भूतानच्या विद्यार्थ्यांत उच्च कामगिरीची क्षमता : माेदी

थिम्पू-भावी पिढ्यांवर प्रभाव टाकू शकेल, अशी शैक्षणिक कामगिरी करण्याची भूतानमधील विद्यार्थ्यांत क्षमता आहे. त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून वाटचाल करावी आणि हिमालयातील या देशाला नवी उंची प्राप्त करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे.राॅयल विद्यापीठात रविवारी माेदींनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, भूतानी तरुणांनी परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. सध्याच्या युगात अनेक प्रकारची आव्हाने आहेत. प्रत्येक आव्हानाला ताेंड देण्यासाठी नवनव्या कल्पनांचा वापर करण्याची जिद्द बाळगावी. तरुणपणीचा काळा सर्वात चांगला मानला पाहिजे. कारण अनेक आव्हाने आणि संधी तुमच्यासमाेर येत असतात. काहीतरी अतुलनीय कामगिरी करण्यास सक्षम आहाेत, हा विश्वास बाळगला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही पुढील पिढ्यांवर प्रभाव टाकू शकाल. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात स्वत: ला घडवा, असे माेदींनी सांगितले. या प्रसंगी भूतानचे पंतप्रधान लाेते शेरिंग यांचीही उपस्थिती हाेती.भारतीय सदैव तुमच्यासाेबतभूतानच्या तरुणांसाेबत १.३ अब्ज भारतीय आहेत. ते तुमच्याकडे पाहून केवळ आनंदी हाेत नाहीत, तर ते तुमचे भागीदारही आहेत. भारतीय तरुण तुमच्यासाेबत शिकतील. तुम्हाला साथ देतील, असे माेदींनी सांगितले. भारत-भूतान यांच्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून ऊर्जा मिळेल. परंतु खरी ऊर्जा दाेन्ही देशांतील सामान्य नागरिकांच्या मैत्रीतून मिळणार आहे, हे विसरता येणार नाही. हेच संबंध अधिक दृढ हाेणे गरजेचे आहे. दाेन्ही देशांच्या नागरिकांनी आपल्या अनुभवांची परस्परांशी देवाण-घेवाण करावी. दरम्यान,माेदींचे शनिवारी भूतानला आगमन झाले हाेते. त्यांचा रविवारी हा दाैरा आटाेपला. ते मायदेशी रवाना झाले. माेदींचा हा दुसरा भूतान दाैरा आहे.माहिती-तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मैत्रीसाठी गरजेचीभारताचे नॅशनल नाॅलेज नेटवर्क व भूतानचे द्रूकरेन या संस्थांतील सहकार्यामुळे उभय देशांत विद्यापीठ, संशाेधन संस्था, गं्रंथालय, आराेग्य-केंद्र व कृषी संस्था यांच्या पातळीवरील संपर्क व संवाद व्यवस्था निर्माण हाेण्यास मदत झाली आहे. या सर्व व्यवस्थेचा याेग्य ताे वापर करून आपल्या देशाचा फायदा करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.सहकार्यास तयारभारत भूतानला नवनवीन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी तयार आहे. शाळेपासून अंतराळ, डिजिटल पेमेंट्सपासून आणीबाणीतील व्यवस्थापनापर्यंत भारत सहकार्य करेल. त्यातून मैत्रीवर चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास माेदींनी व्यक्त केला. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Bhutan students have high performance potential: Madi


 भूतानच्या विद्यार्थ्यांत उच्च कामगिरीची क्षमता : माेदी

थिम्पू-भावी पिढ्यांवर प्रभाव टाकू शकेल, अशी शैक्षणिक कामगिरी करण्याची भूतानमधील विद्यार्थ्यांत क्षमता आहे. त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून वाटचाल करावी आणि हिमालयातील या देशाला नवी उंची प्राप्त करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे.


राॅयल विद्यापीठात रविवारी माेदींनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, भूतानी तरुणांनी परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. सध्याच्या युगात अनेक प्रकारची आव्हाने आहेत. प्रत्येक आव्हानाला ताेंड देण्यासाठी नवनव्या कल्पनांचा वापर करण्याची जिद्द बाळगावी. तरुणपणीचा काळा सर्वात चांगला मानला पाहिजे. कारण अनेक आव्हाने आणि संधी तुमच्यासमाेर येत असतात. काहीतरी अतुलनीय कामगिरी करण्यास सक्षम आहाेत, हा विश्वास बाळगला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही पुढील पिढ्यांवर प्रभाव टाकू शकाल. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात स्वत: ला घडवा, असे माेदींनी सांगितले. या प्रसंगी भूतानचे पंतप्रधान लाेते शेरिंग यांचीही उपस्थिती हाेती.


भारतीय सदैव तुमच्यासाेबत
भूतानच्या तरुणांसाेबत १.३ अब्ज भारतीय आहेत. ते तुमच्याकडे पाहून केवळ आनंदी हाेत नाहीत, तर ते तुमचे भागीदारही आहेत. भारतीय तरुण तुमच्यासाेबत शिकतील. तुम्हाला साथ देतील, असे माेदींनी सांगितले. भारत-भूतान यांच्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून ऊर्जा मिळेल. परंतु खरी ऊर्जा दाेन्ही देशांतील सामान्य नागरिकांच्या मैत्रीतून मिळणार आहे, हे विसरता येणार नाही. हेच संबंध अधिक दृढ हाेणे गरजेचे आहे. दाेन्ही देशांच्या नागरिकांनी आपल्या अनुभवांची परस्परांशी देवाण-घेवाण करावी. दरम्यान,माेदींचे शनिवारी भूतानला आगमन झाले हाेते. त्यांचा रविवारी हा दाैरा आटाेपला. ते मायदेशी रवाना झाले. माेदींचा हा दुसरा भूतान दाैरा आहे.


माहिती-तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मैत्रीसाठी गरजेची
भारताचे नॅशनल नाॅलेज नेटवर्क व भूतानचे द्रूकरेन या संस्थांतील सहकार्यामुळे उभय देशांत विद्यापीठ, संशाेधन संस्था, गं्रंथालय, आराेग्य-केंद्र व कृषी संस्था यांच्या पातळीवरील संपर्क व संवाद व्यवस्था निर्माण हाेण्यास मदत झाली आहे. या सर्व व्यवस्थेचा याेग्य ताे वापर करून आपल्या देशाचा फायदा करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सहकार्यास तयार
भारत भूतानला नवनवीन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी तयार आहे. शाळेपासून अंतराळ, डिजिटल पेमेंट्सपासून आणीबाणीतील व्यवस्थापनापर्यंत भारत सहकार्य करेल. त्यातून मैत्रीवर चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास माेदींनी व्यक्त केला.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Bhutan students have high performance potential: Madi