जगातील सर्वात मोठ्या वर्षा वनातील वणवा : ब्राझीलच्या वणव्याने ६ दिवसांत वेढले ७९०० किमी वनक्षेत्र!

बीजिंग - ब्राझील येथील अॅमेझॉन जंगलामधील वणव्याने रौद्ररूप धारण केले आहे. जगातील सर्वात मोठ्या जंगलामध्ये ६ दिवसांत ९६०० ठिकाणी आग लागली. आगीने जवळपास ७९०० किमी क्षेत्र व्यापले आहे. यात सर्वाधिक २३०० किमी क्षेत्र साओ पाआेलो या शहराचे आहे. नासाने ब्राझील येथील अंतराळ संस्थेच्या मदतीने उपग्रहाद्वारे आगीचे छायाचित्र जारी केले आहे. यंदा एकूण ७४१५५ ठिकाणी आग लागली. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८४ % पेक्षा जास्त आहे. गेल्या ४ वर्षांपेक्षा ही सर्वाधिक मोठी आग आहे. २०१६ ला ७० हजार ठिकाणी आग लागली होती. या घटनेमुळे देशात राजकारणही तापू लागले आहे.सरकार : निधीत घट केल्यामुळे पर्यावरण संघटनांनी लावली आगपर्यावरण संघटनांचा निधी कमी केल्यामुळे त्यांनी जंगलात आग लावली. या संघटना अागीचे संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण करू पाहत होत्या. दुसरीकडे पर्यावरणमंत्री रिकार्डो सैल्स यांच्याविरोधातील बैठकीमध्ये लोकांनी जंगलाची माहिती दाखवताना अॅमेझॉन जळत अाहे, असे सांगितले. पर्यावरण संघटना : सरकार तस्करांकडे दुर्लक्ष करतेयराष्ट्रपती मतांसाठी लाकडी तस्कर आणि जमीन हस्तकांकडे दुर्लक्ष करत आहे. जेयर हे जानेवारीमध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. तेव्हापासून ब्राझीलचे ३४४५ किमी क्षेत्र जंगल नाहीसे झाले. २०१८ मध्ये या जंगलाचे क्षेत्र ३९ % वाढले होते.पहिले १० वर्षावने : अॅमेझॉननंतर कांगो, वालिदिविन सर्वात मोठे> जगात १० मोठी वर्षावने आहेत. जगातील ४० % झाडेझुडपे,जंगली प्राणी आढळतात. प्रत्येक वर्षावने ही १० हजार किमीची आहेत.>अॅमेझॉनशिवाय कांगो, वालिदिवियन आणि टोंगास वर्षावने ही एक लाख किमीपेक्षा जास्त पसरली आहेत. अॅमेझॉनचे जंगल जगाला २० टक्के ऑक्सिजन देतेब्राझीलचे अॅमेझॉन वर्षा वन क्षेत्र जगाला २० टक्केे ऑक्सिजन देते. त्यामुळे या वन क्षेत्राची जगाचे फुप्फुस अशी आेळख आहे. ते ५५ लाख चौरस किमी क्षेत्रात आहे. हे जंगल दक्षिण अमेरिकेच्या नऊ देशात पसरले आहे.येथे वन्यजीव व वृक्षवेलींच्या ३०० हून जास्त प्रजाती>अॅमेझॉन वर्षा वन क्षेत्र ब्राझील, पेरू, गयाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, सुरिनाम व फ्रान्स गयानापर्यंत.> या वन क्षेत्रात वन्यजीव आणि वृक्षांच्या ३०० कोटी प्रजाती आहेत. काही भागात आदिवासी समुदायाचा रहिवास.> जगभरातील हरित वन क्षेत्रापैकी सुमारे ४० टक्के भाग अॅमेझॉनचा आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Brazil's forests conflagration spill over 909 km of forest area in 6 days!


 जगातील सर्वात मोठ्या वर्षा वनातील वणवा : ब्राझीलच्या वणव्याने ६ दिवसांत वेढले ७९०० किमी वनक्षेत्र!

बीजिंग - ब्राझील येथील अॅमेझॉन जंगलामधील वणव्याने रौद्ररूप धारण केले आहे. जगातील सर्वात मोठ्या जंगलामध्ये ६ दिवसांत ९६०० ठिकाणी आग लागली. आगीने जवळपास ७९०० किमी क्षेत्र व्यापले आहे. यात सर्वाधिक २३०० किमी क्षेत्र साओ पाआेलो या शहराचे आहे. नासाने ब्राझील येथील अंतराळ संस्थेच्या मदतीने उपग्रहाद्वारे आगीचे छायाचित्र जारी केले आहे. यंदा एकूण ७४१५५ ठिकाणी आग लागली. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८४ % पेक्षा जास्त आहे. गेल्या ४ वर्षांपेक्षा ही सर्वाधिक मोठी आग आहे. २०१६ ला ७० हजार ठिकाणी आग लागली होती. या घटनेमुळे देशात राजकारणही तापू लागले आहे.

सरकार : निधीत घट केल्यामुळे पर्यावरण संघटनांनी लावली आग
पर्यावरण संघटनांचा निधी कमी केल्यामुळे त्यांनी जंगलात आग लावली. या संघटना अागीचे संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण करू पाहत होत्या. दुसरीकडे पर्यावरणमंत्री रिकार्डो सैल्स यांच्याविरोधातील बैठकीमध्ये लोकांनी जंगलाची माहिती दाखवताना अॅमेझॉन जळत अाहे, असे सांगितले.

पर्यावरण संघटना : सरकार तस्करांकडे दुर्लक्ष करतेय
राष्ट्रपती मतांसाठी लाकडी तस्कर आणि जमीन हस्तकांकडे दुर्लक्ष करत आहे. जेयर हे जानेवारीमध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. तेव्हापासून ब्राझीलचे ३४४५ किमी क्षेत्र जंगल नाहीसे झाले. २०१८ मध्ये या जंगलाचे क्षेत्र ३९ % वाढले होते.

पहिले १० वर्षावने : अॅमेझॉननंतर कांगो, वालिदिविन सर्वात मोठे
> जगात १० मोठी वर्षावने आहेत. जगातील ४० % झाडेझुडपे,जंगली प्राणी आढळतात. प्रत्येक वर्षावने ही १० हजार किमीची आहेत.
>अॅमेझॉनशिवाय कांगो, वालिदिवियन आणि टोंगास वर्षावने ही एक लाख किमीपेक्षा जास्त पसरली आहेत.

अॅमेझॉनचे जंगल जगाला २० टक्के ऑक्सिजन देते

ब्राझीलचे अॅमेझॉन वर्षा वन क्षेत्र जगाला २० टक्केे ऑक्सिजन देते. त्यामुळे या वन क्षेत्राची जगाचे फुप्फुस अशी आेळख आहे. ते ५५ लाख चौरस किमी क्षेत्रात आहे. हे जंगल दक्षिण अमेरिकेच्या नऊ देशात पसरले आहे.

येथे वन्यजीव व वृक्षवेलींच्या ३०० हून जास्त प्रजाती
>अॅमेझॉन वर्षा वन क्षेत्र ब्राझील, पेरू, गयाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, सुरिनाम व फ्रान्स गयानापर्यंत.
> या वन क्षेत्रात वन्यजीव आणि वृक्षांच्या ३०० कोटी प्रजाती आहेत. काही भागात आदिवासी समुदायाचा रहिवास.
> जगभरातील हरित वन क्षेत्रापैकी सुमारे ४० टक्के भाग अॅमेझॉनचा आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Brazil's forests conflagration spill over 909 km of forest area in 6 days!