खामकर, योगेश चंद्रस, नितीन पानसे, संतोष पोपळे, सुरेश चव्हाण, अभिषेक पानसे, संदीप साळुंखे, पंकज शिंदे या कार्यकर्त्यांनी दिला आहे.