अमेरिकी खासदारांचा फेसबुकवर निशाणा; म्हणाले- कंपनीची वर्तणूक आगकाडीने घराला आग लावून शिकत असल्याचे म्हणणाऱ्या मुलासारखी

वाॅशिंग्टन - साेशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने दाेन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला जवळ आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याबाबत विधान केले हाेते. या कामात कंपनीला किती यश आले, हे अजून स्पष्ट झालेले नाही; परंतु या मुद्यावर अमेरिकेत दाेन माेठ्या राजकीय पक्षांचे सूर एकसारखे जरूर झाले आहेत. तसेच कंपनी पुढील वर्षी क्रिप्टाे करन्सी लिब्रा लाॅंच करणार असल्याची घाेषणा फेसबुकने केली आहे. फेसबुकच्या या याेजनेवर अमेरिकी संसद सिनेटच्या बंॅकिंग कमिटीने मंगळवारी सुनावणी केली. त्यात दाेन्ही माेठ्या पक्षांकडून कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुनावणीवेळी फेसबुकचे एक्झिक्युवटिव्ह डेव्हिड मार्कस हेदेखील उपस्थित हाेते. या वेळी डेमाेक्रॅटिक पक्षाचे सिनेटर शेराॅड ब्राऊन म्हणाले की, आमचा फेसबुकवर विश्वास राहिलेला नाही. कारण संबंधित कंपनीवर सातत्याने विविध प्रकरणांवर टीका हाेत आहे. तसेच फेसबुकची वर्तणूक हाती आगपेटी लागलेल्या व त्याच आगपेटीने घराला वारंवार आग लावून ‘आम्ही शिकत आहाेत’ असे पुन्हा-पुन्हा म्हणणाऱ्या मुलासारखी आहे. त्यामुळे कंपनीने नवे व्यवसाय माॅडेल सादर करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता केली पाहिजे, तर काेणत्याही उद्याेगात सहापैकी चार माेठ्या शाखांची मालकी असेल तर त्याला माेनाेपाॅली (एकाधिकार) म्हणतात. मात्र, निकाेप व्यावसायिक वातावरणासाठी हा प्रकार अयाेग्य ठरताे, असे मत रिपब्लिकन सिनेटर जाेए नेगुसे यांनी मांडले. त्यावर कंपनीचे एक्झिक्युटिव्ह मार्कस यांनी नियामकांची मंजुरी मिळत नाही ताेपर्यंत कंपनी आपली करन्सी सादर करणार नाही, असे सांगितले. या विषयावर आम्हाला खूप काम करायचेय व त्यासाठी नागरिकांचा विश्वास जिंकावा लागेल, हे आम्ही जाणताे. ‘लिब्रा’साठी जमवलेला युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे व त्याचा गैरवापर हाेणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही मार्कस यांनी स्पष्ट केले.‘लिब्रा’वर सुनावणीनंतर बिटकाॅइनमध्ये ११% घसरणबिटकाॅइन ही सध्या सर्वात महाग क्रिप्टाे करन्सी आहे. मात्र, अमेरिकी संसदेत फेसबुकच्या ‘लिब्रा’ करन्सीवर सुनावणी झाल्यानंतर बिटकाॅइनच्या मूल्यात ११ % घसरण दिसून आली, तर एक ‘लिब्रा’ ची किंमत कमी हाेऊन ९,५९० डाॅलर्स (६.६० लाख) झाली. कारण आगामी काळात अमेरिका क्रिप्टाे करन्सीबाबत कठाेर पावले उचलू शकते, असे बिटकाॅइनच्या गुंतवणूकदारांना वाटत आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today US MPs target Facebook; He said - Like the children who say that the behavior of the company is on the basis of family planning


 अमेरिकी खासदारांचा फेसबुकवर निशाणा; म्हणाले- कंपनीची वर्तणूक आगकाडीने घराला आग लावून शिकत असल्याचे म्हणणाऱ्या मुलासारखी

वाॅशिंग्टन - साेशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने दाेन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला जवळ आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याबाबत विधान केले हाेते. या कामात कंपनीला किती यश आले, हे अजून स्पष्ट झालेले नाही; परंतु या मुद्यावर अमेरिकेत दाेन माेठ्या राजकीय पक्षांचे सूर एकसारखे जरूर झाले आहेत. तसेच कंपनी पुढील वर्षी क्रिप्टाे करन्सी लिब्रा लाॅंच करणार असल्याची घाेषणा फेसबुकने केली आहे. फेसबुकच्या या याेजनेवर अमेरिकी संसद सिनेटच्या बंॅकिंग कमिटीने मंगळवारी सुनावणी केली. त्यात दाेन्ही माेठ्या पक्षांकडून कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुनावणीवेळी फेसबुकचे एक्झिक्युवटिव्ह डेव्हिड मार्कस हेदेखील उपस्थित हाेते. या वेळी डेमाेक्रॅटिक पक्षाचे सिनेटर शेराॅड ब्राऊन म्हणाले की, आमचा फेसबुकवर विश्वास राहिलेला नाही. कारण संबंधित कंपनीवर सातत्याने विविध प्रकरणांवर टीका हाेत आहे. तसेच फेसबुकची वर्तणूक हाती आगपेटी लागलेल्या व त्याच आगपेटीने घराला वारंवार आग लावून ‘आम्ही शिकत आहाेत’ असे पुन्हा-पुन्हा म्हणणाऱ्या मुलासारखी आहे. त्यामुळे कंपनीने नवे व्यवसाय माॅडेल सादर करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता केली पाहिजे, तर काेणत्याही उद्याेगात सहापैकी चार माेठ्या शाखांची मालकी असेल तर त्याला माेनाेपाॅली (एकाधिकार) म्हणतात. मात्र, निकाेप व्यावसायिक वातावरणासाठी हा प्रकार अयाेग्य ठरताे, असे मत रिपब्लिकन सिनेटर जाेए नेगुसे यांनी मांडले. त्यावर कंपनीचे एक्झिक्युटिव्ह मार्कस यांनी नियामकांची मंजुरी मिळत नाही ताेपर्यंत कंपनी आपली करन्सी सादर करणार नाही, असे सांगितले. या विषयावर आम्हाला खूप काम करायचेय व त्यासाठी नागरिकांचा विश्वास जिंकावा लागेल, हे आम्ही जाणताे. ‘लिब्रा’साठी जमवलेला युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे व त्याचा गैरवापर हाेणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही मार्कस यांनी स्पष्ट केले.


‘लिब्रा’वर सुनावणीनंतर बिटकाॅइनमध्ये ११% घसरण
बिटकाॅइन ही सध्या सर्वात महाग क्रिप्टाे करन्सी आहे. मात्र, अमेरिकी संसदेत फेसबुकच्या ‘लिब्रा’ करन्सीवर सुनावणी झाल्यानंतर बिटकाॅइनच्या मूल्यात ११ % घसरण दिसून आली, तर एक ‘लिब्रा’ ची किंमत कमी हाेऊन ९,५९० डाॅलर्स (६.६० लाख) झाली. कारण आगामी काळात अमेरिका क्रिप्टाे करन्सीबाबत कठाेर पावले उचलू शकते, असे बिटकाॅइनच्या गुंतवणूकदारांना वाटत आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
US MPs target Facebook; He said - Like the children who say that the behavior of the company is on the basis of family planning