अनोखे : ब्रिटिश संसदेत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव, श्लोक पठणात ९ देशांचा सहभाग; ब्रिटिश खासदार व राजदूतांच्या उपस्थितीत लंडनमध्ये घुमले गीतेचे श्लोक

कुरुक्षेत्र/लंदन-ब्रिटिश संसदेत शुक्रवारपासून तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ब्रिटिश खासदार व नऊ देशांतील राजदूतांच्या उपस्थितीत गीतेच्या श्लोकांचे पठण करण्यात आले. या वेळी गीतेचे जीवनात महत्त्व सांगण्यात आले. या महोत्सवात ब्रिटिश पंतप्रधान व मंत्री सहभागी नव्हते. परंतु रशिया, इस्रायल, बांगलादेश, बहारिन, इटली, कॅनडा, मॉरिशस, सायप्रस व नेपाळमधील राजदूतांचा सहभाग होता. या महोत्सवात हरियाणाचे उद्योगमंत्री विपुल गाेयल यांचाही सहभाग होता. संचालन गुरुग्राम विद्यापीठाचे कुलगुरू मार्कंडेय यांनी केले.ब्रिटिश खासदार म्हणाले, हा एक ऐतिहासिक क्षणयूकेमध्ये सत्तारूढ काँझर्व्हेटिव्ह पार्टीचे व्हाइस चेअरमन व ब्रिटिश खासदार वीरेंद्र शर्मा म्हणाले, हा ऐतिहासिक क्षण आहे. पवित्र गीता ग्रंथातील संदेश समजावून घेण्याची संधी मिळाली. आज ज्या प्रकारचे प्रदूषित वातावरण निर्माण झाले आहे, त्यापासून काहीसे मुक्त होतो व आनंददायी जीवन जगण्याचा महत्त्वाचा संदेश गीतेतून मिळतो. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today ब्रिटिश संसदेत राजदूतांच्या उपस्थितीत गीता पठण


 अनोखे : ब्रिटिश संसदेत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव, श्लोक पठणात ९ देशांचा सहभाग; ब्रिटिश खासदार व राजदूतांच्या उपस्थितीत लंडनमध्ये घुमले गीतेचे श्लोक

कुरुक्षेत्र/लंदन-ब्रिटिश संसदेत शुक्रवारपासून तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ब्रिटिश खासदार व नऊ देशांतील राजदूतांच्या उपस्थितीत गीतेच्या श्लोकांचे पठण करण्यात आले. या वेळी गीतेचे जीवनात महत्त्व सांगण्यात आले. या महोत्सवात ब्रिटिश पंतप्रधान व मंत्री सहभागी नव्हते. परंतु रशिया, इस्रायल, बांगलादेश, बहारिन, इटली, कॅनडा, मॉरिशस, सायप्रस व नेपाळमधील राजदूतांचा सहभाग होता. या महोत्सवात हरियाणाचे उद्योगमंत्री विपुल गाेयल यांचाही सहभाग होता. संचालन गुरुग्राम विद्यापीठाचे कुलगुरू मार्कंडेय यांनी केले.

ब्रिटिश खासदार म्हणाले, हा एक ऐतिहासिक क्षण
यूकेमध्ये सत्तारूढ काँझर्व्हेटिव्ह पार्टीचे व्हाइस चेअरमन व ब्रिटिश खासदार वीरेंद्र शर्मा म्हणाले, हा ऐतिहासिक क्षण आहे. पवित्र गीता ग्रंथातील संदेश समजावून घेण्याची संधी मिळाली. आज ज्या प्रकारचे प्रदूषित वातावरण निर्माण झाले आहे, त्यापासून काहीसे मुक्त होतो व आनंददायी जीवन जगण्याचा महत्त्वाचा संदेश गीतेतून मिळतो.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
ब्रिटिश संसदेत राजदूतांच्या उपस्थितीत गीता पठण