किम उन यांचा सपाटा; पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

सेऊल -दाेन्ही काेरियातील वैर अद्याप पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळेच अमेरिका-दक्षिण काेरियाच्या संयुक्त वाॅर गेम्सच्या आयाेजनावर किम जोंग उन भडकले आहेत. शनिवारी उत्तर काेरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेतली.ईशान्येकडील हॅमहंग शहरापासून ४०० किमी अंतरावर ही चाचणी घेण्यात आली. निश्चित उड्डाणानंतर हे क्षेपणास्त्र काेरिया व जपान यांच्यातील सागरी क्षेत्रात काेसळले. दाेन आठवड्यातील ही पाचवी क्षेपणास्त्र चाचणी हाेती.संयुक्त युद्ध सरावाबद्दल किम यांनी आधीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याविषयीचा संताप आणि निषेध क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रम सुरू ठेवून त्यांनी पुन्हा दाखवून दिला. दुसरीकडे ट्रम्प यांनी किम यांच्याशी वैयक्तिक सकारात्मक संबंध असल्याचा नेहमीच दावा केला आहे. किम जोंग उन यांचे सुंदर पत्र मिळाले. त्यात त्यांनी वाॅर गेम्सबद्दल नाराजी व्यक्त केली, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर काेरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल व्हाइट हाऊसने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. काही ठरवण्यापूर्वी आम्ही जपान, दक्षिण काेरिया यांच्याशी चर्चा करू. त्यानंतरच प्रतिक्रिया देणे याेग्य ठरेल, असे व्हाइट हाऊसच्या वतीने सांगण्यात आले.ते कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र : ट्रम्पउत्तर काेरियाच्या क्षेपणास्त्राला एवढे महत्त्व देण्याचे कारण नाही. कारण हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्याचे आहे. अलीकडेच किम उन यांनी अनेक चाचण्या घेतल्या. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु तसे चिंतेचे कारण नाही, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले हाेते. त्याच्या दुसऱ्या दिवशी किम यांनी चाचणीचा सपाटाच लावत नाराजीचे स्पष्ट संकेत दिले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Kim Jon took retesting of missile


 किम उन यांचा सपाटा; पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

सेऊल -दाेन्ही काेरियातील वैर अद्याप पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळेच अमेरिका-दक्षिण काेरियाच्या संयुक्त वाॅर गेम्सच्या आयाेजनावर किम जोंग उन भडकले आहेत. शनिवारी उत्तर काेरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेतली.
ईशान्येकडील हॅमहंग शहरापासून ४०० किमी अंतरावर ही चाचणी घेण्यात आली. निश्चित उड्डाणानंतर हे क्षेपणास्त्र काेरिया व जपान यांच्यातील सागरी क्षेत्रात काेसळले. दाेन आठवड्यातील ही पाचवी क्षेपणास्त्र चाचणी हाेती.


संयुक्त युद्ध सरावाबद्दल किम यांनी आधीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याविषयीचा संताप आणि निषेध क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रम सुरू ठेवून त्यांनी पुन्हा दाखवून दिला. दुसरीकडे ट्रम्प यांनी किम यांच्याशी वैयक्तिक सकारात्मक संबंध असल्याचा नेहमीच दावा केला आहे. किम जोंग उन यांचे सुंदर पत्र मिळाले. त्यात त्यांनी वाॅर गेम्सबद्दल नाराजी व्यक्त केली, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर काेरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल व्हाइट हाऊसने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. काही ठरवण्यापूर्वी आम्ही जपान, दक्षिण काेरिया यांच्याशी चर्चा करू. त्यानंतरच प्रतिक्रिया देणे याेग्य ठरेल, असे व्हाइट हाऊसच्या वतीने सांगण्यात आले.

ते कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र : ट्रम्प

उत्तर काेरियाच्या क्षेपणास्त्राला एवढे महत्त्व देण्याचे कारण नाही. कारण हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्याचे आहे. अलीकडेच किम उन यांनी अनेक चाचण्या घेतल्या. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु तसे चिंतेचे कारण नाही, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले हाेते. त्याच्या दुसऱ्या दिवशी किम यांनी चाचणीचा सपाटाच लावत नाराजीचे स्पष्ट संकेत दिले.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Kim Jon took retesting of missile