युवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान 

नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी कराड जवळील वाठार येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून स्वयंसेवक स्वातंत्र्यदिनापासून श्रमदान करताहेत. विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वयंसेवकांच्या कामांची पाहणी करत त्यांना प्रोत्साहन दिले. श्रमदानाच्या कामाची सुरवात करण्यापूर्वी स्वयंसेवकांनी गावोगाव स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केले. त्यानंतर स्वच्छतेची सुरवात केली. युवक कॉंग्रेसचा क्रांतीदिनी 9 ऑगस्टला स्थापनादिनाचे उपक्रम राबवण्यात येतात. हे उपक्रम स्थगित करुन मदत कार्यासाठी फेऱ्या काढण्यात आल्या. त्यावेळी रोख आणि वस्तूरुपात समाजातून पूरग्रस्तांसाठी मदत जमा झाली. ही मदत घेऊन स्वयंसेवक कृष्णा काठी पोचलेत. आतापर्यंत पन्नास लाखांपर्यंतची मदत थेट पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात आली आहे.  दीडशे कारागिरांची मदत  स्वयंसेवकांनी प्लंबर, इलेक्‍ट्रीशियन, लाकडी काम करणारे असे दीडशे कारागिर सोबत नेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पडझड झालेल्या घरांची डागडुजी, संसाराच्या साहित्याची देखभाल करण्यात येत आहे. विजपुरवठा सुरळीत करुन देण्यात येत आहे. पूर ओसल्यानंतर अनेक ठिकाणचा गुडघाभर गाळ स्वयंसेवकांनी उपसला आहे. त्याचवेळी मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दवाखाने, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करुन सावरण्यात येत आहेत. औषधांची फवारणी, धुरळणी करण्यात येत आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये सरकार अपयशी ठरले. त्याबद्दलचा रोष स्थानिकांमधून व्यक्त झाला. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेसतर्फे कुठल्याही प्रकारची टीका न करता समाजाच्या मदतीसाठी स्वयंसेवकांनी झोकून दिले आहे. पूराचे पाणी असेपर्यंत अनेक ठिकाणी मदत झाली. मात्र पूर ओसरल्यानंतरही स्वयंसेवकांचे श्रमदान सुरु आहे. हे श्रमदान 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. - सत्यजित तांबे (प्रदेशाध्यक्ष, युवक कॉंग्रेस)    News Item ID: 599-news_story-1566303931Mobile Device Headline: युवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: MaharashtraKokanMarathwadaMumbaiPaschim MaharashtraPuneUttar MaharashtraVidarbha Image Gallery: Mobile Body: नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी कराड जवळील वाठार येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून स्वयंसेवक स्वातंत्र्यदिनापासून श्रमदान करताहेत. विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वयंसेवकांच्या कामांची पाहणी करत त्यांना प्रोत्साहन दिले. श्रमदानाच्या कामाची सुरवात करण्यापूर्वी स्वयंसेवकांनी गावोगाव स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केले. त्यानंतर स्वच्छतेची सुरवात केली. युवक कॉंग्रेसचा क्रांतीदिनी 9 ऑगस्टला स्थापनादिनाचे उपक्रम राबवण्यात येतात. हे उपक्रम स्थगित करुन मदत कार्यासाठी फेऱ्या काढण्यात आल्या. त्यावेळी रोख आणि वस्तूरुपात समाजातून पूरग्रस्तांसाठी मदत जमा झाली. ही मदत घेऊन स्वयंसेवक कृष्णा काठी पोचलेत. आतापर्यंत पन्नास लाखांपर्यंतची मदत थेट पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात आली आहे.  दीडशे कारागिरांची मदत  स्वयंसेवकांनी प्लंबर, इलेक्‍ट्रीशियन, लाकडी काम करणारे असे दीडशे कारागिर सोबत नेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पडझड झालेल्या घरांची डागडुजी, संसाराच्या साहित्याची देखभाल करण्यात येत आहे. विजपुरवठा सुरळीत करुन देण्यात येत आहे. पूर ओसल्यानंतर अनेक ठिकाणचा गुडघाभर गाळ स्वयंसेवकांनी उपसला आहे. त्याचवेळी मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दवाखाने, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करुन सावरण्यात येत आहेत. औषधांची फवारणी, धुरळणी करण्यात येत आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये सरकार अपयशी ठरले. त्याबद्दलचा रोष स्थानिकांमधून व्यक्त झाला. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेसतर्फे कुठल्याही प्रकारची टीका न करता समाजाच्या मदतीसाठी स्वयंसेवकांनी झोकून दिले आहे. पूराचे पाणी असेपर्यंत अनेक ठिकाणी मदत झाली. मात्र पूर ओसरल्यानंतरही स्वयंसेवकांचे श्रमदान सुरु आहे. हे श्रमदान 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. - सत्यजित तांबे (प्रदेशाध्यक्ष, युवक कॉंग्रेस)    Vertical Image: English Headline: Sakal News Helping Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरकृष्णा नदीस्वातंत्र्यदिनविजयविजय वडेट्टीवारमुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाणसतेज पाटीलउपक्रमसाहित्यग्रामपंचायतसरकारSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, कृष्णा नदी, स्वातंत्र्यदिन, विजय, विजय वडेट्टीवार, मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, उपक्रम, साहित्य, ग्रामपंचायत, सरकारTwitter Publish: Send as Notification: 

युवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान 

नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी कराड जवळील वाठार येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून स्वयंसेवक स्वातंत्र्यदिनापासून श्रमदान करताहेत. विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वयंसेवकांच्या कामांची पाहणी करत त्यांना प्रोत्साहन दिले. श्रमदानाच्या कामाची सुरवात करण्यापूर्वी स्वयंसेवकांनी गावोगाव स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केले. त्यानंतर स्वच्छतेची सुरवात केली. युवक कॉंग्रेसचा क्रांतीदिनी 9 ऑगस्टला स्थापनादिनाचे उपक्रम राबवण्यात येतात. हे उपक्रम स्थगित करुन मदत कार्यासाठी फेऱ्या काढण्यात आल्या. त्यावेळी रोख आणि वस्तूरुपात समाजातून पूरग्रस्तांसाठी मदत जमा झाली. ही मदत घेऊन स्वयंसेवक कृष्णा काठी पोचलेत. आतापर्यंत पन्नास लाखांपर्यंतची मदत थेट पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात आली आहे. 

दीडशे कारागिरांची मदत 
स्वयंसेवकांनी प्लंबर, इलेक्‍ट्रीशियन, लाकडी काम करणारे असे दीडशे कारागिर सोबत नेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पडझड झालेल्या घरांची डागडुजी, संसाराच्या साहित्याची देखभाल करण्यात येत आहे. विजपुरवठा सुरळीत करुन देण्यात येत आहे. पूर ओसल्यानंतर अनेक ठिकाणचा गुडघाभर गाळ स्वयंसेवकांनी उपसला आहे. त्याचवेळी मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दवाखाने, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करुन सावरण्यात येत आहेत. औषधांची फवारणी, धुरळणी करण्यात येत आहे. 

पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये सरकार अपयशी ठरले. त्याबद्दलचा रोष स्थानिकांमधून व्यक्त झाला. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेसतर्फे कुठल्याही प्रकारची टीका न करता समाजाच्या मदतीसाठी स्वयंसेवकांनी झोकून दिले आहे. पूराचे पाणी असेपर्यंत अनेक ठिकाणी मदत झाली. मात्र पूर ओसरल्यानंतरही स्वयंसेवकांचे श्रमदान सुरु आहे. हे श्रमदान 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 
- सत्यजित तांबे (प्रदेशाध्यक्ष, युवक कॉंग्रेस) 
 
News Item ID: 
599-news_story-1566303931
Mobile Device Headline: 
युवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Sakal News Helping
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, कृष्णा नदी, स्वातंत्र्यदिन, विजय, विजय वडेट्टीवार, मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, उपक्रम, साहित्य, ग्रामपंचायत, सरकार
Twitter Publish: 
Send as Notification: