पेरलं शिवार

पेरलं शिवार


उधारी बियाणं, पेरलं शिवारी
रिमझिम सरी, बरसती

काळ्या भूईनं, घेतलं कुशीत
येईल बियात, जीव आता

उगवले कोंब, वारकरी सारे
हात दोन करे, आभाळाला

दिसामासानं गा, वाढेल हा जीव
पावसा तू धाव, वेळोवेळी

कष्टतील हात, येईल उभारी
मिळेल भाकरी, सार्‍या जगा

पिकेल अवंदा, पीक मोत्यावाणी
गातील ती गाणी, पक्षीमात्र

येईल जोमात, सगळा शिवार
पीकही अपार, देगा देवा


• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५