आता भूतानमध्येही चालणार 'रुपे' कार्ड

थिम्फू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये "रुपे' कार्डचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन करताना त्यांनी या कार्डचा वापर करून खरेदीही केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये आले.  भूतानबरोबरील द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर थिम्फू येथील ऐतिहासिक सिमटोका झॉंग या गढीमध्ये भारत आणि भूतानदरम्यान नऊ सामंजस्य करारांवर आणि एका वीजखरेदी करारावर सह्या झाल्या. ही गढी 1629 मध्ये बांधण्यात आली होती. या गढीमध्ये प्रथमच सामंजस्य करार आणि उद्‌घाटन कार्यक्रम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण दहा करारांशिवाय मोदी यांच्या उपस्थितीत मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे आणि "इस्रो'ने बांधलेल्या प्रक्षेपण केंद्राचेही उद्‌घाटन झाले. याशिवाय, भारत आणि भूतानमधील 50 वर्षांच्या जलविद्युत सहकार्याचे प्रतीक म्हणून विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले.  दरम्यान, मोदींचे स्वागत करण्यासाठी लोटे त्सेरिंग हे स्वत: विमानतळावर उपस्थित होते. या विशेष स्वागतासाठी मोदींनी त्यांचे आभार मानले. मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आणि नंतर रस्त्यांवरही नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी भारतीय वंशाचे नागरिकही मोठ्या संख्येने आले होते. पंतप्रधान म्हणून मोदींची भूतानला ही दुसरी भेट आहे.  सिंगापूरनंतर भूतानच... रुपे कार्डचा वापर होणारा भूतान आता सिंगापूरनंतरचा दुसरा देश ठरणार आहे. रुपे कार्डच्या वापराचा दोन टप्प्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय बॅंका रुपे कार्ड वितरीत करतील आणि त्यांचा वापर भूतानमध्ये प्रवासासाठी आलेले भारतीय करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात भूतानमधील बॅंकांना हे कार्ड भारतात प्रवासासाठी जाणाऱ्या भूतानी नागरिकांना देण्याचे अधिकार दिले जातील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.    News Item ID: 599-news_story-1566051296Mobile Device Headline: आता भूतानमध्येही चालणार 'रुपे' कार्डAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: थिम्फू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये "रुपे' कार्डचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन करताना त्यांनी या कार्डचा वापर करून खरेदीही केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये आले.  भूतानबरोबरील द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर थिम्फू येथील ऐतिहासिक सिमटोका झॉंग या गढीमध्ये भारत आणि भूतानदरम्यान नऊ सामंजस्य करारांवर आणि एका वीजखरेदी करारावर सह्या झाल्या. ही गढी 1629 मध्ये बांधण्यात आली होती. या गढीमध्ये प्रथमच सामंजस्य करार आणि उद्‌घाटन कार्यक्रम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण दहा करारांशिवाय मोदी यांच्या उपस्थितीत मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे आणि "इस्रो'ने बांधलेल्या प्रक्षेपण केंद्राचेही उद्‌घाटन झाले. याशिवाय, भारत आणि भूतानमधील 50 वर्षांच्या जलविद्युत सहकार्याचे प्रतीक म्हणून विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले.  दरम्यान, मोदींचे स्वागत करण्यासाठी लोटे त्सेरिंग हे स्वत: विमानतळावर उपस्थित होते. या विशेष स्वागतासाठी मोदींनी त्यांचे आभार मानले. मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आणि नंतर रस्त्यांवरही नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी भारतीय वंशाचे नागरिकही मोठ्या संख्येने आले होते. पंतप्रधान म्हणून मोदींची भूतानला ही दुसरी भेट आहे.  सिंगापूरनंतर भूतानच... रुपे कार्डचा वापर होणारा भूतान आता सिंगापूरनंतरचा दुसरा देश ठरणार आहे. रुपे कार्डच्या वापराचा दोन टप्प्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय बॅंका रुपे कार्ड वितरीत करतील आणि त्यांचा वापर भूतानमध्ये प्रवासासाठी आलेले भारतीय करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात भूतानमधील बॅंकांना हे कार्ड भारतात प्रवासासाठी जाणाऱ्या भूतानी नागरिकांना देण्याचे अधिकार दिले जातील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.    Vertical Image: English Headline: Use of Rupay Card Also in BhutanAuthor Type: External Authorपीटीआयनरेंद्र मोदीnarendra modiविमानतळairportभूतानSearch Functional Tags: नरेंद्र मोदी, Narendra Modi, विमानतळ, Airport, भूतानTwitter Publish: Meta Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये "रुपे' कार्डचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन करताना त्यांनी या कार्डचा वापर करून खरेदीही केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये आले. Send as Notification: 

आता भूतानमध्येही चालणार 'रुपे' कार्ड

थिम्फू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये "रुपे' कार्डचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन करताना त्यांनी या कार्डचा वापर करून खरेदीही केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये आले. 

भूतानबरोबरील द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर थिम्फू येथील ऐतिहासिक सिमटोका झॉंग या गढीमध्ये भारत आणि भूतानदरम्यान नऊ सामंजस्य करारांवर आणि एका वीजखरेदी करारावर सह्या झाल्या. ही गढी 1629 मध्ये बांधण्यात आली होती. या गढीमध्ये प्रथमच सामंजस्य करार आणि उद्‌घाटन कार्यक्रम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकूण दहा करारांशिवाय मोदी यांच्या उपस्थितीत मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे आणि "इस्रो'ने बांधलेल्या प्रक्षेपण केंद्राचेही उद्‌घाटन झाले. याशिवाय, भारत आणि भूतानमधील 50 वर्षांच्या जलविद्युत सहकार्याचे प्रतीक म्हणून विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले. 

दरम्यान, मोदींचे स्वागत करण्यासाठी लोटे त्सेरिंग हे स्वत: विमानतळावर उपस्थित होते. या विशेष स्वागतासाठी मोदींनी त्यांचे आभार मानले. मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आणि नंतर रस्त्यांवरही नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी भारतीय वंशाचे नागरिकही मोठ्या संख्येने आले होते. पंतप्रधान म्हणून मोदींची भूतानला ही दुसरी भेट आहे. 

सिंगापूरनंतर भूतानच...

रुपे कार्डचा वापर होणारा भूतान आता सिंगापूरनंतरचा दुसरा देश ठरणार आहे. रुपे कार्डच्या वापराचा दोन टप्प्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात भारतीय बॅंका रुपे कार्ड वितरीत करतील आणि त्यांचा वापर भूतानमध्ये प्रवासासाठी आलेले भारतीय करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात भूतानमधील बॅंकांना हे कार्ड भारतात प्रवासासाठी जाणाऱ्या भूतानी नागरिकांना देण्याचे अधिकार दिले जातील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. 
 
News Item ID: 
599-news_story-1566051296
Mobile Device Headline: 
आता भूतानमध्येही चालणार 'रुपे' कार्ड
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Use of Rupay Card Also in Bhutan
Author Type: 
External Author
पीटीआय
Search Functional Tags: 
नरेंद्र मोदी, Narendra Modi, विमानतळ, Airport, भूतान
Twitter Publish: 
Meta Description: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये "रुपे' कार्डचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन करताना त्यांनी या कार्डचा वापर करून खरेदीही केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये आले. 
Send as Notification: