तणाव : इराणच्या नौदलाने आणखी एक परदेशी मालवाहू जहाज पकडले; तेल तस्करीचा आराेप, सात लाख लिटर तेल वाहून नेले जात हाेते

तेहरान -इराणच्या नाैदलाने पर्शियन खाडीत आणखी एक तेलवाहू जहाज पकडल्याचा दावा केला आहे. या जहाजावरील सात खलाशांना अटक करण्यात आल्याची माहिती रिव्हाेल्युशनरी गार्ड््सने दिली. एकाच महिन्यात या सागरी क्षेत्रात पकडलेल्या मालवाहू जहाजांची संख्या तीन झाली आहे.फारसी बेटाजवळ इराणी नाैदलाने बुधवारी ही कारवाई केली. जहाजाद्वारे ७ लाख लिटर तेल वाहून नेले जात हाेते, असा इराणचा आराेप आहे. तेलाची तस्करी केली जात हाेती. त्याच वेळी इराणच्या गस्त घालणाऱ्या पथकाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या हाेत्या. त्यानंतरच्या कारवाईत जहाजाला ताब्यात घेऊन बुशेहरकडे रवाना करण्यात आले. ब्रिगेडियर रामेझान झिराही यांच्या नेतृत्वाखाली ही जप्तीची कारवाई करण्यात आली.हे तेल तस्करीमार्गे नेले जात हाेते. इराणने तेल जहाज जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. १८ जुलै राेजीदेखील कारवाई झाली हाेती. तेव्हा ब्रिटिशांचा ध्वज असलेले स्टेना इम्पेराे नावाचे जहाज हाॅर्म्युझ सागरी क्षेत्रात पकडण्यात आले हाेते. ब्रिटनने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचा भंग केला हाेता, असा ठपका ठेवून इराणने ही कारवाई केली हाेती.परराष्ट्रमंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलाराष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचा प्रस्ताव अलीकडेच इराणचे परराष्ट्रमंत्री माेहंमद जावेद झरिफ यांनी फेटाळून लावला हाेता. त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. सिनेटर रँड पाॅल यांनी १५ जुलै राेजी झरिफ यांची भेट घेतली हाेती. त्या वेळी त्यांना व्हाइट हाऊसला जाण्याचा सल्लाही पाॅल यांनी दिली हाेता. मुत्सद्यांवर अशा प्रकारची बंदी घालणे चुकीचे आहे. कारण सरकारी पातळीवर तडजाेडीचे प्रयत्न केले जात असताना अशा पद्धतीचे वर्तन केवळ बालिशपणाचे असल्याची प्रतिक्रिया इराण सरकारने व्यक्त केली आहे. अमेरिकेने अण्वस्त्र करारातून बाहेर पडण्याचे ठरवल्यानंतर इराणने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दाेन्ही देशांतील तणाव वाढला.संघर्षाची स्थिती धूसरमहिनाभरात इराणने तीन जहाजे ताब्यात घेतली असली तरी त्यामुळे पर्शियन सागरी क्षेत्रात तणाववाढीची शक्यता धूसर असल्याचा दावा इराणचे लष्करप्रमुख ब्रिगेडियर अहमद्रेझा पाैर्दास्तान यांनी केला आहे. काेणत्याही देशाला या भागात रस आहे, असे मला वाटत नाही.परंतु जूनमध्ये हवाई हद्द आेलांडल्याचा दावा करून इराणने अमेरिकेचे ड्राेन पाडले हाेते. त्यानंतर भडकलेल्या अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यातच मालवाहू जहाजांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे इराण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष्य ठरला आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today तेलवाहू जहाजाला ताब्यात घेतल्यानंतर कारवाईसाठी किनाऱ्यावर आणताना स्पीड बोटीवरील इराणचे सैनिक.


 तणाव  : इराणच्या नौदलाने आणखी एक परदेशी मालवाहू जहाज पकडले; तेल तस्करीचा आराेप, सात लाख लिटर तेल वाहून नेले जात हाेते

तेहरान -इराणच्या नाैदलाने पर्शियन खाडीत आणखी एक तेलवाहू जहाज पकडल्याचा दावा केला आहे. या जहाजावरील सात खलाशांना अटक करण्यात आल्याची माहिती रिव्हाेल्युशनरी गार्ड््सने दिली. एकाच महिन्यात या सागरी क्षेत्रात पकडलेल्या मालवाहू जहाजांची संख्या तीन झाली आहे.


फारसी बेटाजवळ इराणी नाैदलाने बुधवारी ही कारवाई केली. जहाजाद्वारे ७ लाख लिटर तेल वाहून नेले जात हाेते, असा इराणचा आराेप आहे. तेलाची तस्करी केली जात हाेती. त्याच वेळी इराणच्या गस्त घालणाऱ्या पथकाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या हाेत्या. त्यानंतरच्या कारवाईत जहाजाला ताब्यात घेऊन बुशेहरकडे रवाना करण्यात आले. ब्रिगेडियर रामेझान झिराही यांच्या नेतृत्वाखाली ही जप्तीची कारवाई करण्यात आली.


हे तेल तस्करीमार्गे नेले जात हाेते. इराणने तेल जहाज जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. १८ जुलै राेजीदेखील कारवाई झाली हाेती. तेव्हा ब्रिटिशांचा ध्वज असलेले स्टेना इम्पेराे नावाचे जहाज हाॅर्म्युझ सागरी क्षेत्रात पकडण्यात आले हाेते. ब्रिटनने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचा भंग केला हाेता, असा ठपका ठेवून इराणने ही कारवाई केली हाेती.


परराष्ट्रमंत्र्यांनी प्रस्ताव नाकारला
राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचा प्रस्ताव अलीकडेच इराणचे परराष्ट्रमंत्री माेहंमद जावेद झरिफ यांनी फेटाळून लावला हाेता. त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. सिनेटर रँड पाॅल यांनी १५ जुलै राेजी झरिफ यांची भेट घेतली हाेती. त्या वेळी त्यांना व्हाइट हाऊसला जाण्याचा सल्लाही पाॅल यांनी दिली हाेता. मुत्सद्यांवर अशा प्रकारची बंदी घालणे चुकीचे आहे. कारण सरकारी पातळीवर तडजाेडीचे प्रयत्न केले जात असताना अशा पद्धतीचे वर्तन केवळ बालिशपणाचे असल्याची प्रतिक्रिया इराण सरकारने व्यक्त केली आहे. अमेरिकेने अण्वस्त्र करारातून बाहेर पडण्याचे ठरवल्यानंतर इराणने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दाेन्ही देशांतील तणाव वाढला.
संघर्षाची स्थिती धूसर


महिनाभरात इराणने तीन जहाजे ताब्यात घेतली असली तरी त्यामुळे पर्शियन सागरी क्षेत्रात तणाववाढीची शक्यता धूसर असल्याचा दावा इराणचे लष्करप्रमुख ब्रिगेडियर अहमद्रेझा पाैर्दास्तान यांनी केला आहे. काेणत्याही देशाला या भागात रस आहे, असे मला वाटत नाही.


परंतु जूनमध्ये हवाई हद्द आेलांडल्याचा दावा करून इराणने अमेरिकेचे ड्राेन पाडले हाेते. त्यानंतर भडकलेल्या अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यातच मालवाहू जहाजांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे इराण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष्य ठरला आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
तेलवाहू जहाजाला ताब्यात घेतल्यानंतर कारवाईसाठी किनाऱ्यावर आणताना स्पीड बोटीवरील इराणचे सैनिक.