पुतीन यांच्या निकटवर्तीयाने अमेरिकेत १,४२२ कोटी रु.ची गुंतवणूक केल्याने मोठी खळबळ

व्हेरा बरगेंग्रुएन-अमेरिकेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय अब्जाधीश ओलेग डेरिपास्का यांच्या मोठ्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या अनेक संसद सदस्यांनी एका अॅल्युमिनियम प्रकल्पात केलेल्या १,४२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. रशियासाठी अमेरिकेत राजकीय हस्तक्षेपाचा मार्ग खुला होईल.ब्रेडी इंडस्ट्रीजच्या अॅशलंड, केंटुकी येथील प्रकल्पात रशियन अॅल्युमिनियम कंपनी रुसालने ४०% भागीदारी खरेदी केली आहे. ब्रेडीचे सीईओ क्रेग बाउचार्ड यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित प्रकल्पातून केंटुकी आणि अपालचिया क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. या भागात काही दिवसांपूर्वी रेल्वे कारखाने, तेल शुद्धीकरण आणि पोलाद कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार कपात झाली आहेे.रशियन कंपनीसोबतच्या सौद्यात अमेरिकी कोषागार विभागाचे निर्बंध आड येत होते. कंपनीचे मालक ओलेग यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाची विशेेष वकील रॉबर्ट मुलर यांनी चौकशी केली आहे. कोषागाराच्या म्हणण्यानुसार, रशियन सत्तेचे केंद्र- क्रेमलिनच्या अनिष्ट हालचाली, पाश्चिमात्य देशांची लोकशाही अस्ताव्यस्त करण्याच्या प्रयत्नांमुळे रुसाल किंवा त्यांच्या बॉसशी अमेरिकींचा सौदा करणे अवैध आहे. रुसाल, ब्रेडी किंवा डेरिपास्का यांनी व्यवहारात कोणताही नियम तोडला नसल्याचे राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांना वाटते. टाइम मासिकाच्या तपासात आढळले की, रुसाल यांनी निर्बंध कुचकामी करण्यासाठी राजकारण आणि आर्थिक साधनांचा वापर केला आहे. या प्रक्रियेत त्यांनी अमेरिकी राजकारणात पाय रोवले आहेत. माजी उपविदेशमंत्री हिथर कोनले यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आमचे कायदे, बँका, आमचे वकील व लॉबिस्टचा वापर रणनीतीअंतर्गत केला आहे.निर्बंध संपवण्यासाठी रुसाल यांनी वॉशिंग्टनमध्ये अनेक महिने प्रयत्न केले.तगड्या मानधनावर लॉबिंग करणाऱ्यांची सेवा घेतली. केंटुुकीचे खासदार मिच मेककोनेल यांनी निर्बंध संपुष्टात आणण्यात मदत केली. मेककोनेलचे दोन माजी कर्मचारी संसदेत ब्रेडी यांच्या वतीने लाँबिंग करत आहेत. २०१८ च्या मध्यावधी निवडणुकीआधी रुसालचे समभागधारक लेन ब्लावटनिक यांनी मेककोनेलशी संबंधित रिपब्लिकन पार्टीच्या एका निधीत सात कोटी रुपयांहून जास्त दिले.सौद्याच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, टीकाकार राजकारण करत आहेत. विदेशींंच्या आर्थिक शक्तींमुळे अमेरिकेचा फायदा आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणारी विदेशी गुंंतवणूक रोखण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत. मात्र, रशियन अब्जाधीशाच्या कंपनीच्या सौद्याला ट्रम्पकडूून विरोध झाला नाही. रुसाल व डेरिपास्कावरील अमेरिकी निर्बंधाच्या घोषणेमुळे खळबळ उडाली होती.ट्रम्पचे सहकारी रशियन अब्जाधीशाचे एजंटरशियन कंपनी रुसाल युरोपची सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे. त्यांचे १३ देशांत ६० हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. २००६ मधील अमेरिकी दूतावासाच्या एका केबलनुसार, डेरिपास्का पुतीन यांच्या विदेश दौऱ्यात त्यांच्यासोबत कायम असतात. विकिलीक्सच्या केबलनुसार, डेरिपास्का यांचा अशा दोन-तीन श्रीमंतांत समावेश आहे, ज्यांचा पुतीन यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. डेरिपास्काने अमेरिकेत हितसंबंधांना चालना देण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे राजकीय ऑपरेटर पाल मेनाफोर्टची सेवा घेतली. डेरिपास्काचे सहकारी व माजी रशियन गुप्तचर एजंट व्हिक्टर बोयारकिन यांच्यानुसार,मेनाफोर्टने आमच्याकडून खूप पैसे घेतले आहेत.(सोबत एलाना अब्राम्सन) Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today उद्योगपती ओलेग डेरिपास्कासोबत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन.


 पुतीन यांच्या निकटवर्तीयाने अमेरिकेत १,४२२ कोटी रु.ची गुंतवणूक केल्याने मोठी खळबळ

व्हेरा बरगेंग्रुएन-अमेरिकेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय अब्जाधीश ओलेग डेरिपास्का यांच्या मोठ्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या अनेक संसद सदस्यांनी एका अॅल्युमिनियम प्रकल्पात केलेल्या १,४२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. रशियासाठी अमेरिकेत राजकीय हस्तक्षेपाचा मार्ग खुला होईल.


ब्रेडी इंडस्ट्रीजच्या अॅशलंड, केंटुकी येथील प्रकल्पात रशियन अॅल्युमिनियम कंपनी रुसालने ४०% भागीदारी खरेदी केली आहे. ब्रेडीचे सीईओ क्रेग बाउचार्ड यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित प्रकल्पातून केंटुकी आणि अपालचिया क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. या भागात काही दिवसांपूर्वी रेल्वे कारखाने, तेल शुद्धीकरण आणि पोलाद कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार कपात झाली आहेे.


रशियन कंपनीसोबतच्या सौद्यात अमेरिकी कोषागार विभागाचे निर्बंध आड येत होते. कंपनीचे मालक ओलेग यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाची विशेेष वकील रॉबर्ट मुलर यांनी चौकशी केली आहे. कोषागाराच्या म्हणण्यानुसार, रशियन सत्तेचे केंद्र- क्रेमलिनच्या अनिष्ट हालचाली, पाश्चिमात्य देशांची लोकशाही अस्ताव्यस्त करण्याच्या प्रयत्नांमुळे रुसाल किंवा त्यांच्या बॉसशी अमेरिकींचा सौदा करणे अवैध आहे. रुसाल, ब्रेडी किंवा डेरिपास्का यांनी व्यवहारात कोणताही नियम तोडला नसल्याचे राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांना वाटते. टाइम मासिकाच्या तपासात आढळले की, रुसाल यांनी निर्बंध कुचकामी करण्यासाठी राजकारण आणि आर्थिक साधनांचा वापर केला आहे. या प्रक्रियेत त्यांनी अमेरिकी राजकारणात पाय रोवले आहेत. माजी उपविदेशमंत्री हिथर कोनले यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आमचे कायदे, बँका, आमचे वकील व लॉबिस्टचा वापर रणनीतीअंतर्गत केला आहे.निर्बंध संपवण्यासाठी रुसाल यांनी वॉशिंग्टनमध्ये अनेक महिने प्रयत्न केले.तगड्या मानधनावर लॉबिंग करणाऱ्यांची सेवा घेतली. केंटुुकीचे खासदार मिच मेककोनेल यांनी निर्बंध संपुष्टात आणण्यात मदत केली. मेककोनेलचे दोन माजी कर्मचारी संसदेत ब्रेडी यांच्या वतीने लाँबिंग करत आहेत. २०१८ च्या मध्यावधी निवडणुकीआधी रुसालचे समभागधारक लेन ब्लावटनिक यांनी मेककोनेलशी संबंधित रिपब्लिकन पार्टीच्या एका निधीत सात कोटी रुपयांहून जास्त दिले.


सौद्याच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, टीकाकार राजकारण करत आहेत. विदेशींंच्या आर्थिक शक्तींमुळे अमेरिकेचा फायदा आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणारी विदेशी गुंंतवणूक रोखण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत. मात्र, रशियन अब्जाधीशाच्या कंपनीच्या सौद्याला ट्रम्पकडूून विरोध झाला नाही. रुसाल व डेरिपास्कावरील अमेरिकी निर्बंधाच्या घोषणेमुळे खळबळ उडाली होती.

ट्रम्पचे सहकारी रशियन अब्जाधीशाचे एजंट
रशियन कंपनी रुसाल युरोपची सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे. त्यांचे १३ देशांत ६० हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. २००६ मधील अमेरिकी दूतावासाच्या एका केबलनुसार, डेरिपास्का पुतीन यांच्या विदेश दौऱ्यात त्यांच्यासोबत कायम असतात. विकिलीक्सच्या केबलनुसार, डेरिपास्का यांचा अशा दोन-तीन श्रीमंतांत समावेश आहे, ज्यांचा पुतीन यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. डेरिपास्काने अमेरिकेत हितसंबंधांना चालना देण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे राजकीय ऑपरेटर पाल मेनाफोर्टची सेवा घेतली. डेरिपास्काचे सहकारी व माजी रशियन गुप्तचर एजंट व्हिक्टर बोयारकिन यांच्यानुसार,मेनाफोर्टने आमच्याकडून खूप पैसे घेतले आहेत.


(सोबत एलाना अब्राम्सन)



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
उद्योगपती ओलेग डेरिपास्कासोबत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन.