कंटेनरच्या धडकेत एक ठार

पारनेर ः नगर-पुणे महामार्गावर सुपे चौकात (ता. पारनेर) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटनेरने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांना चिरडले. यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले.  या बाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपे बसस्थानक चौकात नशीर अब्दुल शेख (वय 45) व संतोष यादव औचिते (वय 36, दोघेही रा. सुपे, ता. पारनेर) हे चौकात एका बाजूला "चाय स्पॉट' जवळ असेल्या कट्यावर बसले होते. त्याच दरम्यान नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एम. एच. 20 डी. ई.1553) चालकाचा चौकाच्या दरम्यान असलेल्या गतिरोधकावर ब्रेक न लागल्याने कंटेनरवरचा ताबा सुटला. कंटेनर बाजूला बसलेल्या या दोघांच्या थेट अंगावर जाऊन धडकला. या धडकेत नशीर शेख जागीच ठार झाला. तर संतोष औचितेचा एक पाय जागीच तुटून पडला व दुसरा पायही डॉक्‍टरांना दवाखान्यात तातडीने कापून काढावा लागला.  वाहतुकीस अडथळा  सुपे बसस्थानक चौकात तसेच विश्रामगृहपर्यंत अनेकदा रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होते. या परिसरात असलेले हॉटेल, चहा स्टॉल, बेकरी व हार घेण्यासाठी प्रवासी हमखास थांबतात. सुपे येथील बेकरी, फुलांचे हार व चहा प्रसिद्ध आहे. जाणारी-येणारी वाहने व येथे थांबलेली वाहाने यामुळे रहदारीस नेहमीच अडथळा होतो.  वाहतूक कोंडी नेहमीचीच  सुपे बसस्थानक ते विश्रामगृहापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटवली होती. मात्र ती पुन्हा जैसेथी झाली. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली आहे.  चौपदरीकरण रखडले  सुपे बसस्थानक ते विश्रामगृह दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. तसेच उर्वरित रस्त्यावर अतिक्रमणेही झालेली आहेत. सुपे एमआयडीसी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येथे अवजड वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होण्याची आवश्‍यकता आहे.  उड्डाणपुलाची आवश्‍यकता  सुपे चौकाच भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची नितांत आवश्‍यकता आहे. येथे सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी पारनेर, वाळवणे व अपधूप हे रस्ते येऊन मिळतात अनेकदा तेथे अपघात होतात. अनेकांना आतापर्यंत आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची आमची गेली अनेक दिवसंची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.    - दीपक पवार, सभापती, पंचायत समिती, पारनेर.    News Item ID: 599-news_story-1573461788Mobile Device Headline: कंटेनरच्या धडकेत एक ठार Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पारनेर ः नगर-पुणे महामार्गावर सुपे चौकात (ता. पारनेर) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटनेरने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांना चिरडले. यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले.  या बाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपे बसस्थानक चौकात नशीर अब्दुल शेख (वय 45) व संतोष यादव औचिते (वय 36, दोघेही रा. सुपे, ता. पारनेर) हे चौकात एका बाजूला "चाय स्पॉट' जवळ असेल्या कट्यावर बसले होते. त्याच दरम्यान नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एम. एच. 20 डी. ई.1553) चालकाचा चौकाच्या दरम्यान असलेल्या गतिरोधकावर ब्रेक न लागल्याने कंटेनरवरचा ताबा सुटला. कंटेनर बाजूला बसलेल्या या दोघांच्या थेट अंगावर जाऊन धडकला. या धडकेत नशीर शेख जागीच ठार झाला. तर संतोष औचितेचा एक पाय जागीच तुटून पडला व दुसरा पायही डॉक्‍टरांना दवाखान्यात तातडीने कापून काढावा लागला.  वाहतुकीस अडथळा  सुपे बसस्थानक चौकात तसेच विश्रामगृहपर्यंत अनेकदा रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होते. या परिसरात असलेले हॉटेल, चहा स्टॉल, बेकरी व हार घेण्यासाठी प्रवासी हमखास थांबतात. सुपे येथील बेकरी, फुलांचे हार व चहा प्रसिद्ध आहे. जाणारी-येणारी वाहने व येथे थांबलेली वाहाने यामुळे रहदारीस नेहमीच अडथळा होतो.  वाहतूक कोंडी नेहमीचीच  सुपे बसस्थानक ते विश्रामगृहापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटवली होती. मात्र ती पुन्हा जैसेथी झाली. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली आहे.  चौपदरीकरण रखडले  सुपे बसस्थानक ते विश्रामगृह दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. तसेच उर्वरित रस्त्यावर अतिक्रमणेही झालेली आहेत. सुपे एमआयडीसी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येथे अवजड वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होण्याची आवश्‍यकता आहे.  उड्डाणपुलाची आवश्‍यकता  सुपे चौकाच भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची नितांत आवश्‍यकता आहे. येथे सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी पारनेर, वाळवणे व अपधूप हे रस्ते येऊन मिळतात अनेकदा तेथे अपघात होतात. अनेकांना आतापर्यंत आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची आमची गेली अनेक दिवसंची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.    - दीपक पवार, सभापती, पंचायत समिती, पारनेर.    Vertical Image: English Headline: One killed in the crash of the containerAuthor Type: External Authorमार्तंड बुचुडे नगरपुणेमहामार्गसुपेसकाळहॉटेलसार्वजनिक बांधकाम विभागअपघातSearch Functional Tags: नगर, पुणे, महामार्ग, सुपे, सकाळ, हॉटेल, सार्वजनिक बांधकाम विभाग, अपघातTw

