वाई एमआयडीसी मधील कॅनॉलवर आंघोळी साठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडुन मृत्यू 

वाई एमआयडीसी मधील कॅनॉलवर आंघोळी साठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडुन मृत्यू 

वाई एमआयडीसी मधील कॅनॉलवर आंघोळी साठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडुन मृत्यू 

वाई / दौलतराव पिसाळ


वाई एमआयडीसी मधील दोन बेपत्ता कामगारा पैकी एकाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात  आढळून आला तर दुसर्याचा शोध वाई पोलिस घेत आहेत  या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे  वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई  एमआयडीसी मध्ये यश इंडस्ट्रीज मध्ये नरेश  धर्मदासजी वय २० राहणार ३२ ऐ इंदिरा झील सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट दिल्ली आणी त्याचा मित्र बिरु श्रीपाल असे दोघेजण कामाला होते पण इंडस्ट्रीज मध्ये नेमून  दिलेले काम पसंत नसल्याने ते दोघेही दि.६|६|२१ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामा वरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते

संध्याकाळ पर्यंत ते पुन्हा कंपनीत परत न आल्याचे कंपनीचे मॅनेजर असलेले रणजित बबन मंडले यांना समजले त्यांनी सह कर्मचार्यांना सोबत घेऊन त्या बेपत्ता कामगारांचा शोध घेतला असता ते मिळुन न आल्याने ते दोन्ही ही कामगार बेपत्ता असल्याची तक्रार सायंकाळी ६|४६ वाजण्याच्या सुमारास वाई पोलिस ठाण्यात दिली तक्रार दिल्या नंतर काही वेळातच कंपनीच्या सिकृटीचा फोन आला की रविवार पेठ मोती बाग येथील धोम डाव्या कालव्यात एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत आलेला आहे हा मृतदेह आपण दाखल केलेल्या मिसींग पैकी एका मुलाचा हा मृतदेह असावा असे सांगीतले नंतर मॅनेजर घटना स्थळावर तातडीने दाखल झाले त्यांनी पाहिले असता कामगार नरेश धर्मदासजी याचाच मृतदेह असल्याची त्यांची खात्री झाली पण हा मित्र बिरु श्रीपाल याच्या सोबत कालव्यात आंघोळी साठी गेला होता त्याला पोहता येत नसल्याने त्याचा कालव्यात  बुडुन मृत्यू झाला  पण त्याचा मित्र असलेला बिरु श्रीपाल हा अद्याप बेपत्ता आहे या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्यात कळविल्यावर नंतर तातडीने प्रशांत शिंदे धुळे किरण निंबाळकर हे पोलिस कर्मचारी  घटना स्थळावर पोहोचले त्यांनी मृतदेह कालव्यातून बाहेर काढुन त्याचा पंचनामा करून  तो वाईच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविला आहे तर बिरुच्या   मृतदेहाचा पोलिस  शोधत असताना अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे याची तक्रार रणजित बबन मंडले यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार आर.झेड कोळी करीत आहेत पण कामगार असलेल्या या  दोन तरुणांचा कालव्यात बुडुन मृत्यू झाल्याने एमआयडीसी मधील कामगार वर्गा मध्ये खळबळ उडाली आहे तर मृत्यू विषयी हळहळ व्यक्त होत आहे