शेंदुरजणेत गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्या  हरणाचा अखेर मृत्यू    

शेंदुरजणेत गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्या  हरणाचा अखेर मृत्यू    

वाईच्या  शेंदुरजणे गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्या  हरणाचा अखेर मृत्यू 
  
वाई / दौलतराव पिसाळ  

वाई तालुक्यातील शेंदुरजणे या गावातील बौध्द वस्तीच्या पुर्वेस एक हरण फिरत असताना गावातील गावठी कुत्र्यांच्या कळपाने त्या वर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यावर वन विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने ऊपचार केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने 
शेंदुरजणे येथील तरुणांन मधुन हळहळ व्यक्त केली जात आहे 


सविस्तर वृत्त असे कि शेंदुरणे ता.वाई येथील 
बौध्द वस्तीच्या पूर्वेला एक हरीण गावठाण
हद्दीत आले होते त्या वर गावातील गावठी कुत्र्याच्या कळपाने हल्ला केला या हल्ल्यात ते हरिण गंभीर जखमी झाल्याचे पाहुन गावातील अभिलाष जगताप अक्षय जगताप  आणी राज मुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले त्या वेळी ते गंभीर जखमी झाल्याचे पाहुन वरील कार्यकत्यांनी या घटनेची माहिती वाई वन विभागाचे प्रमुख अधिकारीअसलेले महेश झांझुर्णे यांना दुरध्वनी व्दारे कळविली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वनरक्षक वैभव शिंदे आणी वनपाल सुरेश  पटकारे यांना जखमी हरिण ताब्यात घेण्या साठी शेंदुरजणे या गावात 
पाठवले वरील वन कर्मचार्यांनी जखमी हरिण ताब्यात घेऊन त्यास ऊपचारा साठी वाई येथील पशुवैदकीय दवाखान्यात आणी डॉ.सुर्यवंशी  यांच्या कडे नेहले तेथे त्याच्या  वर ऊपचार करण्यात आले शास्वत ऊपचार झाल्याने वन कर्मचार्यांनी त्यास वरखडवाडीतील वन विभागाच्या जंगलात सोडले असता ते जेमतेम ५० फुट अंतरा पर्यंत चालले आणी ते घाबरलेले असल्याने  ते खाली बसले तेथेच त्याने प्राण सोडले याची माहिती शेंदुरजणे येथील तरुणांना समजताच त्यांच्या कडून  हळहळ व्यक्त केली जात आहे