पडळकर यांची काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली भेट     

आटपाडी - माण- खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांची झरे येथे निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात पाठिंबा आणि पक्षप्रवेश या मुद्द्यावर बरेच खलबते झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत गोरे यांना वंचित बहुजन आघाडी  पाठिंबा देणार की गोरे वंचित मधून निवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.               आमदार गोरे विविध पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी चाचपणी करीत आहेत. ते  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे, मात्र तेथील भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल देसाई, शेखर गोरे यांचा जयकुमार गोरे यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करूनही फारसे काही हाताला लागेल असे दिसत नाही. दुसरीकडे लोकसभेला भाजप उमेदवाराला सहकार्य करून राष्ट्रवादीच्या विरोधात काम केल्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीची नेते मंडळीही आमदार गोरे यांना सहकार्य करणार नाहीत, हेही तितकेच उघड झाले आहे. सध्या मतदार संघात  गोरे एकाएकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही दिवसापासून त्यांनी भेटीगाठी, हालचाली आणि बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते पडळकर यांची झरे येथे सपत्नीक भेट घेतली. भेटीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात बरीच चर्चा झाली. आमदार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेला पाठिंबा देण्याचे साकडे घातले तर पडळकर यांनी आमदार गोरे यांना पाठिंब्याऐवजी वंचित मधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला. गोरे यांनी पक्षप्रवेशाला तर पडळकर यांनी पाठिंब्याला होकार दिला नाही. दोघांच्यात बराच वेळ राजकीय खलबते झाली मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.  News Item ID: 599-news_story-1564737060Mobile Device Headline: पडळकर यांची काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली भेट      Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: आटपाडी - माण- खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांची झरे येथे निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात पाठिंबा आणि पक्षप्रवेश या मुद्द्यावर बरेच खलबते झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत गोरे यांना वंचित बहुजन आघाडी  पाठिंबा देणार की गोरे वंचित मधून निवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.               आमदार गोरे विविध पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी चाचपणी करीत आहेत. ते  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे, मात्र तेथील भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल देसाई, शेखर गोरे यांचा जयकुमार गोरे यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करूनही फारसे काही हाताला लागेल असे दिसत नाही. दुसरीकडे लोकसभेला भाजप उमेदवाराला सहकार्य करून राष्ट्रवादीच्या विरोधात काम केल्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीची नेते मंडळीही आमदार गोरे यांना सहकार्य करणार नाहीत, हेही तितकेच उघड झाले आहे. सध्या मतदार संघात  गोरे एकाएकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही दिवसापासून त्यांनी भेटीगाठी, हालचाली आणि बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते पडळकर यांची झरे येथे सपत्नीक भेट घेतली. भेटीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात बरीच चर्चा झाली. आमदार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेला पाठिंबा देण्याचे साकडे घातले तर पडळकर यांनी आमदार गोरे यांना पाठिंब्याऐवजी वंचित मधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला. गोरे यांनी पक्षप्रवेशाला तर पडळकर यांनी पाठिंब्याला होकार दिला नाही. दोघांच्यात बराच वेळ राजकीय खलबते झाली मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.  Vertical Image: English Headline: MLA Jaykumar Gore meets Gopichand Padalkar in ZhareAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआमदारजयकुमार गोरेवंचित बहुजन आघाडीनिवडणूकभाजपअनिल देसाईSearch Functional Tags: आमदार, जयकुमार गोरे, वंचित बहुजन आघाडी, निवडणूक, भाजप, अनिल देसाईTwitter Publish: Send as Notification: 

पडळकर यांची काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली भेट     

आटपाडी - माण- खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांची झरे येथे निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात पाठिंबा आणि पक्षप्रवेश या मुद्द्यावर बरेच खलबते झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत गोरे यांना वंचित बहुजन आघाडी  पाठिंबा देणार की गोरे वंचित मधून निवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.              

आमदार गोरे विविध पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी चाचपणी करीत आहेत. ते  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे, मात्र तेथील भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल देसाई, शेखर गोरे यांचा जयकुमार गोरे यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करूनही फारसे काही हाताला लागेल असे दिसत नाही. दुसरीकडे लोकसभेला भाजप उमेदवाराला सहकार्य करून राष्ट्रवादीच्या विरोधात काम केल्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीची नेते मंडळीही आमदार गोरे यांना सहकार्य करणार नाहीत, हेही तितकेच उघड झाले आहे. सध्या मतदार संघात  गोरे एकाएकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही दिवसापासून त्यांनी भेटीगाठी, हालचाली आणि बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते पडळकर यांची झरे येथे सपत्नीक भेट घेतली. भेटीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात बरीच चर्चा झाली.

आमदार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेला पाठिंबा देण्याचे साकडे घातले तर पडळकर यांनी आमदार गोरे यांना पाठिंब्याऐवजी वंचित मधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला. गोरे यांनी पक्षप्रवेशाला तर पडळकर यांनी पाठिंब्याला होकार दिला नाही. दोघांच्यात बराच वेळ राजकीय खलबते झाली मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते. 

News Item ID: 
599-news_story-1564737060
Mobile Device Headline: 
पडळकर यांची काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली भेट     
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
MLA Jaykumar Gore meets Gopichand Padalkar in Zhare
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आमदार, जयकुमार गोरे, वंचित बहुजन आघाडी, निवडणूक, भाजप, अनिल देसाई
Twitter Publish: 
Send as Notification: