जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर; बिल गेट्स प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर घसरले, या व्यक्तीकडून मिळाली मात

पॅरिस(फ्रान्स)- लग्झरी गुड्स कंपनी एलवीएमएचचे चेअरमन बर्नार्ड अरनॉल्ट(70) जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स तिसऱ्या स्थानावर घसरले. एलवीएमएचच्या शेअरमध्ये 1.38% वाढ झाल्याने अरनॉल्ट यांची नेटवर्थ मंगलवारी 108 अब्ज डॉलर(7.45 लाख कोटी रुपये) झाली. बिल गेट्स यांची सध्याची नेटवर्थ 107 अब्ज डॉलर (7.38 लाख कोटी रुपये) आहे.अरनॉल्ट यांची नेटवर्थ फ्रान्सच्या जीडीपीच्या 3% बरोबर आहेब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या 7 वर्षात गेट्स पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. यात असलेल्या जगातील 500 श्रीमंतांची नेटवर्थ दररोज अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यानंतर अपडेट केली जाते.इंडेक्समध्ये सामिल अब्जाधिशांमध्ये अरनॉल्ट यांच्या नेटवर्थमध्ये सगळ्यात जास्त 39 अब्ज डॉलर(2.69 लाख कोटी रुपये)ची वाढ झाली आहे. त्यांची नेटवर्थ फ्रान्सच्या जीडीपीच्या 3% बरोबर आहे.जगातील टॉप 5 श्रीमंत नाव/कंपनी/देश नेटवर्थ (रुपये) नेटवर्थ (डॉलर) जेफ बेजोस, अमेजन (यूएस) 8.62 लाख कोटी 125 अब्ज बर्नार्ड अरनॉल्ट, एलवीएमएच (फ्रांस) 7.45 लाख कोटी 108 अब्ज बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट (यूएस) 7.38 लाख कोटी 107 अब्ज वॉरेन बफे, बर्कशायर हॅथवे (यूएस) 5.79 लाख कोटी 83.9 अब्ज मार्क जकरबर्ग, फेसबुक (यूएस) 5.48 लाख कोटी 79.5 अब्ज अरनॉल्ट मागील महिन्यात सेंटीबिलेनिअर (100 अब्ज डॉलर नेटवर्थ)क्लबमध्ये सामिल झाले होते. जगात असे फक्त तीन व्यक्ती आहेत. बेजोस, गेट्स आणि अरनॉल्ट यांची संयुक्त नेटवर्थ अमेरिकेच्या शेअर बाजारातील एसएंडपी 500 इंडेक्समध्ये सामील असेल्या सगळ्या कंपन्यापेक्षा जास्त आहे. वॉलमार्ट, एक्सॉन मोबिल कॉर्प आणि वॉल्ट डिज्नी सारख्या कंपन्या या इंडेक्समध्ये सामील आहेत.अरनॉल्ट यांच्याकडे एलवीएमएच कंपनीचे 50% शेअर आहेत. 1988 मध्ये त्यांनी कंट्रोलिंग भागीदारी घेतली होती. त्यांच्याकडे फॅशन हाउस क्रिश्चियन डायरचेदेखील 97% शेअर आहेत. बिल गेट्स आणि बेजोस प्रमाणेच अरनॉल्टदेखील दान धर्माचे काम करतात. आग लागून उद्धवस्थ झालेल्या नोट्रे डेम कॅथेड्रल चर्चला परत बांधण्यासाठी त्यांनी 65 कोटी डॉलर दिले होते.बिल गेट्स यांनी आतापर्यंत 35 अब्जांपेक्षा जास्त दान केले आहेत. दान केले नसते तर ते आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असते. दुसरीकडे जेफ बेजोस यांनी माजी पत्नी मॅकेंजी घटस्फोट दिल्यानंतर सेटलमेंटमध्ये 36.5 अब्ज डॉलरचे शेअर दिल्यानंतरही ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.मुकेश अंबानी जगातील 13 वे श्रीमंत व्यक्तीब्लूमबर्गच्या 500 सर्वात श्रीमंत यादीत भारतीय उद्योजग मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर आहेत. त्यांची नेटवर्थ 5.18 लाख कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ अजीम प्रेमजी 48 व्या स्थानावर आहेत, त्यांची नेटवर्थ 20.5 लाख कोटी रुपये आहे. त्यांच्यानंतर शिव नादर नेटवर्थ 1.45 लाख कोटी आणि उदय कोटक1.38 लाख कोटी आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Bill Gates Falls, Arnault Second Richest Man in the World


 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर; बिल गेट्स प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर घसरले, या व्यक्तीकडून मिळाली मात

पॅरिस(फ्रान्स)- लग्झरी गुड्स कंपनी एलवीएमएचचे चेअरमन बर्नार्ड अरनॉल्ट(70) जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स तिसऱ्या स्थानावर घसरले. एलवीएमएचच्या शेअरमध्ये 1.38% वाढ झाल्याने अरनॉल्ट यांची नेटवर्थ मंगलवारी 108 अब्ज डॉलर(7.45 लाख कोटी रुपये) झाली. बिल गेट्स यांची सध्याची नेटवर्थ 107 अब्ज डॉलर (7.38 लाख कोटी रुपये) आहे.


अरनॉल्ट यांची नेटवर्थ फ्रान्सच्या जीडीपीच्या 3% बरोबर आहे
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या 7 वर्षात गेट्स पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. यात असलेल्या जगातील 500 श्रीमंतांची नेटवर्थ दररोज अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यानंतर अपडेट केली जाते.


इंडेक्समध्ये सामिल अब्जाधिशांमध्ये अरनॉल्ट यांच्या नेटवर्थमध्ये सगळ्यात जास्त 39 अब्ज डॉलर(2.69 लाख कोटी रुपये)ची वाढ झाली आहे. त्यांची नेटवर्थ फ्रान्सच्या जीडीपीच्या 3% बरोबर आहे.

जगातील टॉप 5 श्रीमंत

नाव/कंपनी/देश नेटवर्थ (रुपये) नेटवर्थ (डॉलर)
जेफ बेजोस, अमेजन (यूएस) 8.62 लाख कोटी 125 अब्ज
बर्नार्ड अरनॉल्ट, एलवीएमएच (फ्रांस) 7.45 लाख कोटी 108 अब्ज
बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट (यूएस) 7.38 लाख कोटी 107 अब्ज
वॉरेन बफे, बर्कशायर हॅथवे (यूएस) 5.79 लाख कोटी 83.9 अब्ज
मार्क जकरबर्ग, फेसबुक (यूएस) 5.48 लाख कोटी 79.5 अब्ज

अरनॉल्ट मागील महिन्यात सेंटीबिलेनिअर (100 अब्ज डॉलर नेटवर्थ)क्लबमध्ये सामिल झाले होते. जगात असे फक्त तीन व्यक्ती आहेत. बेजोस, गेट्स आणि अरनॉल्ट यांची संयुक्त नेटवर्थ अमेरिकेच्या शेअर बाजारातील एसएंडपी 500 इंडेक्समध्ये सामील असेल्या सगळ्या कंपन्यापेक्षा जास्त आहे. वॉलमार्ट, एक्सॉन मोबिल कॉर्प आणि वॉल्ट डिज्नी सारख्या कंपन्या या इंडेक्समध्ये सामील आहेत.


अरनॉल्ट यांच्याकडे एलवीएमएच कंपनीचे 50% शेअर आहेत. 1988 मध्ये त्यांनी कंट्रोलिंग भागीदारी घेतली होती. त्यांच्याकडे फॅशन हाउस क्रिश्चियन डायरचेदेखील 97% शेअर आहेत. बिल गेट्स आणि बेजोस प्रमाणेच अरनॉल्टदेखील दान धर्माचे काम करतात. आग लागून उद्धवस्थ झालेल्या नोट्रे डेम कॅथेड्रल चर्चला परत बांधण्यासाठी त्यांनी 65 कोटी डॉलर दिले होते.


बिल गेट्स यांनी आतापर्यंत 35 अब्जांपेक्षा जास्त दान केले आहेत. दान केले नसते तर ते आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असते. दुसरीकडे जेफ बेजोस यांनी माजी पत्नी मॅकेंजी घटस्फोट दिल्यानंतर सेटलमेंटमध्ये 36.5 अब्ज डॉलरचे शेअर दिल्यानंतरही ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबानी जगातील 13 वे श्रीमंत व्यक्ती
ब्लूमबर्गच्या 500 सर्वात श्रीमंत यादीत भारतीय उद्योजग मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर आहेत. त्यांची नेटवर्थ 5.18 लाख कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ अजीम प्रेमजी 48 व्या स्थानावर आहेत, त्यांची नेटवर्थ 20.5 लाख कोटी रुपये आहे. त्यांच्यानंतर शिव नादर नेटवर्थ 1.45 लाख कोटी आणि उदय कोटक1.38 लाख कोटी आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Bill Gates Falls, Arnault Second Richest Man in the World