किमसोबत हॅन्डशेक करण्यासाठी खरोखर कोरियन सीमेवर पोहोचले ट्रम्प, जी-20 मध्ये केला होता संकल्प

सेऊल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी थेट कोरियन सीमेवर जाऊन पोहोचले. यावेळी त्यांनी आपले सर्वात कट्टर शत्रू मानले जाणारे उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांच्यासोबत हॅन्डशेक केला. जपानमध्ये जी-20 शिखर संमेलन सुरू असताना आपण कोरियन सीमेवर जाऊन किम जोंग उन यांची भेट घेणार असे ट्रम्प म्हणाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरोखर ट्रम्प या ठिकाणी पोहोचले आहेत. नेहमीच एकमेकांना युद्धाच्या धमक्या देणाऱ्या दोन्ही देशांच्या नेत्यांची ही तिसरी भेट ठरली आहे. किम यांना पाहताच ट्रम्प हॅन्डशेक करण्यासाठी उत्तर कोरियाच्या हद्दीत चालत गेले. यानंतर दोन्ही नेत्यांनी दक्षिण कोरिया हद्दीत काही पावले ठेवली. आणि परत येताना ट्रम्प यांनी पुन्हा परत जाऊन किम यांच्याशी दुसऱ्यांदा हॅन्डशेक केला.दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाला विभाजित करणारी सीमा जगातील सर्वात कडेकोट सीमा मानली जाते. 1950-53 च्या कोरियन युद्धानंतर ही सीमा डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड) नावाने कुप्रसिद्ध आहे. याच सीमेवर ट्रम्प उत्तर कोरियन नेत्याची भेट घेण्यासाठी पोहोचले. तत्पूर्वी ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून किम यांना हॅन्डशेकसाठी निमंत्रित केले होते.ट्रम्प आणि किम यांची आतापर्यंतची ही तिसरी भेट आहे. या दोन्ही नेत्यांची पहिली भेट गतवर्षी सिंगापूर येथे झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीत दोन्ही नेते व्हिएतनाममध्ये भेटले. परंतु, दोन्ही बैठकांमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. 1950 पर्यंत कोरियन पेनिन्सुला हा एकच देश होता. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये भांडणे आणि युद्ध पेटले. रशिया समर्थक नेत्यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिका समर्थक नेत्यांनी दक्षिण कोरियाची स्थापना केली. तेव्हापासूनच देश दोन तुकड्यांमध्ये विभाजित झाले. उत्तर कोरियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी निर्बंध टाकले. त्यामुळे, देश बकाल झाला. तर दुसरीकडे, दक्षिण कोरिया एक आर्थिक संपन्न देश म्हणून नावारुपाला आला. दक्षिण कोरियात लोकशाही आली. परंतु, हुकुमशाहीच्या अधिपत्याखाली जगणाऱ्या उत्तर कोरियावरील निर्बंध हटवण्यासाठी चर्चाच झाल्या नाहीत.उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी स्वावलंबनाचा नारा देत 2006 मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेतली. त्याचा देशाला जोरदार फटका बसला. अमेरिका, युरोप आणि संयुक्त राष्ट्राने आर्थिक निर्बंध आणखी कठोर केले. तरीही उत्तर कोरियाने चाचण्या थांबवल्या नाहीत. आतापर्यंत या देशाने 7 अण्वस्त्र चाचण्या घेतल्या. प्रत्येक चाचणीच्या वेळी अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यालाच रोखण्यासाठी ट्रम्प यांनी उत्तर कोरियन नेत्यापुढे थेट चर्चेचा प्रस्ताव मांडला आणि दोन्ही नेत्यांची ही तिसरी भेट शक्य झाली. उत्तर कोरियाने आपल्या अण्वस्त्र चाचण्या तर थांबवल्या. परंतु, या देशावरील निर्बंध काढण्याच्या प्रस्तावावर अमेरिका अजुनही विचारच करत आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Trump Meets Kim Jong Un In North Korea To Handshake Crossing Demilitarised Zone


