.तरच शेतकऱ्यांच्या विकास होईल - ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर

.तरच शेतकऱ्यांच्या विकास होईल - ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर

पंढरपूर-

‘आज माणूस नुसता पैशाच्या मागे धावतो आहे. त्यामुळे माणसाला माणसाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे नाते संबंधात दरी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत असा फरक अधिक ठळक होत आहे. जर श्रीमंतांची मुले ज्या शाळेत शिक्षण घेताहेत त्याच शाळेत गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊ लागली तरच खऱ्या अर्थाने भारत विकासाकडे झेप घेत आहे असे म्हणावे लागेल.’ असे भावनिक उदगार प्रसिद्ध लेखक, पत्रकार, किर्तनकार ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
        स्वेरीच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त सायंकाळी ‘उजळावया आलो वाटा’ या विषयावर आयोजिलेल्या किर्तनात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर अप्रतिम वाणीने विचार सांगत होते. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी ‘स्वेरी’परिवारातील सदस्यांच्या पाल्यांच्या कलागुणांचा गौरव केला. यामध्ये सिद्धी शितोळे, हर्षवर्धन शिंदे, प्रणाली पवार, स्वराज तळवलकर, अनिश तांबोळी, राजआर्या साळुंखे, तनिशा मोरे, प्रीती काळे, मयुरेश बागल, श्रेया मोहोळकर, महेंद्र देवधर, आराध्या रानगट, कार्तिक कुलकर्णी, साईकिरण धरणे यांचा भेटवस्तू देवून सत्कार केला.