वाठारजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाठारजवळ पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला.

वाठारजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाठारजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू 

कराड/प्रतिनिधी : 

           वाठार ता. कराड येथे पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. 

         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाठारजवळ पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर एका बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने महामार्गावरील प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनी मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

        दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. तसेच घटनेतील मृत बिबट्या हा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मृत बिबट्यावर वनविभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले.