पुणे मनपाच्या अभियंत्यास पंढरपुरात मारहाण

पंढरपूर : रक्षाबंधनाच्या सणासाठी गावी आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला ८ ते १० जणांनी  भरदुपारी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एच.पी. गॅस एजन्सीसमोर घडला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  साहेबराव बलभीम दांडगे (वय ५२) हे पुणे महानगरपालिकेत २६ वर्षांपासून स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत.  रक्षाबंधन आणि शेतीच्या कामानिमित्त ते कुटूंबियांसह रांझणी या आपल्या मुळ गावी आले होते. त्यानंतर शुक्रवारी ते शेती  साहित्य खरेदी करून आणण्यासाठी नातेवाईक प्रभाकर बागल यांची फॉर्च्युनर कार (एम.एच. १३ / ए.झेड. ०३३३) घेऊन पंढरपुरात आले होते. सोबत मुलगा शुभम तसेच संतोष गांडूळे व राजाभाऊ दांडगे हे दोघे नातेवाईक त्यांची गॅस शेगडी आणण्यासाठी कारमधून आले होते. दुपारी दीडच्या सुमारास कार नवीन बसस्थानकासमोरील एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला थांबवून गांडूळे व राजाभाऊ दांडगे शेगडी आणण्यासाठी गेले.  यादरम्यान, बुलेट मोटारसायकलवरून (एम.एच. १३ / डी.एच. १५५५) एक इसम कारजवळ आला. त्याने साहेबराव दांडगे व त्यांचा मुलगा शुभम यांना कार का थांबवली ? असे म्हणत दमदाटी सुरू केली. यावर दांडगे यांनी नातेवाईक शेगडी आणण्यास गेले असून, लगेच आम्ही निघतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर त्या इसमाने 'मला ओळखत नाही का ? तुम्हाला बघून घेऊ का ?' असे म्हणत मोबाईलवरून आणखी ८ ते १० लोकांना बोलावून घेतले. कांही वेळातच मोटारसायकलींवरून आलेल्या या लोकांनी साहेबराव दांडगे यांना लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, तोंडावर जबर मारहाण केली. चष्मा हिसकावून फोडला. बुलेटवरून आलेल्या इसमाने जाताना छातीत, पोटात जोरात ठोसे मारल्याने साहेबराव दांडगे रस्त्यावरच बेशुद्ध पडले. दरम्यान, भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा मुलगा शुभम दांडगे तसेच संतोष गांडुळे व राजाभाऊ दांडगे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी गॅस शेगडीने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बेेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी साहेबराव दांडगे यांना रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हल्लेखोरांचे मोबाईलवरून फोटो काढण्यात आले असून, त्यावरून संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दादागिरी, लूटमार नेहमीची - बसस्थानक परिसरात सर्वसामान्य नागरीक, भाविक तसेच परगावहून आलेल्या लोकांना अडवून जबर मारहाण करण्याचे, लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुंडगिरी आणि दहशत माजविणाऱ्यांच्या टोळ्या या ठिकाणी सक्रीय असून, भितीपोटी अनेकजण वाईट अनुभव येऊनही पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे धाडस करीत नसल्याचे बोलले जात आहे. टोळक्यांची ही दादागिरी मोडीत काढण्याची मागणीही जोर धरत आहे. News Item ID: 599-news_story-1566014428Mobile Device Headline: पुणे मनपाच्या अभियंत्यास पंढरपुरात मारहाणAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पंढरपूर : रक्षाबंधनाच्या सणासाठी गावी आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला ८ ते १० जणांनी  भरदुपारी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एच.पी. गॅस एजन्सीसमोर घडला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  साहेबराव बलभीम दांडगे (वय ५२) हे पुणे महानगरपालिकेत २६ वर्षांपासून स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत.  रक्षाबंधन आणि शेतीच्या कामानिमित्त ते कुटूंबियांसह रांझणी या आपल्या मुळ गावी आले होते. त्यानंतर शुक्रवारी ते शेती  साहित्य खरेदी करून आणण्यासाठी नातेवाईक प्रभाकर बागल यांची फॉर्च्युनर कार (एम.एच. १३ / ए.झेड. ०३३३) घेऊन पंढरपुरात आले होते. सोबत मुलगा शुभम तसेच संतोष गांडूळे व राजाभाऊ दांडगे हे दोघे नातेवाईक त्यांची गॅस शेगडी आणण्यासाठी कारमधून आले होते. दुपारी दीडच्या सुमारास कार नवीन बसस्थानकासमोरील एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला थांबवून गांडूळे व राजाभाऊ दांडगे शेगडी आणण्यासाठी गेले.  यादरम्यान, बुलेट मोटारसायकलवरून (एम.एच. १३ / डी.एच. १५५५) एक इसम कारजवळ आला. त्याने साहेबराव दांडगे व त्यांचा मुलगा शुभम यांना कार का थांबवली ? असे म्हणत दमदाटी सुरू केली. यावर दांडगे यांनी नातेवाईक शेगडी आणण्यास गेले असून, लगेच आम्ही निघतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर त्या इसमाने 'मला ओळखत नाही का ? तुम्हाला बघून घेऊ का ?' असे म्हणत मोबाईलवरून आणखी ८ ते १० लोकांना बोलावून घेतले. कांही वेळातच मोटारसायकलींवरून आलेल्या या लोकांनी साहेबराव दांडगे यांना लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, तोंडावर जबर मारहाण केली. चष्मा हिसकावून फोडला. बुलेटवरून आलेल्या इसमाने जाताना छातीत, पोटात जोरात ठोसे मारल्याने साहेबराव दांडगे रस्त्यावरच बेशुद्ध पडले. दरम्यान, भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा मुलगा शुभम दांडगे तसेच संतोष गांडुळे व राजाभाऊ दांडगे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी गॅस शेगडीने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बेेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी साहेबराव दांडगे यांना रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हल्लेखोरांचे मोबाईलवरून फोटो काढण्यात आले असून, त्यावरून संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दादागिरी, लूटमार नेहमीची - बसस्थानक परिसरात सर्वसामान्य नागरीक, भाविक तसेच परगावहून आलेल्या लोकांना अडवून जबर मारहाण करण्याचे, लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुंडगिरी आणि दहशत माजविणाऱ्यांच्या टोळ्या या ठिकाणी सक्रीय असून, भितीपोटी अनेकजण वाईट अनुभव येऊनही पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे धाडस करीत नसल्याचे बोलले जात आहे. टोळक्