कंटेनरच्या धडकेत एक ठार

पारनेर ः नगर-पुणे महामार्गावर सुपे चौकात (ता. पारनेर) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटनेरने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांना चिरडले. यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले. 

या बाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपे बसस्थानक चौकात नशीर अब्दुल शेख (वय 45) व संतोष यादव औचिते (वय 36, दोघेही रा. सुपे, ता. पारनेर) हे चौकात एका बाजूला "चाय स्पॉट' जवळ असेल्या कट्यावर बसले होते. त्याच दरम्यान नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एम. एच. 20 डी. ई.1553) चालकाचा चौकाच्या दरम्यान असलेल्या गतिरोधकावर ब्रेक न लागल्याने कंटेनरवरचा ताबा सुटला. कंटेनर बाजूला बसलेल्या या दोघांच्या थेट अंगावर जाऊन धडकला. या धडकेत नशीर शेख जागीच ठार झाला. तर संतोष औचितेचा एक पाय जागीच तुटून पडला व दुसरा पायही डॉक्‍टरांना दवाखान्यात तातडीने कापून काढावा लागला. 

वाहतुकीस अडथळा 

सुपे बसस्थानक चौकात तसेच विश्रामगृहपर्यंत अनेकदा रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होते. या परिसरात असलेले हॉटेल, चहा स्टॉल, बेकरी व हार घेण्यासाठी प्रवासी हमखास थांबतात. सुपे येथील बेकरी, फुलांचे हार व चहा प्रसिद्ध आहे. जाणारी-येणारी वाहने व येथे थांबलेली वाहाने यामुळे रहदारीस नेहमीच अडथळा होतो. 

वाहतूक कोंडी नेहमीचीच 

सुपे बसस्थानक ते विश्रामगृहापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटवली होती. मात्र ती पुन्हा जैसेथी झाली. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली आहे. 

चौपदरीकरण रखडले 

सुपे बसस्थानक ते विश्रामगृह दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. तसेच उर्वरित रस्त्यावर अतिक्रमणेही झालेली आहेत. सुपे एमआयडीसी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येथे अवजड वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होण्याची आवश्‍यकता आहे. 

उड्डाणपुलाची आवश्‍यकता 

सुपे चौकाच भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची नितांत आवश्‍यकता आहे. येथे सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी पारनेर, वाळवणे व अपधूप हे रस्ते येऊन मिळतात अनेकदा तेथे अपघात होतात. अनेकांना आतापर्यंत आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची आमची गेली अनेक दिवसंची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 
 
- दीपक पवार, सभापती, पंचायत समिती, पारनेर. 
 
News Item ID: 
599-news_story-1573461788
Mobile Device Headline: 
कंटेनरच्या धडकेत एक ठार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
One killed in the crash of the container
English Headline: 
One killed in the crash of the container
Author Type: 
External Author
मार्तंड बुचुडे
Search Functional Tags: 
नगर, पुणे, महामार्ग, सुपे, सकाळ, हॉटेल, सार्वजनिक बांधकाम विभाग, अपघात
Twitter Publish: 
Meta Description: 
सुपे बसस्थानक चौकात तसेच विश्रामगृहपर्यंत अनेकदा रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होते. या परिसरात असलेले हॉटेल, चहा स्टॉल, बेकरी व हार घेण्यासाठी प्रवासी हमखास थांबतात. सुपे येथील बेकरी, फुलांचे हार व चहा प्रसिद्ध आहे. जाणारी-येणारी वाहने व येथे थांबलेली वाहाने यामुळे रहदारीस नेहमीच अडथळा होतो. 
Send as Notification: