ब्रिटनच्या युवराजांना पृथ्वीची चिंता असल्यास त्यांनी खासगी विमान वापर बंद करावा, लोकांचा सल्ला

लंडन -ब्रिटनचे युवराज हॅॅरी यांनी दोनपेक्षा जास्त अपत्ये होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. हॅरी यांना पृथ्वीची एवढीच चिंता असेल तर त्यांनी खासगी विमान वापर करणे बंद केले पाहिजे. सोशल मीडियावरही हॅरी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा आहेत...लोकांच्या प्रतिक्रियालंडनहून बर्मिंगहॅमला हेलिकॉप्टरने जातात, ते हेच प्रिन्स हॅरी आहेत का? त्यांची पत्नी अॅटलांटिक पार केल्यानंतर सहकारी सेलेबसोबत जेटचा वापर करते. - पियर्स मॉर्गन, पत्रकारप्रिन्सला पर्यावरणाची चिंता वाटू लागली आहे. मग आता ते सहकुटुंब बसने प्रवास करताना दिसतील? -द ब्लू आयलँडरहा निर्णय पर्यावरणासंबंधी नाही. खरे तर या वयात मेगान दोनपेक्षा जास्त मुलांची देखभाल करू शकत नाही.- साफीआता जुळी मुले झाल्यास काय कराल ? - फ्रैंक पिज्जेलांटी​​​​​​​नातेवाइकांच्या कार्यक्रमात जाण्यासाठी ताशी ४.२५ लाख रुपये दराने हेलिकॉप्टर भाड्याने घेणारे हॅरीच आहेत. म्हणूनच हे ढोंग आहे. - जक आर्नियनआम्ही आणखी अपत्ये होऊ देणार नाही, असे तुम्ही म्हणत आहात. त्यापेक्षा दहा मुलांना दत्तक घेणार म्हटले असते तर आम्हाला तुमचे बोलणे जबाबदारपणाचे वाटले असते. - टी कॅसिलोजरूर. चला आता मुलाच्या कार्यक्रमासाठी वापरलेल्या जेटबद्दल बोलूया. शिवाय महागडे कपडे. या संपूर्ण ट्रिपवर ७५ हजार डॉलर खर्च झाले होते. -बेबी बर्क११४ पाहुणे जेटने आलेकार्यक्रमात हॅरी यांचे भाषण होणार होते. त्यात २०० पाहुणे आले होते. ते सर्व ११४ खासगी विमानाने प्रवास करून पोहोचले होते.संशोधनही झाले : स्वीडनच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार इथिअोपियामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या तुलनेत ब्रिटनची व्यक्ती सरासरी १५० पट जास्त कार्बन उत्सर्जन करते. हॅरीचे वय ३४ वर्षे आहे. अशा प्रकारे त्यांनी मलावीमध्ये राहणाऱ्या १.८ कोटी लोकांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन केले आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today If Britain's prince are concerned about the earth, they should stop using private aircraft, people suggest


 ब्रिटनच्या युवराजांना पृथ्वीची चिंता असल्यास त्यांनी खासगी विमान वापर बंद करावा, लोकांचा सल्ला

लंडन -ब्रिटनचे युवराज हॅॅरी यांनी दोनपेक्षा जास्त अपत्ये होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. हॅरी यांना पृथ्वीची एवढीच चिंता असेल तर त्यांनी खासगी विमान वापर करणे बंद केले पाहिजे. सोशल मीडियावरही हॅरी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा आहेत...

लोकांच्या प्रतिक्रिया

लंडनहून बर्मिंगहॅमला हेलिकॉप्टरने जातात, ते हेच प्रिन्स हॅरी आहेत का? त्यांची पत्नी अॅटलांटिक पार केल्यानंतर सहकारी सेलेबसोबत जेटचा वापर करते. - पियर्स मॉर्गन, पत्रकार


प्रिन्सला पर्यावरणाची चिंता वाटू लागली आहे. मग आता ते सहकुटुंब बसने प्रवास करताना दिसतील? -द ब्लू आयलँडर


हा निर्णय पर्यावरणासंबंधी नाही. खरे तर या वयात मेगान दोनपेक्षा जास्त मुलांची देखभाल करू शकत नाही.- साफी


आता जुळी मुले झाल्यास काय कराल ? - फ्रैंक पिज्जेलांटी

​​​​​​​
नातेवाइकांच्या कार्यक्रमात जाण्यासाठी ताशी ४.२५ लाख रुपये दराने हेलिकॉप्टर भाड्याने घेणारे हॅरीच आहेत. म्हणूनच हे ढोंग आहे. - जक आर्नियन

आम्ही आणखी अपत्ये होऊ देणार नाही, असे तुम्ही म्हणत आहात. त्यापेक्षा दहा मुलांना दत्तक घेणार म्हटले असते तर आम्हाला तुमचे बोलणे जबाबदारपणाचे वाटले असते. - टी कॅसिलो


जरूर. चला आता मुलाच्या कार्यक्रमासाठी वापरलेल्या जेटबद्दल बोलूया. शिवाय महागडे कपडे. या संपूर्ण ट्रिपवर ७५ हजार डॉलर खर्च झाले होते. -बेबी बर्क

११४ पाहुणे जेटने आले

कार्यक्रमात हॅरी यांचे भाषण होणार होते. त्यात २०० पाहुणे आले होते. ते सर्व ११४ खासगी विमानाने प्रवास करून पोहोचले होते.संशोधनही झाले : स्वीडनच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार इथिअोपियामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या तुलनेत ब्रिटनची व्यक्ती सरासरी १५० पट जास्त कार्बन उत्सर्जन करते. हॅरीचे वय ३४ वर्षे आहे. अशा प्रकारे त्यांनी मलावीमध्ये राहणाऱ्या १.८ कोटी लोकांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन केले आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
If Britain's prince are concerned about the earth, they should stop using private aircraft, people suggest