पुणे मनपाच्या अभियंत्यास पंढरपुरात मारहाण

पंढरपूर : रक्षाबंधनाच्या सणासाठी गावी आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला ८ ते १० जणांनी  भरदुपारी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एच.पी. गॅस एजन्सीसमोर घडला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 
साहेबराव बलभीम दांडगे (वय ५२) हे पुणे महानगरपालिकेत २६ वर्षांपासून स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत.  रक्षाबंधन आणि शेतीच्या कामानिमित्त ते कुटूंबियांसह रांझणी या आपल्या मुळ गावी आले होते. त्यानंतर शुक्रवारी ते शेती  साहित्य खरेदी करून आणण्यासाठी नातेवाईक प्रभाकर बागल यांची फॉर्च्युनर कार (एम.एच. १३ / ए.झेड. ०३३३) घेऊन पंढरपुरात आले होते. सोबत मुलगा शुभम तसेच संतोष गांडूळे व राजाभाऊ दांडगे हे दोघे नातेवाईक त्यांची गॅस शेगडी आणण्यासाठी कारमधून आले होते. दुपारी दीडच्या सुमारास कार नवीन बसस्थानकासमोरील एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला थांबवून गांडूळे व राजाभाऊ दांडगे शेगडी आणण्यासाठी गेले.  यादरम्यान, बुलेट मोटारसायकलवरून (एम.एच. १३ / डी.एच. १५५५) एक इसम कारजवळ आला. त्याने साहेबराव दांडगे व त्यांचा मुलगा शुभम यांना कार का थांबवली ? असे म्हणत दमदाटी सुरू केली. यावर दांडगे यांनी नातेवाईक शेगडी आणण्यास गेले असून, लगेच आम्ही निघतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर त्या इसमाने 'मला ओळखत नाही का ? तुम्हाला बघून घेऊ का ?' असे म्हणत मोबाईलवरून आणखी ८ ते १० लोकांना बोलावून घेतले. कांही वेळातच मोटारसायकलींवरून आलेल्या या लोकांनी साहेबराव दांडगे यांना लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, तोंडावर जबर मारहाण केली. चष्मा हिसकावून फोडला. बुलेटवरून आलेल्या इसमाने जाताना छातीत, पोटात जोरात ठोसे मारल्याने साहेबराव दांडगे रस्त्यावरच बेशुद्ध पडले.

दरम्यान, भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा मुलगा शुभम दांडगे तसेच संतोष गांडुळे व राजाभाऊ दांडगे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी गॅस शेगडीने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बेेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी साहेबराव दांडगे यांना रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हल्लेखोरांचे मोबाईलवरून फोटो काढण्यात आले असून, त्यावरून संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दादागिरी, लूटमार नेहमीची - बसस्थानक परिसरात सर्वसामान्य नागरीक, भाविक तसेच परगावहून आलेल्या लोकांना अडवून जबर मारहाण करण्याचे, लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुंडगिरी आणि दहशत माजविणाऱ्यांच्या टोळ्या या ठिकाणी सक्रीय असून, भितीपोटी अनेकजण वाईट अनुभव येऊनही पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे धाडस करीत नसल्याचे बोलले जात आहे. टोळक्यांची ही दादागिरी मोडीत काढण्याची मागणीही जोर धरत आहे.

News Item ID: 
599-news_story-1566014428
Mobile Device Headline: 
पुणे मनपाच्या अभियंत्यास पंढरपुरात मारहाण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
pune municipal corporation civil engineer beaten in pandharpur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, पोलिस, पंढरपूर, तोडफोड
Twitter Publish: 
Meta Description: 
रक्षाबंधनाच्या सणासाठी गावी आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला ८ ते १० जणांनी  भरदुपारी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एच.पी. गॅस एजन्सीसमोर घडला.
Send as Notification: