वेळे येथे रानडुकरांच्या हल्ल्यात वयोवृद्ध आजोबा ठार

वेळे येथे रानडुकरांच्या हल्ल्यात वयोवृद्ध आजोबा ठार
वेळे येथे रानडुकरांच्या हल्ल्यात वयोवृद्ध आजोबा ठार

वाई/ दौलतराव पिसाळ 

वेळे ता, वाई गावच्या शेत शिवारात एका ८० 
वर्षीय वयोवृद्धावर रानडुकरांनी रात्रीच्या वेळेस केलेल्या हल्ल्यात ते त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने वेळे गावात हळहळ व्यक्त होत आहे 

भुईंज पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार सुनील पोळ यांनी दिलेली माहीती अशी की वेळे ता ,वाई येथील रहिवासी असलेले हरीबा कृष्णा नलावडे वय ८० हे दि, १५ रोजीच्या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते वेळे गावच्या पश्चिमे कडील शेत शिवारातील गट नं, २६० मध्ये त्यांच्या मालकीच्या छपरा मध्ये झोपण्या साठी गेले होते त्या वेळी दि, १६ च्या मध्य रात्री रानडुकरांनी गाठ झोपेत असतानाच त्यांच्या वर हल्ला चढवला हा हल्ला परतावून 
लावण्याचा प्रयत्न करीत असताना खवळलेल्या रानडुकरांनी त्यांच्या छातीत धडका देऊन गंभीर जखमी केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ते घराकडे लवकर न आल्याने नातु अक्षय अनील नलवडे वय १८ हा 
छपराकडे पाहण्या साठी गेले असता त्याला आजोबा बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने त्यांना ऊपचारा साठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहले असता तेथील ऊपस्थित डॉक्टर विजय ठोंबरे यांनी मृत घोषित केले 
याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना मिळताच त्यांनी हवलदार एम, एस, तोरडमल यांना पाठविले