बलकवडी धरणाला सुरक्षा रक्षक नसल्याने पसरणी येथील तरुणाचा 150 फूट सांडव्यावरून कोसळून मृत्यू.....

बलकवडी धरणाला सुरक्षा रक्षक नसल्याने पसरणी येथील तरुणाचा 150 फूट सांडव्यावरून कोसळून मृत्यू.....

बलकवडी धरणाला सुरक्षा रक्षक नसल्याने पसरणी येथील तरुणाचा 150 फूट सांडव्यावरून कोसळून मृत्यू.....

दौलतराव पिसाळ/वाई प्रतिनिधी

दि.23

पसरणी तालुका वाई येथील अजय विजय महागडे वय.22 हा काल दिनांक.22 रोजी आपल्या साथ मित्रांसमवेत वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर पायथ्याला असणारे निसर्गाने नटलेल्या बलकवडी येथील बलकवडी धरण पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी अजय महांगडे हा धरणाच्या सांडव्या जवळ उभा असताना त्याचा तोल गेल्याने तो धरणाच्या सांडव्यावरून खाली पडला त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना समजताच त्यांनी तातडीने संतोष शेलार बी.वी. धायगुडे यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती मयत अजय महांगडे त्याच्या मित्राकडून घेऊन परिस्थितीची पाहणी करून उळुंब येथील पुलाजवळ असलेल्या कोळी समाजातील नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अजयचा टायर ट्यूब च्या साह्याने मृतदेह शोधून बाहेर काढला बलकवडी धरणावर नेमलेले दोन सुरक्षा रक्षक हे कधीच बलकवडी धरणावर उपस्थित नसतात नुसत्या रजिस्टरला सह्या करून महिन्याचा पगार लाटण्याचा काम करतात अशा या बेजाबदार सुरक्षा रक्षकांवर नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पसरणी येथील प्रतिष्ठित नागरिक घटनास्थळी उपस्थित होते....