'झू'मध्ये पर्यटकाकडून निंदनीय कृत्य; गेंड्याच्या पाठीवर नखाने प्रियकर-प्रेयसीने नाव खरडले, सोशल मीडिया युझर्सचा संताप

पॅरिस- आपण अनेकदा राष्ट्रीय स्मारके, किल्ले, भिंती इत्यादींवर प्रियकर किंवा प्रेयसीचे नाव कोरल्याचे प्रकार पाहीले असतील. पण फ्रान्समधील एका प्राणी संग्रहालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका गेंड्याच्या अंगावरच पर्यटकांनी आपली नावे कोरली आहेत.या 35 वर्षीय गेंड्याच्या पाठीवर कॅमिली आणि ज्युलिअन अशी दोन नावे कोरण्यात आली आहेत. गेंड्याच्या पाठीचे फोटो फ्रान्समधील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. "पर्यटकांच्या मूर्खपणाविषयी साहजिकच आमचा संताप होत आहे" असे फोटो सोबत कॅप्शन लिहीण्यात आले आहे. पर्यटकांने नखाच्या मदतीने गेंड्याच्या पाठीवरील कोरडी त्वचा खरडून स्वतःचे नावे लिहिली, असे झूचे संचालक पिअर केली यांनी सांगितले. गेंड्याचे कातडे जाड असल्याने त्याला कदाचित हे समजलेही नसेल, पण हे कृत्य अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले.गेंड्याच्या त्वचेवरील नावेपुसून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे त्याला कोणताही अपाय झालेला नाही, असे झू प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र हे फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. या फोटोमुळे जगभरातील ट्विटर यूझर्सनी या घटनेचा निषेध केला आहे. प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे बहुसंख्य पर्यटक त्यांच्या त्वचेला हात लावून पाहतात. मात्र एखाद्या प्राण्याच्या अंगावर आपले नाव कोरण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचे झूकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर झूमध्ये जागोजागी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today some one scratch name on rhinos back with nails in zoo


 'झू'मध्ये पर्यटकाकडून निंदनीय कृत्य; गेंड्याच्या पाठीवर नखाने प्रियकर-प्रेयसीने नाव खरडले, सोशल मीडिया युझर्सचा संताप

पॅरिस- आपण अनेकदा राष्ट्रीय स्मारके, किल्ले, भिंती इत्यादींवर प्रियकर किंवा प्रेयसीचे नाव कोरल्याचे प्रकार पाहीले असतील. पण फ्रान्समधील एका प्राणी संग्रहालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका गेंड्याच्या अंगावरच पर्यटकांनी आपली नावे कोरली आहेत.


या 35 वर्षीय गेंड्याच्या पाठीवर कॅमिली आणि ज्युलिअन अशी दोन नावे कोरण्यात आली आहेत. गेंड्याच्या पाठीचे फोटो फ्रान्समधील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. "पर्यटकांच्या मूर्खपणाविषयी साहजिकच आमचा संताप होत आहे" असे फोटो सोबत कॅप्शन लिहीण्यात आले आहे. पर्यटकांने नखाच्या मदतीने गेंड्याच्या पाठीवरील कोरडी त्वचा खरडून स्वतःचे नावे लिहिली, असे झूचे संचालक पिअर केली यांनी सांगितले. गेंड्याचे कातडे जाड असल्याने त्याला कदाचित हे समजलेही नसेल, पण हे कृत्य अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले.


गेंड्याच्या त्वचेवरील नावेपुसून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे त्याला कोणताही अपाय झालेला नाही, असे झू प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र हे फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. या फोटोमुळे जगभरातील ट्विटर यूझर्सनी या घटनेचा निषेध केला आहे. प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे बहुसंख्य पर्यटक त्यांच्या त्वचेला हात लावून पाहतात. मात्र एखाद्या प्राण्याच्या अंगावर आपले नाव कोरण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचे झूकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर झूमध्ये जागोजागी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
some one scratch name on rhinos back with nails in zoo