 किमसोबत हॅन्डशेक करण्यासाठी खरोखर कोरियन सीमेवर पोहोचले ट्रम्प, जी-20 मध्ये केला होता संकल्प

सेऊल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी थेट कोरियन सीमेवर जाऊन पोहोचले. यावेळी त्यांनी आपले सर्वात कट्टर शत्रू मानले जाणारे उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांच्यासोबत हॅन्डशेक केला. जपानमध्ये जी-20 शिखर संमेलन सुरू असताना आपण कोरियन सीमेवर जाऊन किम जोंग उन यांची भेट घेणार असे ट्रम्प म्हणाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरोखर ट्रम्प या ठिकाणी पोहोचले आहेत. नेहमीच एकमेकांना युद्धाच्या धमक्या देणाऱ्या दोन्ही देशांच्या नेत्यांची ही तिसरी भेट ठरली आहे. किम यांना पाहताच ट्रम्प हॅन्डशेक करण्यासाठी उत्तर कोरियाच्या हद्दीत चालत गेले. यानंतर दोन्ही नेत्यांनी दक्षिण कोरिया हद्दीत काही पावले ठेवली. आणि परत येताना ट्रम्प यांनी पुन्हा परत जाऊन किम यांच्याशी दुसऱ्यांदा हॅन्डशेक केला.


दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाला विभाजित करणारी सीमा जगातील सर्वात कडेकोट सीमा मानली जाते. 1950-53 च्या कोरियन युद्धानंतर ही सीमा डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड) नावाने कुप्रसिद्ध आहे. याच सीमेवर ट्रम्प उत्तर कोरियन नेत्याची भेट घेण्यासाठी पोहोचले. तत्पूर्वी ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून किम यांना हॅन्डशेकसाठी निमंत्रित केले होते.


ट्रम्प आणि किम यांची आतापर्यंतची ही तिसरी भेट आहे. या दोन्ही नेत्यांची पहिली भेट गतवर्षी सिंगापूर येथे झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीत दोन्ही नेते व्हिएतनाममध्ये भेटले. परंतु, दोन्ही बैठकांमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. 1950 पर्यंत कोरियन पेनिन्सुला हा एकच देश होता. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये भांडणे आणि युद्ध पेटले. रशिया समर्थक नेत्यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिका समर्थक नेत्यांनी दक्षिण कोरियाची स्थापना केली. तेव्हापासूनच देश दोन तुकड्यांमध्ये विभाजित झाले. उत्तर कोरियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी निर्बंध टाकले. त्यामुळे, देश बकाल झाला. तर दुसरीकडे, दक्षिण कोरिया एक आर्थिक संपन्न देश म्हणून नावारुपाला आला. दक्षिण कोरियात लोकशाही आली. परंतु, हुकुमशाहीच्या अधिपत्याखाली जगणाऱ्या उत्तर कोरियावरील निर्बंध हटवण्यासाठी चर्चाच झाल्या नाहीत.


उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी स्वावलंबनाचा नारा देत 2006 मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेतली. त्याचा देशाला जोरदार फटका बसला. अमेरिका, युरोप आणि संयुक्त राष्ट्राने आर्थिक निर्बंध आणखी कठोर केले. तरीही उत्तर कोरियाने चाचण्या थांबवल्या नाहीत. आतापर्यंत या देशाने 7 अण्वस्त्र चाचण्या घेतल्या. प्रत्येक चाचणीच्या वेळी अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यालाच रोखण्यासाठी ट्रम्प यांनी उत्तर कोरियन नेत्यापुढे थेट चर्चेचा प्रस्ताव मांडला आणि दोन्ही नेत्यांची ही तिसरी भेट शक्य झाली. उत्तर कोरियाने आपल्या अण्वस्त्र चाचण्या तर थांबवल्या. परंतु, या देशावरील निर्बंध काढण्याच्या प्रस्तावावर अमेरिका अजुनही विचारच करत आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Trump Meets Kim Jong Un In North Korea To Handshake Crossing Demilitarised Zone