दरोड्यांसह 85 गुन्हे उघडकीस

सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिनाभर दिवस- रात्र प्रयत्न करून घरफोड्यातील टोळ्यांकडून तब्बल 85 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील 34 गुन्ह्यांतील 13 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच वेळ आहे. येथील शिवतेज हॉलमध्ये अधीक्षक सातपुते यांची आज पत्रकार परिषद झाली. त्या म्हणाल्या, 'जून महिन्यामध्ये खटाव तालुक्‍यातील सिद्धेश्‍वर कुरोली, पुसेगाव व मांडवे येथे तीन धाडसी दरोडे टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विजय कुंभार यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. या पथकाने समांतर तपास करत जावेद अनिल काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव), करण वरिसऱ्या काळे (रा. भांडेवाडी, ता. खटाव), निकाल लत्या काळे (रा. कोकराळे, ता. खटाव), संकेत आलिशा काळे व अभिजित मंज्या शिंदे (दोघे रा. सिद्धेश्‍वर कुरोली, ता. खटाव), तसेच ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) या सहा जणांना अटक केली. दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास व चौकशीचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले. पकडलेल्या संशयितांनी सातारा व सांगली जिल्ह्यांतील 85 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ, वडूजमधील 28, पुसेगावमधील 16, कोरेगावमधील सहा, रहिमतपूर हद्दीतील दहा, म्हसवडमधील 14, दहिवडीमधील व विटा (जि. सांगली) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समोवश आहे. यापैकी 34 गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये वीस तोळे दागिने, एक किलो चांदीचे दागिने, मोबाईल, घड्याळे व चोरीच्या वाहनांचा समावेश असल्याचे अधीक्षक सातपुते यांनी सांगितले. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये निरीक्षक कुंभार, उपनिरीक्षक जऱ्हाड यांच्यासह हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, तसेच वडूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोकराव पाटील, हवालदार ओंबासे, देवकुळे, अर्जुन खाडे यांचा सहभाग होता. महासंचालकांकडून होणार सन्मान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची ही जिल्ह्यातील बहुदा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या तपासाबाबत पोलिस महासंचालक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याशी वारंवार चर्चा होत होती. या तपास पथकाचा त्यांच्याकडूनही सन्मान होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. News Item ID: 599-news_story-1563817780Mobile Device Headline: दरोड्यांसह 85 गुन्हे उघडकीसAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिनाभर दिवस- रात्र प्रयत्न करून घरफोड्यातील टोळ्यांकडून तब्बल 85 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील 34 गुन्ह्यांतील 13 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच वेळ आहे. येथील शिवतेज हॉलमध्ये अधीक्षक सातपुते यांची आज पत्रकार परिषद झाली. त्या म्हणाल्या, 'जून महिन्यामध्ये खटाव तालुक्‍यातील सिद्धेश्‍वर कुरोली, पुसेगाव व मांडवे येथे तीन धाडसी दरोडे टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विजय कुंभार यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. या पथकाने समांतर तपास करत जावेद अनिल काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव), करण वरिसऱ्या काळे (रा. भांडेवाडी, ता. खटाव), निकाल लत्या काळे (रा. कोकराळे, ता. खटाव), संकेत आलिशा काळे व अभिजित मंज्या शिंदे (दोघे रा. सिद्धेश्‍वर कुरोली, ता. खटाव), तसेच ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) या सहा जणांना अटक केली. दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास व चौकशीचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले. पकडलेल्या संशयितांनी सातारा व सांगली जिल्ह्यांतील 85 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ, वडूजमधील 28, पुसेगावमधील 16, कोरेगावमधील सहा, रहिमतपूर हद्दीतील दहा, म्हसवडमधील 14, दहिवडीमधील व विटा (जि. सांगली) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समोवश आहे. यापैकी 34 गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये वीस तोळे दागिने, एक किलो चांदीचे दागिने, मोबाईल, घड्याळे व चोरीच्या वाहनांचा समावेश असल्याचे अधीक्षक सातपुते यांनी सांगितले. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये निरीक्षक कुंभार, उपनिरीक्षक जऱ्हाड यांच्यासह हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, तसेच वडूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोकराव पाटील, हवालदार ओंबासे, देवकुळे, अर्जुन खाडे यांचा सहभाग होता. महासंचालकांकडून होणार सन्मान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची ही जिल्ह्यातील बहुदा पहिलीच वेळ आहे. त्यामुळ

दरोड्यांसह 85 गुन्हे उघडकीस

सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिनाभर दिवस- रात्र प्रयत्न करून घरफोड्यातील टोळ्यांकडून तब्बल 85 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील 34 गुन्ह्यांतील 13 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

येथील शिवतेज हॉलमध्ये अधीक्षक सातपुते यांची आज पत्रकार परिषद झाली. त्या म्हणाल्या, 'जून महिन्यामध्ये खटाव तालुक्‍यातील सिद्धेश्‍वर कुरोली, पुसेगाव व मांडवे येथे तीन धाडसी दरोडे टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विजय कुंभार यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. या पथकाने समांतर तपास करत जावेद अनिल काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव), करण वरिसऱ्या काळे (रा. भांडेवाडी, ता. खटाव), निकाल लत्या काळे (रा. कोकराळे, ता. खटाव), संकेत आलिशा काळे व अभिजित मंज्या शिंदे (दोघे रा. सिद्धेश्‍वर कुरोली, ता. खटाव), तसेच ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) या सहा जणांना अटक केली. दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास व चौकशीचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले.

पकडलेल्या संशयितांनी सातारा व सांगली जिल्ह्यांतील 85 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ, वडूजमधील 28, पुसेगावमधील 16, कोरेगावमधील सहा, रहिमतपूर हद्दीतील दहा, म्हसवडमधील 14, दहिवडीमधील व विटा (जि. सांगली) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समोवश आहे.

यापैकी 34 गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये वीस तोळे दागिने, एक किलो चांदीचे दागिने, मोबाईल, घड्याळे व चोरीच्या वाहनांचा समावेश असल्याचे अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.

कारवाई करणाऱ्या पथकामध्ये निरीक्षक कुंभार, उपनिरीक्षक जऱ्हाड यांच्यासह हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, तसेच वडूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोकराव पाटील, हवालदार ओंबासे, देवकुळे, अर्जुन खाडे यांचा सहभाग होता.

महासंचालकांकडून होणार सन्मान
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची ही जिल्ह्यातील बहुदा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या तपासाबाबत पोलिस महासंचालक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याशी वारंवार चर्चा होत होती. या तपास पथकाचा त्यांच्याकडूनही सन्मान होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

News Item ID: 
599-news_story-1563817780
Mobile Device Headline: 
दरोड्यांसह 85 गुन्हे उघडकीस
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Theft Dacoit Robbery Crime Police
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
चोरी, पोलिस, पत्रकार, Sangli, Silver, मोबाईल, कोल्हापूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Theft, Dacoit, Robbery, Crime, Police
Meta Description: 
येथील शिवतेज हॉलमध्ये अधीक्षक सातपुते यांची आज पत्रकार परिषद झाली. त्या म्हणाल्या, 'जून महिन्यामध्ये खटाव तालुक्‍यातील सिद्धेश्‍वर कुरोली, पुसेगाव व मांडवे येथे तीन धाडसी दरोडे टाकण्यात आले होते.
Send as Notification: