मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांचा इम्रान खान यांना फोन; म्हणाले - भारताविरोधात आरोप-प्रत्यारोप करणे टाळा

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पाकने भारतावर आरोप-प्रत्यारोप टाळावे असे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प आणि इमरान यांची आठवडभरात दुसऱ्यांदा चर्चा झाली आहे. तर दूसरीकडे सोमवारी ट्रम्प आणि मोदी यांच्यात फोनवर 30 मिनिटे द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली.व्हाइट हाउसच्या मते, ट्रम्प यांनी इम्रान यांना सांगितले की जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पाकिस्तानने भारताबरोबरचे तणाव कमी करण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी संयम साधला पाहिजे. तसेच ट्रम्प यांनी अमेरिका-पाकच्या आर्थिक आणि व्यापार सहयोग मजबूत करण्यास सहमती दर्शवली.सीमेपलीकडेल दहशतवाद रोखने गरजेचे - मोदीमोदी यांनी ट्रम्पसोबत बोलताना म्हटले होते की, सीमेपलीकडील दहशतवादाला आळा घालणे आणि दहशत व हिंसा मुक्त वातावरण तयार करणे आवश्यक आहे. यावेळी मोदींनी ट्रम्प यांच्या अफगानिस्तानबाबत देखील चर्चा केली. भारत एकजुट, सुरक्षित आणि लोकशाही अफगानिस्तानच्या निर्माणासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.पाकने अमेरिकेला आपल्या बाजुने वळवण्याचा केला होता प्रयत्नभारत सरकारने जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. यामुळे तीळ पापड झालेल्या इम्रान खानने नुकतेच अमेरिकेला आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याबाबत मध्यस्थीबाबत मोदी निर्णय घेतील असे अमेरिकेने पाकला सांगितले होते. पण भारताने यावर चर्चा करण्यास नकार दिला होता. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Trump calls Imran Khan after talks with Modi; Said - Avoid allegations against India


 मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांचा इम्रान खान यांना फोन; म्हणाले - भारताविरोधात आरोप-प्रत्यारोप करणे टाळा

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पाकने भारतावर आरोप-प्रत्यारोप टाळावे असे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प आणि इमरान यांची आठवडभरात दुसऱ्यांदा चर्चा झाली आहे. तर दूसरीकडे सोमवारी ट्रम्प आणि मोदी यांच्यात फोनवर 30 मिनिटे द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

व्हाइट हाउसच्या मते, ट्रम्प यांनी इम्रान यांना सांगितले की जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पाकिस्तानने भारताबरोबरचे तणाव कमी करण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी संयम साधला पाहिजे. तसेच ट्रम्प यांनी अमेरिका-पाकच्या आर्थिक आणि व्यापार सहयोग मजबूत करण्यास सहमती दर्शवली.

सीमेपलीकडेल दहशतवाद रोखने गरजेचे - मोदी

मोदी यांनी ट्रम्पसोबत बोलताना म्हटले होते की, सीमेपलीकडील दहशतवादाला आळा घालणे आणि दहशत व हिंसा मुक्त वातावरण तयार करणे आवश्यक आहे. यावेळी मोदींनी ट्रम्प यांच्या अफगानिस्तानबाबत देखील चर्चा केली. भारत एकजुट, सुरक्षित आणि लोकशाही अफगानिस्तानच्या निर्माणासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.

पाकने अमेरिकेला आपल्या बाजुने वळवण्याचा केला होता प्रयत्न

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. यामुळे तीळ पापड झालेल्या इम्रान खानने नुकतेच अमेरिकेला आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याबाबत मध्यस्थीबाबत मोदी निर्णय घेतील असे अमेरिकेने पाकला सांगितले होते. पण भारताने यावर चर्चा करण्यास नकार दिला होता.




Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Trump calls Imran Khan after talks with Modi; Said - Avoid allegations against India