काश्मीरवर चीनने पाकला सांगितले - द्विपक्षीय मतभेदांवर वाद होऊ नये, शांततेने तोडगा काढा

बीजिंग -जम्मू आणि काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची चीनकडून निराशा झाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, द्विपक्षीय मतभेद वादाचे कारण होऊ नये. भारत-पाकमधील तणावावर आमची नजर आहे. चीनने भारताकडून या मुद्द्यावर सकारात्मक प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी मदत मागण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर चीनचे वक्तव्य आले आहे.तत्पूर्वी, सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपाध्यक्ष वांग किशान यांची भेट घेतली. त्यावेळी वांग यी म्हणाले की, भारत आणि चीनचे विभागीय शांतता आणि स्थैर्य यात महत्त्वाचे योगदान असावे. जम्मू-काश्मीरवर भारताने जो निर्णय घेतला आहे त्यानंतर या भागात शांतता कायम राहणे आवश्यक आहे.दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी १०० कार्यक्रम घेणार : भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात पारंपरिक औषधांचा प्रचार, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी प्लेअर एक्सचेंज कार्यक्रमासह ४ करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देश संबंध मजबूत करण्यासाठी १०० कार्यक्रम घेतील.कूटनीतिक यशवांग यी म्हणाले- जयशंकर यांचा दौरा आनंदाची बाब, भारताला निर्यातीत सूटचीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, जयशंकर यांचा चीन दौरा ही आनंदाची बाब आहे. आम्हाला व्यापारी असंतुलनाबाबत भारताची चिंता समजते.आम्ही भारताला निर्यातीत सुविधा देण्यास तयार आहोत. आम्ही गुंतवणूक, पर्यटन, व्यापारात सहकार्य करू. आमच्यात काही मतभेद आहेत. पण ते स्वीकारताना आम्ही कचरत नाही.जयशंकर म्हणाले-अनेक मुद्द्यांवर मतभेद, पण त्यांना वाद होऊ देणार नाहीजयशंकर म्हणाले की,भारत आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद आहेत, पण आम्ही त्यांना वाद होऊ देणार नाही. भारत आणि चीन आगामी काळात १०० असे कार्यक्रम घेणार आहेत ज्यामुळे दोन्ही देशांतील लोकांत परस्पर संबंध निर्माण व्हावेत. वुहान बैठकीनंतर दोन्ही देशांत मोठा वाद झाला नाही. आर्थिक सहकार्यही वाढत आहे. चीनने मानसरोवर यात्रेसाठी काही सूचना केल्या आहेत.पाकचे परराष्ट्रमंत्री, बिलावल भुत्तो यांनी पीओकेत येऊन नमाज अदा केलीपाक सरकारने सोमवारी लोकांना आवाहन केले की, बकरी ईद सामान्य पद्धतीने साजरी करा, त्यातून काश्मिरी नागरिकांशी एकजूटता व्यक्त होऊ शकेल.पाकच्या अनेक पक्षांच्या नेत्यांनी पीओकेत येऊन नमाज अदा केली. त्यात बिलावल भुत्तो, पाकचे परराष्ट्रमंत्री कुरैशी यांचाही समावेश होता. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today China tells Pakistan over Kashmir - bilateral differences should not be disputed, settle peacefully


 काश्मीरवर चीनने पाकला सांगितले - द्विपक्षीय मतभेदांवर वाद होऊ नये, शांततेने तोडगा काढा

बीजिंग -जम्मू आणि काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची चीनकडून निराशा झाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, द्विपक्षीय मतभेद वादाचे कारण होऊ नये. भारत-पाकमधील तणावावर आमची नजर आहे. चीनने भारताकडून या मुद्द्यावर सकारात्मक प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी मदत मागण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर चीनचे वक्तव्य आले आहे.


तत्पूर्वी, सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपाध्यक्ष वांग किशान यांची भेट घेतली. त्यावेळी वांग यी म्हणाले की, भारत आणि चीनचे विभागीय शांतता आणि स्थैर्य यात महत्त्वाचे योगदान असावे. जम्मू-काश्मीरवर भारताने जो निर्णय घेतला आहे त्यानंतर या भागात शांतता कायम राहणे आवश्यक आहे.


दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी १०० कार्यक्रम घेणार : भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात पारंपरिक औषधांचा प्रचार, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी प्लेअर एक्सचेंज कार्यक्रमासह ४ करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देश संबंध मजबूत करण्यासाठी १०० कार्यक्रम घेतील.

कूटनीतिक यश

वांग यी म्हणाले- जयशंकर यांचा दौरा आनंदाची बाब, भारताला निर्यातीत सूट

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, जयशंकर यांचा चीन दौरा ही आनंदाची बाब आहे. आम्हाला व्यापारी असंतुलनाबाबत भारताची चिंता समजते.आम्ही भारताला निर्यातीत सुविधा देण्यास तयार आहोत. आम्ही गुंतवणूक, पर्यटन, व्यापारात सहकार्य करू. आमच्यात काही मतभेद आहेत. पण ते स्वीकारताना आम्ही कचरत नाही.

जयशंकर म्हणाले-अनेक मुद्द्यांवर मतभेद, पण त्यांना वाद होऊ देणार नाही
जयशंकर म्हणाले की,भारत आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद आहेत, पण आम्ही त्यांना वाद होऊ देणार नाही. भारत आणि चीन आगामी काळात १०० असे कार्यक्रम घेणार आहेत ज्यामुळे दोन्ही देशांतील लोकांत परस्पर संबंध निर्माण व्हावेत. वुहान बैठकीनंतर दोन्ही देशांत मोठा वाद झाला नाही. आर्थिक सहकार्यही वाढत आहे. चीनने मानसरोवर यात्रेसाठी काही सूचना केल्या आहेत.

पाकचे परराष्ट्रमंत्री, बिलावल भुत्तो यांनी पीओकेत येऊन नमाज अदा केली

पाक सरकारने सोमवारी लोकांना आवाहन केले की, बकरी ईद सामान्य पद्धतीने साजरी करा, त्यातून काश्मिरी नागरिकांशी एकजूटता व्यक्त होऊ शकेल.पाकच्या अनेक पक्षांच्या नेत्यांनी पीओकेत येऊन नमाज अदा केली. त्यात बिलावल भुत्तो, पाकचे परराष्ट्रमंत्री कुरैशी यांचाही समावेश होता.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
China tells Pakistan over Kashmir - bilateral differences should not be disputed, settle peacefully