पोटच्या पोराला ठोकल्या बेड्या, कारण मुलगा झाला होता पक्का व्यसनाधीन

नाभा/पतियाळा- पंजाबमध्ये नशेचे प्रमाण किती प्रमाणात वाढले आहे, हे याचे विदारक चित्र समोरच दिसते आहे. या छायाचित्रात मुलाच्या पायात बेड्या ठोकण्याची वेळ आई-बापावर आली आहे. कारण त्यांच्या २२ वर्षाच्या मुलाचे संदीपला नशेचे व्यसन इतके वाढले होते की, तो घरातील सामान चोरून विकत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला साखळीने बांधून ठेवले असून आई वडील त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असतात.नाभा गावातील अलोहरा येथील संदीपला नशा करण्याची सवय लागली होती. त्याला जडलेले व्यसन पाहून वडील तरसेमसिंग यांनी सर्वतोपरी उपचार करून पाहिले. पोलिसांनाही माहिती दिली. पण काही फरक पडला नाही. अखेर काहीच मार्ग न निघाल्याने त्याला घरातच बांधून ठेवावे लागले. मी आणि माझी पत्नी दोघेही बाहेर कामे करून घर चालवत आहोत, असे त्यांनी सांगितले.पोलिस म्हणाले, सांभाळा या पोरालाआई मनजीत कौर यांनी सांगितले, मुलाचे व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात नेले. पोलिसांनी सांगितले, या अट्टल नशेबाजास तुम्हीच सांभाळलेले बरे. त्यामुळे त्याला घरी आणून पायात बेड्या ठोकल्या. गेल्या दहा दिवसापासून तो घरी आहे.सहज मिळतात ड्रग्जसंदीप म्हणाला, मित्रांमुळे गेल्या चार वर्षांपासून नशा करतो आहे. दहावीत असताना शाळा सोडली. मला ड्रग्ज सहज विकत मिळत असत. अमरगड व राेहटी पुलावर उघड चिलिम विकतात. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Addictive son crossed the limits in punjab


 पोटच्या पोराला ठोकल्या बेड्या, कारण मुलगा झाला होता पक्का व्यसनाधीन

नाभा/पतियाळा- पंजाबमध्ये नशेचे प्रमाण किती प्रमाणात वाढले आहे, हे याचे विदारक चित्र समोरच दिसते आहे. या छायाचित्रात मुलाच्या पायात बेड्या ठोकण्याची वेळ आई-बापावर आली आहे. कारण त्यांच्या २२ वर्षाच्या मुलाचे संदीपला नशेचे व्यसन इतके वाढले होते की, तो घरातील सामान चोरून विकत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला साखळीने बांधून ठेवले असून आई वडील त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असतात.


नाभा गावातील अलोहरा येथील संदीपला नशा करण्याची सवय लागली होती. त्याला जडलेले व्यसन पाहून वडील तरसेमसिंग यांनी सर्वतोपरी उपचार करून पाहिले. पोलिसांनाही माहिती दिली. पण काही फरक पडला नाही. अखेर काहीच मार्ग न निघाल्याने त्याला घरातच बांधून ठेवावे लागले. मी आणि माझी पत्नी दोघेही बाहेर कामे करून घर चालवत आहोत, असे त्यांनी सांगितले.


पोलिस म्हणाले, सांभाळा या पोराला
आई मनजीत कौर यांनी सांगितले, मुलाचे व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात नेले. पोलिसांनी सांगितले, या अट्टल नशेबाजास तुम्हीच सांभाळलेले बरे. त्यामुळे त्याला घरी आणून पायात बेड्या ठोकल्या. गेल्या दहा दिवसापासून तो घरी आहे.


सहज मिळतात ड्रग्ज
संदीप म्हणाला, मित्रांमुळे गेल्या चार वर्षांपासून नशा करतो आहे. दहावीत असताना शाळा सोडली. मला ड्रग्ज सहज विकत मिळत असत. अमरगड व राेहटी पुलावर उघड चिलिम विकतात.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Addictive son crossed the limits in punjab