मोदींना यूएईचा सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ जायद’ पुरस्कार प्रदान, रूपे कार्डदेखील जारी केले

अबुधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींना अबु धाबीचे क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यं यांनी आज(शनिवार) संयुक्त अरब अमीरात (यूएई)चा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ प्रदान केला. मोदींनी दोन दिवसांचा फ्रांस दौरा पूर्ण करुन शुक्रवारी यूएईमध्ये पोहचले. मोदींना ‘ऑर्डर ऑफ जायद’ पुरस्कार यावर्षी एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आला होता. भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दुबईचे संस्थापक शेख जायद बिन सुल्तान अल नाह्यां यांच्या नावावर सुरू करण्यात आला आहे.मोदींनी शनिवारी रूपे कार्डही जारी केले. त्यांनी येथे व्यापारी वर्गाशी भेटीही घेतल्या आणि भारतात गुंतवणूक करण्याचे आनाहन केले. या दरम्यान मोदी म्हणाले की, राजकीय स्थिरता, प्रस्तावित धोरणे भारताला गुंतवणुकीसाठी आकर्षक बाजार बनवतो. यूएईमध्ये भारताचे राजदूत नवदीप सिंह सूरी यांनी अमीरात पॅलेसमध्ये रूपे कार्डच्या लाँचदरम्यान म्हणाले की, मध्य पूर्वमध्ये संयुक्त अरब अमीरात पहिला असा देश आहे, जिथे रूपे कार्डची सुरुवात झाली. यूएईमध्ये पुढील आठवड्यांपासून मोठी दुकाने आणि मॉलमध्ये याची सुरुवात होईल.मोदींनी आपल्या रूपे कार्डचा वापर करुन येथील एक दुकान ''छप्पन भोग''मधून लाडू घेतले. छप्पन भोगचे मालक विनय वर्माने खलीज टाइम्सला सांगितले की, कार्डचा उपयोग करुन मोंदीनी एक किलोग्राम मोतीचूरचे लाडू घेतले.यूएईच्या 3 बँका पुढील आठवड्यांपासून रुपे कार्ड देणे सुरू करतीलराजदूत सूरी यांनी सांगितले की, यूएईमधील तीन बँक अमीरात एनबीडी, बँक ऑफ बड़ौदा आणि फॅब पुढील आठवड्यांपासून या कार्डला जारी करणे सुरू करतील. यूएईची मरक्यूरी पेमेंट सर्विसेज आणि भारताच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनदरम्यान पेमेंटसाठी टेक्नोलॉजी इंटरफेस स्थापन करण्यासाठी एक एमओयूची देवाण घेवाण करण्यात आली.दुबई सगळ्यात मोठा बिझनेस हबमागील चार वर्षात ही पंतप्रधानांची हा तिसरा दुबई दौरा आहे. आखाती देशांमध्ये दुबईला सर्वात मोठा बिजनेस हब मानले जाते. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक जातात, त्यामुळे मागील काही वर्षात येथे व्यापार वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed


 मोदींना यूएईचा सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ जायद’ पुरस्कार प्रदान, रूपे कार्डदेखील जारी केले

अबुधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींना अबु धाबीचे क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यं यांनी आज(शनिवार) संयुक्त अरब अमीरात (यूएई)चा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ प्रदान केला. मोदींनी दोन दिवसांचा फ्रांस दौरा पूर्ण करुन शुक्रवारी यूएईमध्ये पोहचले. मोदींना ‘ऑर्डर ऑफ जायद’ पुरस्कार यावर्षी एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आला होता. भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दुबईचे संस्थापक शेख जायद बिन सुल्तान अल नाह्यां यांच्या नावावर सुरू करण्यात आला आहे.


मोदींनी शनिवारी रूपे कार्डही जारी केले. त्यांनी येथे व्यापारी वर्गाशी भेटीही घेतल्या आणि भारतात गुंतवणूक करण्याचे आनाहन केले. या दरम्यान मोदी म्हणाले की, राजकीय स्थिरता, प्रस्तावित धोरणे भारताला गुंतवणुकीसाठी आकर्षक बाजार बनवतो. यूएईमध्ये भारताचे राजदूत नवदीप सिंह सूरी यांनी अमीरात पॅलेसमध्ये रूपे कार्डच्या लाँचदरम्यान म्हणाले की, मध्य पूर्वमध्ये संयुक्त अरब अमीरात पहिला असा देश आहे, जिथे रूपे कार्डची सुरुवात झाली. यूएईमध्ये पुढील आठवड्यांपासून मोठी दुकाने आणि मॉलमध्ये याची सुरुवात होईल.

मोदींनी आपल्या रूपे कार्डचा वापर करुन येथील एक दुकान ''छप्पन भोग''मधून लाडू घेतले. छप्पन भोगचे मालक विनय वर्माने खलीज टाइम्सला सांगितले की, कार्डचा उपयोग करुन मोंदीनी एक किलोग्राम मोतीचूरचे लाडू घेतले.


यूएईच्या 3 बँका पुढील आठवड्यांपासून रुपे कार्ड देणे सुरू करतील
राजदूत सूरी यांनी सांगितले की, यूएईमधील तीन बँक अमीरात एनबीडी, बँक ऑफ बड़ौदा आणि फॅब पुढील आठवड्यांपासून या कार्डला जारी करणे सुरू करतील. यूएईची मरक्यूरी पेमेंट सर्विसेज आणि भारताच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनदरम्यान पेमेंटसाठी टेक्नोलॉजी इंटरफेस स्थापन करण्यासाठी एक एमओयूची देवाण घेवाण करण्यात आली.


दुबई सगळ्यात मोठा बिझनेस हब
मागील चार वर्षात ही पंतप्रधानांची हा तिसरा दुबई दौरा आहे. आखाती देशांमध्ये दुबईला सर्वात मोठा बिजनेस हब मानले जाते. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक जातात, त्यामुळे मागील काही वर्षात येथे व्यापार वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed
Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed
Narendra Modi honouredc with UAE Highest Civilian Award Order of Zayed