भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधव प्रकरणावर भारताच्या बाजुने निकाल, पाकिस्तानला फाशीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले

हेग(नेदरलंड)- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आईसीजे)ने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात भारतीय बाजुने निर्णय दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायदे सल्लागार रीमा ओमेर यांनी ट्वीट करून आयसीजेने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती देऊन पाकिस्तानने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले.कुलभूषण जाधव प्रकरणी न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिले. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचेही आयसीजेने मान्य केले आहे. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे.आयसीजेमध्ये भारताच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती. पाकिस्तानने वारंवार कौन्सिलर अॅक्सेस नाकारुन व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे सांगत भारताने आपला युक्तीवाद केला होता. पण आता कौन्सिलर अॅक्सेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील कलम 36 चे उल्लंघन केल्याचा ठपका आयसीजेने ठेवलाय.काय आहे व्हिएन्ना करार?आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला व्हिएन्ना करार 1961 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे करण्यात आला होता. या करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करू शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. राजदुतांवर परदेशात गुन्हाही दाखल केला जाऊ शकत नाही. 2018 पर्यंत 192 देशांनी या कराराला मान्यता दिली आहे.दरम्यान, पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भारतासाठी आता पुढील मार्ग सोपा झाला आहे. कारण, पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या फाशीवर आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. कौन्सिलर अॅक्सेस दिल्यानंतरच या फाशीवर पुनर्विचार केला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता भारताला राजनैतिक मदतीने हा खटला लढवता येईल.पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती. फेब्रुवारीमध्ये चार दिवस दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला होता. भारताने प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले. व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आणि कन्सुलर अॅक्सेस नाकारल्याचा मुद्दा. याशिवाय कुलभूषण जाधव यांना तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणीही भारताने केली होती.दरम्यान, कुलभूषण जाधव हे हेरगिरी करत असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण व्यवसाय करत होते, पण त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याचे भारताने सांगितले. भारताने अनेकदा कन्सुलर अॅक्सेस मागूनही पाकिस्तानने सतत नकार दिला होता. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाकिस्तानशी अनेकदा संपर्क साधला होता.कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई या दोघींना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. 25 डिसेंबर 2017 रोजी दोघीही कुलभूषण जाधव यांना भेटून आल्या होत्या. मात्र एवढ्या वर्षांनी भेटून कुलभूषण यांच्या जवळही जाता आले नव्हते. दोघांच्या मध्ये काच लावलेली होती आणि फोनद्वारे संभाषण करायला लावले, ज्यामुळे जवळून भेटही होऊ शकली नाही. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Kulbhushan Jadhav Case ICJ Hague Latest UPDATES , News on International Court Verdict


 भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधव प्रकरणावर भारताच्या बाजुने निकाल, पाकिस्तानला फाशीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले

हेग(नेदरलंड)- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आईसीजे)ने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात भारतीय बाजुने निर्णय दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायदे सल्लागार रीमा ओमेर यांनी ट्वीट करून आयसीजेने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती देऊन पाकिस्तानने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले.

कुलभूषण जाधव प्रकरणी न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिले. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचेही आयसीजेने मान्य केले आहे. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे.


आयसीजेमध्ये भारताच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती. पाकिस्तानने वारंवार कौन्सिलर अॅक्सेस नाकारुन व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे सांगत भारताने आपला युक्तीवाद केला होता. पण आता कौन्सिलर अॅक्सेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील कलम 36 चे उल्लंघन केल्याचा ठपका आयसीजेने ठेवलाय.


काय आहे व्हिएन्ना करार?
आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला व्हिएन्ना करार 1961 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे करण्यात आला होता. या करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करू शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. राजदुतांवर परदेशात गुन्हाही दाखल केला जाऊ शकत नाही. 2018 पर्यंत 192 देशांनी या कराराला मान्यता दिली आहे.


दरम्यान, पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भारतासाठी आता पुढील मार्ग सोपा झाला आहे. कारण, पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या फाशीवर आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. कौन्सिलर अॅक्सेस दिल्यानंतरच या फाशीवर पुनर्विचार केला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता भारताला राजनैतिक मदतीने हा खटला लढवता येईल.

पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती. फेब्रुवारीमध्ये चार दिवस दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला होता. भारताने प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले. व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आणि कन्सुलर अॅक्सेस नाकारल्याचा मुद्दा. याशिवाय कुलभूषण जाधव यांना तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणीही भारताने केली होती.


दरम्यान, कुलभूषण जाधव हे हेरगिरी करत असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण व्यवसाय करत होते, पण त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याचे भारताने सांगितले. भारताने अनेकदा कन्सुलर अॅक्सेस मागूनही पाकिस्तानने सतत नकार दिला होता. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाकिस्तानशी अनेकदा संपर्क साधला होता.


कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई या दोघींना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. 25 डिसेंबर 2017 रोजी दोघीही कुलभूषण जाधव यांना भेटून आल्या होत्या. मात्र एवढ्या वर्षांनी भेटून कुलभूषण यांच्या जवळही जाता आले नव्हते. दोघांच्या मध्ये काच लावलेली होती आणि फोनद्वारे संभाषण करायला लावले, ज्यामुळे जवळून भेटही होऊ शकली नाही.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Kulbhushan Jadhav Case ICJ Hague Latest UPDATES , News on International Court Verdict